मायबोली गणेशोत्सव २०२२

मायबोली गणेशोत्सव २०२२ निकाल आणि समारोप

Submitted by संयोजक on 25 September, 2022 - 08:24

निकाल

लेखन स्पर्धा - कॉलेजचे ते मोरपिशी दिवस
https://www.maayboli.com/node/82443

प्रथम क्रमांक - ऋन्मेऽऽष
https://www.maayboli.com/node/82403

द्वितीय क्रमांक - कविन
https://www.maayboli.com/node/82315

विषय: 

मर्मबंधातील एखादे नाते - भरत.

Submitted by भरत. on 12 September, 2022 - 05:07

गझलनवाज जगजीत सिंग गेल्यावर त्यां चं एक चित्रपट गीत वारंवार कानावर पडली.
चिठ्ठी न कोई संदेस
जाने वो कौनसा देस
जहाँ तुम चले गए
ते गेल्यानंतरच्या त्यांच्या चाहत्यांच्या भावना त्यांच्याच सुरातून पाझरत होत्या. नंतर कधीतरी हे गाणं ऐकताना माझ्याही भावनांचा बांध काचेचं एखादं भांडं हातातच फुटावं तसा फुटला. असेच निरोप न घेता दूर निघून गेलेल्या माझ्या शाळेतल्या दोन वर्गमित्रांची आठवण अचानक घेरून आली.

विषय: 

कथाशंभरी - भेट - मंजूताई

Submitted by मंजूताई on 11 September, 2022 - 23:34

बर्‍याच दिवसांनी दोघींना मोकळा वेळ मिळाला होता. नाही म्हटले तरी काही वर्षे लोटली होती. पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले होते. गौरीच्या लग्नात शिल्पाला पाहिलं अन् तिला धक्काच बसला. तिला चुकवत गौरीला आशीर्वाद देऊन घाईघाईने ती बाहेर पडली. घरी आली. पलंगावर निपचीत पडून राहिली. आयुष्यात हा प्रसंग कधी येईल ही कल्पनाच तिने कधी केली नव्हती. रमेशने काय झाले विचारताच त्याच्या गळ्यात पडून रडू लागली. रडता रडता शिल्पा भेटल्याचं सांगितले. रमेश तिची समजूत घालत म्हणाला की आपण वरदाशी बोललो ना काही एक न लपवता व आपण सगळे मिळून तिचा शोध घेऊ असं प्रॉमिस केलं होतं ना .... होतं ना ?

मायबोली गणेशोत्सव २०२२- स्पर्धा - मतदानाच्या धाग्यांची लिंक आणि प्रवेशिका यादी

Submitted by संयोजक on 11 September, 2022 - 18:33

लेखन स्पर्धा - कॉलेजचे ते मोरपिशी दिवस - मतदान
https://www.maayboli.com/node/82443

लेखन स्पर्धा - कॉलेजचे ते मोरपिशी दिवस - प्रवेशिका

१. कॉलेजचे ते मोरपिशी दिवस - ऋन्मेऽऽष
https://www.maayboli.com/node/82403

२. कॉलेजचे मोरपिशी दिवस - भरत.
https://www.maayboli.com/node/82344

विषय: 

कथाशंभरी - अतर्क्य - अतुल.

Submitted by अतुल. on 11 September, 2022 - 10:41

बर्‍याच दिवसांनी दोघींना मोकळा वेळ मिळाला होता. नाही म्हटले तरी काही वर्षे लोटली होती. पूलाखालुन बरेच पाणी वाहून गेले होते. अचानक एकीचे लक्ष तिकडे गेले. अरे हे काय? समीर? हा इथे कसा?

बघता बघता समीरने भेसूरपणे हसत प्रीतीचा गळा पकडला व तिला पुलावरून खाली ढकलून देऊ लागला.

“समीर, स्टॉप इट. प्लीज. संपलंय सगळं”, प्रिया ओरडली, “पाच वर्षे होऊन गेलीत. ती जिवंत नाही आता. आणि मी सुद्धा”

“तू मूर्ख आहेस. ती जिवंत आहे”

“आम्हा दोघींनाही तूच मारले आहेस”

“मेलो तर मी आहे. तुम्ही दोघींनी मारलेय मला. नाटक करू नकोस”

कॉलेजचे मोरपिशी दिवस - बेटर लक नेक्स्ट टाइम - सामो

Submitted by सामो on 11 September, 2022 - 10:35

कॅालेजचे दिवस असतात खरे मोरपिशी.
- विविध मखमली रंगांच्या उधळणीचे
- आणि डोळे असूनही आंधळे.

विषय: 

पाककृती स्पर्धा-१ - तिरंगी पदार्थ - तिरंगी रवा टोस्ट - साक्षी

Submitted by साक्षी on 11 September, 2022 - 09:40
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२० मिनिटे
पाककृती प्रकार: 

कथाशंभरी - २ - सवारी - अतुल.

Submitted by अतुल. on 11 September, 2022 - 09:27

अंगणात येऊन रघूने गेले सहा महिने बंद असलेल्या शेजारच्या घराकडे सवयीने पाहिले आणि तो पुन्हा हताश झाला. अजून किती काळ योग्य सवारीची वाट पहायची?
---x---
"केवळ घोडे सवारीयोग्य असणे पुरेसे नाही. करकचून मांड मारून बस", प्रशिक्षक जवळजवळ ओरडलाच. त्यासरशी घोड्याला मांड आवळून रघुने टाच मारली. धुळीचे लोट उडाले. अन् उधळलेल्या घोड्यासहित रघु समोरच्या दरीत गायब झाला! भयाण किंकाळी हवेत विरली.
---x---

कथा शंभरी २ - त्या दोघी - बिपीन सांगळे

Submitted by बिपिनसांगळे on 11 September, 2022 - 09:19

कथा शंभरी २ - त्या दोघी - बिपीन सांगळे
-----------------------------------------------
अंगणात येऊन रघूने , गेले सहा महिने बंद असलेल्या शेजारच्या घराकडे सवयीने पाहिलं आणि ...
अचानक एकीचं लक्ष तिकडे गेलं , ‘अरे, हे काय ? ‘ ती बोलली.
‘ आलं हे येडं बाहेर ! ‘ दुसरी म्हणाली .
त्या दोघी मोकळ्याच होत्या . त्यांना वेळच वेळ होता .
पहिली म्हणाली , ‘ हे आधीच नादिष्ट ! त्यात माबोकरांनी याला घराकडे बघायची सवय लावलीये आणि हे बघतं पहिलीच्या पोरासारखं ! - रघू घर बघ. बूड खाजवायचं विसरेल पण घराकडे बघायचं नाही.

विषय: 

Pages

Subscribe to RSS - मायबोली गणेशोत्सव २०२२