पुस्तकात नामोल्लेख!

Submitted by नीधप on 24 June, 2012 - 01:50

दिल्लीस्थायिक रिता कपूर या गेली अनेक वर्ष भारतीय साड्यांच्या संदर्भात संशोधन, दस्ताऐवजीकरण याचे काम करत आहेत.

'सारीज ऑफ इंडीया' या नावाने हे सर्व काम त्यांनी दोन खंडांमधे प्रकाशित केले आहे. दुसरा खंड नुकताच प्रकाशित झाला. या दुसर्‍या खंडा महाराष्ट्रातील साड्यांबद्दल विवेचन आहे.
मराठी साड्यांच्या विविध प्रकारच्या नेसण पद्धतींबद्दल विवेचन असलेल्या भागामधे माझा उल्लेख आहे.

सुमारे पाच-सहा वर्षांपूर्वी नऊवार साडी नेसायच्या पद्धतींबद्दल बरीच माहिती मी त्यांना दिली होती. प्रात्यक्षिके दाखवली होती जी त्यांच्या फोटोग्राफरने शूट केली होती. त्यांना माझ्या ओळखीच्या कातकरी आणि ठाकर वस्त्यांमधे घेऊन जाऊन तिथे आम्ही त्या साड्या शिकलो होतो. त्या स्त्रियांच्या मर्यादेला धक्का न लावता जेवढे फोटो काढणे शक्य होते तेवढे काढले होते. ओळखीच्या कोळी आणि आगरी समाजातल्या स्त्रियांकडे जाऊनही त्यांची साडी नेसण्याची पद्धती शिकलो होतो, फोटो काढले होते. मला खूप मजा आली होती हे सगळं करताना. माझ्याकडची माहिती/ ज्ञान देताना मीही खूप शिकले होते.

या सगळ्याचा परिपाक म्हणजे त्या पुस्तकात आलेला माझ्या नावाचा उल्लेख.

मला कल्पना आहे की इथले जे दणदणीत यश मिळवणार्‍यांबद्दल सांगणारे जे बाफ आहेत ते बघता हे काहीच नाहीये. पण एखाद्या संशोधनात्मक पुस्तकात आपली नोंद एका छोट्याश्या गोष्टीत का होईना एक्स्पर्ट म्हणून केली जाणे हे माझ्यासाठी पहिल्यांदाच झाले आहे आणि त्यामुळेच बहुतेक मला महत्वाचे वाटते आहे. Happy

ह्या बाफची योग्य जागा जिथे असेल तिथे अ‍ॅडमिनने हलवावे. बाफच योग्य न वाटल्यास उडवून टाका. काही हरकत नाही.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

नीधप ,आपले मनःपूर्वक अभिनंदन.

सारी ड्रेप करणे यात ''शायनी एन.सी. या सुद्धा तज्ञ मानल्या जातात असे ऐकून आहे.

त्यांचे नाव आणि काम खूप मोठे आहे.
जास्त करून नवीन प्रकारचे वेगवेगळे ड्रेप्स तयार करणे यामधे प्रभुत्व मानले जाते.
त्या फॅशन डिझायनर आहेत. नवीन प्रकारच्या पद्धती जगापुढे आणणे हे फॅशन डिझायनर करत असतो.

शाबास नी! अभिनंदन!

>>>> एखाद्या संशोधनात्मक पुस्तकात आपली नोंद एका छोट्याश्या गोष्टीत का होईना एक्स्पर्ट म्हणून केली जाणे हे माझ्यासाठी पहिल्यांदाच झाले आहे आणि त्यामुळेच बहुतेक मला महत्वाचे वाटते आहे. >>>> हे महत्त्वाचे आहेच. Happy विविध समाजाच्या साड्या नेसण्याच्या पारंपारीक पद्धतीचा एक दस्तावेज तयार झाला आणि त्यात तुझाही वाटा आहे, ही अभिमानाची गोष्ट आहे.

माझ्याकडूनही अभिनंदन !
रिता कपूर यांचे कामही कौतुकास्पद आहे. आपण भारतीय आपल्या असंख्य गोष्टींचे दस्तावेजीकरण करण्यात कमी पडतो, असा अनुभव आहे. या पार्श्वभूमीवर 'सारीज ऑफ इंडिआ' हा प्रयत्न उल्लेखनीय आहे.

नीधप ,आपले मनःपूर्वक अभिनंदन.
आपल्या कार्यक्षेत्रात आपली अशीच उत्तरोत्तर प्रगति होवो ही सदिच्छा.

सर्वांचे आभार.
सेना, मार्केटमधे आहे उपलब्ध. कुठे नक्की मिळेल ते जरा बघून सांगते.

रिता कपूर यांचे कामही कौतुकास्पद आहे. <<
त्यांच्या दिल्लीच्या ऑफिसमधे या सगळ्या कामासाठी त्यांनी मांडलेला पसारा, एकेक गोष्टीचा बारकाईने अभ्यास आणि पूर्ण उत्तरे मिळेतो एकेका मुद्द्याचा पाठपुरावा करणे हे सगळं बघून मी थक्क झाले होते. प्रचंड शिकण्यासारखं आहे ते सगळं.

आपण भारतीय आपल्या असंख्य गोष्टींचे दस्तावेजीकरण करण्यात कमी पडतो, <<< लाखो टक्के खरी गोष्ट.

अभिनंदन!

(मागे 'साड्यांची वर्णने असलेली मराठी गाणी' कोणती अशी विचारणा केली होती, ती यांच संदर्भात होती का?)

Pages