कथाशंभरी २- परंपरा - Emerald

Submitted by -शर्वरी- on 8 September, 2022 - 03:57

अंगणात येऊन रघूने गेले सहा महिने बंद असलेल्या शेजारच्या घराकडे सवयीने पाहिले आणि…

लहानपणी याच घराच्या दारातून कितीदा आतबाहेर केले. ज्या घराने रघूला आजपर्यंत जगवले, ते घर नानींच्या जाण्याने अनाथ, एकाकी झाले होते.

रघूला वाटले, घर त्याच्याशी बोलतेय. त्याला बोलवतेय. जुन्या, भेगाळलेल्या भिंतिवरुन हात फिरवताना त्याला नानीची पावले आठवली. अनाथ रघूला पोटच्या पोरासारखी माया देणारी नानी. नानी, तु कधी माणसामाणसात फरक केला नाहीस. तु गेलीस. जाताना हे घर तु मला दिलेस. सहा महिन्यात दार ऊघडुन आत जायची माझी हिम्मत झाली नाही. आज या घराने मला बोलावलयं.

मनात काहीतरी ठरले.पावले घराकडे वळली. नानी-रघूचे घर आता अनाथांचे घर होणार होते.

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

छान !