अंगणात येऊन रघूने गेले सहा महिने बंद असलेल्या शेजारच्या घराकडे सवयीने पाहिले आणि .....
तिच्याशी नजरभेट झालीच. ती गोरी, घारी आकर्षक नवयौवना बघताक्षणी भुरळ पडेल अशी. रघुच्या तारुण्यसुलभ भावना तिला बघून उफाळून येत. तिला पटवावं , तिच्यामार्फत या शेजारच्या घरात प्रवेश मिळवावा आणि तिच्यासह सुखेनैव जीवन व्यतीत करावं हे उरी बाळगलेलं स्वप्न रघूचं.
त्या दिवशी 'ती' देखील रघूला लाडीक प्रतिसाद देत होती. त्याच उन्मादात रघू निघाला, तिच्या दिशेने.... कुंपणावरुन उडी टाकत तिच्यापर्यंत तो आता पोहोचणारच होता , इतक्यात....
हस्तलेखन स्पर्धा २०२२
मोठा गट : ब
नाव : साक्षी

खरं तर कॉलेजच्या दिवसांबद्दल लिहिण्यासारखं माझ्याकडे काही आहे असं वाटत नव्हतं. पण फारेण्ड यांचा लेख वाचला आणि मन एकदम....... ( फारेण्ड यांच्याच त्या ठोकळेबाज उपमावाल्या लेखातून वाक्य पूर्ण करा).
तर फारेण्ड-लेख वाचताना मला एकदम कॉलेजातल्या आणि आंतरमहाविद्यालयीन स्पर्धा आठवल्या. पदवीच्या पहिल्या वर्षाला गेल्यावर म वा मंच्या कार्यक्रमांना हजेरी लावायला सुरुवात केली. एकदा कधीतरी उत्स्फूर्त वक्तृत्व स्पर्धेसाठी नाव दिलं. बोलायचा नंबर लागायच्या दोन तीन मिनिटे आधी विषयाची चिठी उचलून शेजारच्या रिकाम्या वर्गात जाऊन विचार करायला वेळ दिला होता.
अंगणात येऊन रघूने गेले सहा महिने बंद असलेल्या शेजारच्या घराकडे सवयीने पाहिले आणि अंगणात उभी नवयौवना पाहुन मोहरणे, बहरणे अशा नानाविध भावना त्याच्या कोमल अंतकरणात दाटुन आल्या. गेली बारा वर्षे वधुसंशोधनात झालेली वणवण डोळ्यासमोर तरळली, वनवासच जणु..
"कॉलेजला जाण्याऐवजी घरकाम करते वाटतं, बिचारी. राणीसारखं ठेऊ तिला. सगळ्या गावाला निमंत्रण देऊ लग्नाचं. मला पोपटलाल म्हणता काय." रघू मोठ्या उत्साहात तिच्याशी ओळख करायला निघाला.
"मम्मी.. हा घे तुझा संतुर." कुठुनतरी एक चिमुरडी नवयौवनेकडे धावत गेली.
ती आली, तिने पाहिलं, तिने जिंकलं … नाही नाही काहीतरी चुकतय. म्हणजे तिने जिंकलं हे बरोबर पण ती यायच्या आधीच तिने जिंकलं होतं. आधी नुसतेच तिच्याबद्दल कळले. काही न कळतावळता कनेक्षन जुळले आणि तिने जिंकले. मग ती आली आणि तिने पाहीले.. असा सिक्वेन्स आहे इथे.
ती म्हणजे माझी धाकटी, आमच्या घरचं शेंडेफळ आणि आमचं चार पायांचं फरी बाळ.
माझा इतकी वर्ष जुन्या दम्यासारखा चिकटलेला 'ॲनिमल फोबिया' एका पंजात दूर करायचं श्रेय तिलाच.
बर्याच दिवसांनी दोघींना मोकळा वेळ मिळाला होता. नाही म्हटले तरी काही वर्षे लोटली होती. पूलाखालुन बरेच पाणी वाहून गेले होते. अचानक एकीचे लक्ष तिकडे गेले.
"अरे हे काय....डेल्टा, एकेकाळी काय दाणादाण उडवून दिली होतीस इथे तू."
" माझी दहशत कशी विसरेन?. क्षुल्लक विषाणू मी पण सार्या दुनियेला जेरीस आणले. प्राणवायूअभावी, इन्जेक्शनाविना किती जीव गेले, काही गणतीच नाही. तू पण साथ दिलीस , संसर्ग पसरवायला ओमिक्रॉन".
बऱ्याच दिवसांनी दोघींना मोकळावेळ मिळाला होता. नाही म्हटले तरी काही वर्षे लोटली होती. पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले होते. अचानक एकीचे तिकडे लक्ष गेले. अरे हे काय ..
"इथे सायकल ट्रॅक झालाय की. पुर्वी असेच रस्त्यातून जिथे मिळेल तिथे आपण सायकल चालवत असू नाही." पहिली म्हणाली.
"हो ना.. आणि किती खेळ खेळत असू या बागेत. तु तर शाळेतपण खेळात अव्वल होतीस आणि तो अपघात. " दुसरीने खिन्नपणे मान हलवली.
ए ती बघ पॅरालिम्पिक चॅम्पियन ! चल आपण सेल्फी घेऊया ! बागेत आलेला मुलांचा घोळका पहिलीच्या भोवती जमला.
खरतर हा लेख कॉलेजचे मोरपिशी दिवस आणि त्या मोरपीसांची पिसं काढणे म्हणून खपेल
. आम्ही काही 'चार चौघीत उठून / बसून/ कस का होईना पण दिसते' कॅटेगरीतही मोडत नसल्याने आमच्या वाटेला 'मनाला गुदगुल्या' करणाऱ्या स्वतः बाबतच्या आठवणी तशा फार फार कमीच.
बर्याच दिवसांनी दोघींना मोकळा वेळ मिळाला होता. नाही म्हटले तरी काही वर्षे लोटली होती. पूलाखालुन बरेच पाणी वाहून गेले होते. अचानक एकीचे लक्ष तिकडे गेले. अरे हे काय .......
सगळीकडे एकच आवाज ऐकू येत होता -
मेरे प्यारे देशवासियो....
पिछले दशकों में हम यह अनुभव कर रहे हैं कि देश में भ्रष्टाचार और काला धन जैसी बीमारियों ने अपनी जड़े जमा लीं हैं और देश से गरीबी हटाने में ये भ्रष्टाचार, ये काला धन....
काला धन नाव ऐकून पाचशे हजारच्या नोटेवरती भितीचा थंड शहरा जो काही वर्षापुर्वी उमटला होता तीच अवस्था आज दोन हजार आणि पाचशेच्या नोटांची पुन्हा एकवार झाली.
अंगणात येऊन रघूने गेले सहा महिने बंद असलेल्या शेजारच्या घराकडे सवयीने पाहिले आणि…
लहानपणी याच घराच्या दारातून कितीदा आतबाहेर केले. ज्या घराने रघूला आजपर्यंत जगवले, ते घर नानींच्या जाण्याने अनाथ, एकाकी झाले होते.
रघूला वाटले, घर त्याच्याशी बोलतेय. त्याला बोलवतेय. जुन्या, भेगाळलेल्या भिंतिवरुन हात फिरवताना त्याला नानीची पावले आठवली. अनाथ रघूला पोटच्या पोरासारखी माया देणारी नानी. नानी, तु कधी माणसामाणसात फरक केला नाहीस. तु गेलीस. जाताना हे घर तु मला दिलेस. सहा महिन्यात दार ऊघडुन आत जायची माझी हिम्मत झाली नाही. आज या घराने मला बोलावलयं.