साड्या

कथाशंभरी - हौस - प्राचीन

Submitted by प्राचीन on 4 September, 2022 - 22:32

बर्‍याच दिवसांनी दोघींना मोकळा वेळ मिळाला होता. नाही म्हटले तरी काही वर्षे लोटली होती. पूलाखालुन बरेच पाणी वाहून गेले होते. अचानक एकीचे लक्ष तिकडे गेले. अरे हे काय ......
" तुझ्या अंगावर हा मोठ्ठा डाग कसला " पैठणीची शंका.
" छकुली मुलुखाची धांदरफळी. भाजी सांडलीन्. म्हणून तर इथे यावं लागलं ना. आता धुलाई नक्कीच होणार.पण तू इथे कशी "नारायणपेठी उत्सुकता.
"सुरकुत्या जाऊन तरूण व्हायला. हीःहीः. ते बोटॉक्स का काय म्हणतात ना तसं काहीसं." पैठणी.
"काही का असेना, आपण कपाटातून बाहेर तर आलो या निमित्ताने.

पुस्तकात नामोल्लेख!

Submitted by नीधप on 24 June, 2012 - 01:50

दिल्लीस्थायिक रिता कपूर या गेली अनेक वर्ष भारतीय साड्यांच्या संदर्भात संशोधन, दस्ताऐवजीकरण याचे काम करत आहेत.

'सारीज ऑफ इंडीया' या नावाने हे सर्व काम त्यांनी दोन खंडांमधे प्रकाशित केले आहे. दुसरा खंड नुकताच प्रकाशित झाला. या दुसर्‍या खंडा महाराष्ट्रातील साड्यांबद्दल विवेचन आहे.
मराठी साड्यांच्या विविध प्रकारच्या नेसण पद्धतींबद्दल विवेचन असलेल्या भागामधे माझा उल्लेख आहे.

विषय: 
Subscribe to RSS - साड्या