मायबोली गणेशोत्सव २०२२
कथाशंभरी - सावली - निकु
तिचे आवडतीचे अत्तर सकाळपासून पासून सापडत नव्हते. इथेच तर कपाटात असते नेहमी आजच नेमके कसे हरवले माझ्या हातून.. आताशा वेंधळेपणा वाढला आहे खरा ! रामकाकांचे स्वगत चालले होते!
तिची आठवण म्हणून दर पाडव्याला बाहेर काढतो ती कुपी.. मग आज गेली कुठे. तो सुवास म्हणजे जणू तिचे अस्तित्त्वच!
खुर्चीत बसल्या बसल्याच आठवणींनी डोळे मिटले आणि हे काय... तोच सुगंध.. तोच दरवळ, तिचाच आभास!
बाबा, कशी दिसतेय मी ? लेकीच्या आवाजानी काकांनी डोळे जरा किलकिले केले. आज आईचा शालू नेसले तेंव्हा हे अत्तर सापडले.. छानेनै ?
खरंच, मुलीला आईची सावली उगाच म्हणत नाहीत!
काका प्रसंन्न हसले.
कथाशंभरी -एक ही भूल - निल्सन
बर्याच दिवसांनी दोघींना मोकळा वेळ मिळाला होता. नाही म्हटले तरी काही वर्षे लोटली होती. पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले होते. अचानक एकीचे लक्ष तिकडे गेले. "अरे हे काय आज बिछडे यार भेटण्याचा योग आहे वाटतं" ती दुसरीला बघत म्हणाली.
म्हणजे? दुसरीने विचारले.
"अगं तो बघ ना तिकडे. खरंतर तुला आता सांगायला हरकत नाही. आपल्या farewell पार्टीच्यावेळी तो आणि मी गपचूप पार्टीमधून बाहेर सटकलो होतो आणि संपूर्ण रात्र आम्ही दोघे एकत्र होतो." तिने डोळे मिचकावत सांगितले.
साला, त्यानंतर तो पुन्हा भेटलाच नाही. कुठे असतो काय माहित? अरे कुणालातरी शोधतोय वाटतं तो इथे?
कथाशंभरी२ - प्रस्थान - मामी
अंगणात येऊन रघूने गेले सहा महिने बंद असलेल्या शेजारच्या घराकडे सवयीने पाहिले आणि लगबगीने तो चावी घेऊन त्या घरात गेला.
गेल्यागेल्या त्याने दार आतून व्यवस्थित लावून घेतले आणि तो थेट शेवटच्या खोलीत गेला. खोलीला एक भलीमोठी काचेची खिडकी होती.
रघूने अंगावरचे कपड्यांचे थर ओरबाडून काढून टाकले, घड्याळात बघून काहीएक आकडेमोड केली आणि समोरच्या फडताळाचे दार उघडून त्यातील चोरकप्प्यातील एक कळ दाबली.
आवाज न करता घर वर उचलले गेले आणि अंतराळात झेपावले. पृथ्वीवरचे काम संपवून आज रघू तब्बल ५०० पृथ्वीवर्षांनी त्याच्या मातृग्रहाकडे परत जात होता.
कथाशंभरी २-रखवालदार-प्राचीन
अंगणात येऊन रघूने गेले सहा महिने बंद असलेल्या शेजारच्या घराकडे सवयीने पाहिले आणि .....
स्वतःशीच मान हलवली. बिलालला निरोप द्यायला हवा आता.
RDX. इथून काढण्यासाठी खास माणसं घेऊन रसूल एक -
कथाशंभरी- मगल- शर्मिला आर.
कथाशंभरी- मगल- शर्मिला आर.
बर्याच दिवसांनी दोघींना मोकळा वेळ मिळाला होता. नाही म्हटले तरी काही वर्षे लोटली होती. पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले होते. अचानक एकीचे लक्ष तिकडे गेले. अरे हे काय .......
“अजूनही कुठे कोपर्यात झाडू दिसला, की तो घेऊन उडावसं वाटतं नं..? विसरायला होतं.. व्होलडयामोर्ट च्या पाडावानंतर आपण सगळ्यांनी मगलचं आयुष्य स्वीकारलेय.. पण ह्या बेशिस्त वाहतुकीत गाडी चालवायला अगदी नको नको वाटतं....”
हस्तलेखन स्पर्धा - मोठा गट - पल्लवी ०९
कित्येक वर्षांनी मराठीतून लिखाण झाले. अक्षर फारच कसंतरी आहे पण मराठी लिहून मस्त वाटलं .
हस्तलेखन स्पर्धेसाठी मला ही कविता आठवली. मला वाटते बालभारतीच्या इयत्ता ८वी च्या पुस्तकात होती. श्री. सुरेश भट ह्यांनी लिहिलेली हे कविता बहुदा त्या वयातच योग्य होती. एरवी सुरेश भट हे माझे अत्यंत आवडते लेखक/कवी/गझलकार आहेत पण आज लिहिण्याच्या निमित्ताने पुन्हा नीट वाचली आणि जरा बळंच शब्दरचना आणि भावार्थ वाटला! असो!
कथाशंभरी - हौस - प्राचीन
बर्याच दिवसांनी दोघींना मोकळा वेळ मिळाला होता. नाही म्हटले तरी काही वर्षे लोटली होती. पूलाखालुन बरेच पाणी वाहून गेले होते. अचानक एकीचे लक्ष तिकडे गेले. अरे हे काय ......
" तुझ्या अंगावर हा मोठ्ठा डाग कसला " पैठणीची शंका.
" छकुली मुलुखाची धांदरफळी. भाजी सांडलीन्. म्हणून तर इथे यावं लागलं ना. आता धुलाई नक्कीच होणार.पण तू इथे कशी "नारायणपेठी उत्सुकता.
"सुरकुत्या जाऊन तरूण व्हायला. हीःहीः. ते बोटॉक्स का काय म्हणतात ना तसं काहीसं." पैठणी.
"काही का असेना, आपण कपाटातून बाहेर तर आलो या निमित्ताने.
कथाशंभरी - २ - सानी - मोरोबा
अंगणात येऊन रघूने सवयीने गेले सहा महिने बंद असलेल्या शेजारच्या घराकडे पाहिले आणि तिथे चूळ फेकायला उघडलेला त्याचा जबडा तसाच राहिला.
दाराला कुलूप नव्हते. चुळा, पिचकार्यांनी भरलेले अंगण कोणीतरी स्वच्छ धुवून काढले होते. तुळशीला पाणी दिले होते. याच वृंदावनावर डोके आपटून राधाक्कांनी....
दार करकरले आणि सानी बाहेर आली. कुंकू, मंगळसूत्र ल्यालेली. रघूला पाहून क्षणभर चरकली. मग तिने खालचा ओठ गच्च दाताखाली दाबला, पदर कमरेला खोचला, आणि सणसणीत आवाज दिला,
'राघोबानाना, पुन्हा या अंगणात घाण केलीत तर तोंड फोडीन'
कथाशंभरी - २ - गोष्ट-शंभर शब्दांची, अगणित अर्थाची
'शशक' उपक्रमास मिळणारा प्रतिसाद पहाता, संयोजकांनी अजुन एक, शशक सुरुवात करुन देण्याचे योजलेले आहे. तेव्हा रसिक आणि चोखंदळ मायबोलीकर उदंड प्रतिसाद देतीलच अशी आशा करतो आहोत. ही सुरुवात पुढे खुलवून आणि शेवट करून तुम्हाला पूर्ण करायची आहे आणि कथेला साजेसे असे शीर्षक द्यायचे आहे. एक आयडी कितीही प्रकारे कथा पूर्ण करू शकतो.
धाग्याचे शीर्षक कथाशंभरी - २ - कथेचे शीर्षक - मायबोली आयडीचे नाव असे असावे. हा उपक्रम आहे , स्पर्धा नाही. प्रत्येक प्रवेशिकेला "मायबोली गणेशोत्सव २०२२" अशी शब्दखूण द्यावी.
कथेची सुरुवात -
Pages
