Submitted by आशिका on 8 September, 2022 - 08:54
बर्याच दिवसांनी दोघींना मोकळा वेळ मिळाला होता. नाही म्हटले तरी काही वर्षे लोटली होती. पूलाखालुन बरेच पाणी वाहून गेले होते. अचानक एकीचे लक्ष तिकडे गेले.
"अरे हे काय....डेल्टा, एकेकाळी काय दाणादाण उडवून दिली होतीस इथे तू."
" माझी दहशत कशी विसरेन?. क्षुल्लक विषाणू मी पण सार्या दुनियेला जेरीस आणले. प्राणवायूअभावी, इन्जेक्शनाविना किती जीव गेले, काही गणतीच नाही. तू पण साथ दिलीस , संसर्ग पसरवायला ओमिक्रॉन".
"खरंय, मनुष्यवधाचं पातक नाही घेतलं मी शिरी. पण या मानवांनी परिश्रमांती आपल्याला हद्दपार केलंच . ज्या कोविड सेन्टरमध्ये मृत्यूचे तांडव झाले तिथे आज गणेशोत्सवाचा मण्डप दिमाखात उभा राहिलाय, वाईटावर चांगल्याने विजय मिळतोच हे अधोरेखित झालंय."
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
सह्हीच. मस्त कथा.
सह्हीच. मस्त कथा.
मस्त जमलीयं कथा..
मस्त जमलीयं कथा..
फार मस्त! आवडलीच
फार मस्त! आवडलीच
मस्त!
मस्त!
छान आहे
छान आहे
छान जमलीये, पॉझिटिव्ह
छान जमलीये, पॉझिटिव्ह