पुस्तकात नामोल्लेख!

Submitted by नीधप on 24 June, 2012 - 01:50

दिल्लीस्थायिक रिता कपूर या गेली अनेक वर्ष भारतीय साड्यांच्या संदर्भात संशोधन, दस्ताऐवजीकरण याचे काम करत आहेत.

'सारीज ऑफ इंडीया' या नावाने हे सर्व काम त्यांनी दोन खंडांमधे प्रकाशित केले आहे. दुसरा खंड नुकताच प्रकाशित झाला. या दुसर्‍या खंडा महाराष्ट्रातील साड्यांबद्दल विवेचन आहे.
मराठी साड्यांच्या विविध प्रकारच्या नेसण पद्धतींबद्दल विवेचन असलेल्या भागामधे माझा उल्लेख आहे.

सुमारे पाच-सहा वर्षांपूर्वी नऊवार साडी नेसायच्या पद्धतींबद्दल बरीच माहिती मी त्यांना दिली होती. प्रात्यक्षिके दाखवली होती जी त्यांच्या फोटोग्राफरने शूट केली होती. त्यांना माझ्या ओळखीच्या कातकरी आणि ठाकर वस्त्यांमधे घेऊन जाऊन तिथे आम्ही त्या साड्या शिकलो होतो. त्या स्त्रियांच्या मर्यादेला धक्का न लावता जेवढे फोटो काढणे शक्य होते तेवढे काढले होते. ओळखीच्या कोळी आणि आगरी समाजातल्या स्त्रियांकडे जाऊनही त्यांची साडी नेसण्याची पद्धती शिकलो होतो, फोटो काढले होते. मला खूप मजा आली होती हे सगळं करताना. माझ्याकडची माहिती/ ज्ञान देताना मीही खूप शिकले होते.

या सगळ्याचा परिपाक म्हणजे त्या पुस्तकात आलेला माझ्या नावाचा उल्लेख.

मला कल्पना आहे की इथले जे दणदणीत यश मिळवणार्‍यांबद्दल सांगणारे जे बाफ आहेत ते बघता हे काहीच नाहीये. पण एखाद्या संशोधनात्मक पुस्तकात आपली नोंद एका छोट्याश्या गोष्टीत का होईना एक्स्पर्ट म्हणून केली जाणे हे माझ्यासाठी पहिल्यांदाच झाले आहे आणि त्यामुळेच बहुतेक मला महत्वाचे वाटते आहे. Happy

ह्या बाफची योग्य जागा जिथे असेल तिथे अ‍ॅडमिनने हलवावे. बाफच योग्य न वाटल्यास उडवून टाका. काही हरकत नाही.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

निरजा , हे पुस्तक मी पाहिलय मुंबैच्या एअरपोर्ट वर. मस्त पुस्तक होत. अभ्यासपुर्ण. आता पुढच्या वेळी तुझ नाव पण पाहिन. आभिनंदन!

नीरजा, अभिनंदन! पुस्तक इन्टरेस्टिंग वाटतेय. कव्हर फोटो अन जमल्यास डीटेल परिचय इथे टाकलस तर बेस्टच.

हार्दिक अभिनंदन !
आणखी काही दिवसांनी "नीधप यांनी लिहिलेल्या पुस्तकात माझा नामोल्लेख" असा एक धागा याची देही याची डोळा पहावयास मिळो हीच प्रार्थना !

.

खूप खूप अभिनंदन, निधप.
एकदम वेगळा विषय आहे. खूप दिवसांपूर्वी मित्रांमध्ये गप्पा मारतांना हा मुद्दा आला होता. पूर्वी म्हणजे मुस्लिम आक्रमणाआधी आपल्याकडे स्त्रिया साडी आणि पुरुष धोतर निर्‍या पाडून व खोचून नेसत असत. शिवण्याची कला मुस्लिमांकडून आली, असा काहीसा तो मुद्दा होता. याबाबत जाणकारांकडून आणखी माहिती वाचायला आवडेल.

Pages