तर मंडळी धमाल गाणी या सदरात तुमच्यातला कवी मोकाट सुटलेला आहे. हास्याचे तुषार सतत उडत आहेत,
हास्याचा आणि मनोरंजनाचा हा धबधबा असाच चालू राहण्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत ,"धमाल गाणी - भाग-२ "
यात पहिली एक किंवा दोन ओळी हिंदी गाण्याच्या नंतरच्या स्वरचित
उदा -
रुप तेरा मस्ताना, प्यार मेरा दीवाना,
नीट बस नाही तर खुर्ची मोडेल बसताना
किंवा
सावन का महिना , पवन करे शोर
चकली नाही तुटणार तू किती पण दे जोर.
तर चालू करा काव्यसागरात डुंबणे.

आरती आणि प्रसादाला नक्की या! गणपती बाप्पा मोरया !
नमस्कार मायबोलीकर,
ज्या आतुरतेने तुम्ही बाप्पाची प्रतीक्षा करत होतात ती आता संपली आहे. टाळ, मृदूंगाच्या नादात, गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषात बाप्पाचे आगमन झाले आहे. मागील कित्येक दिवस तुम्ही बाप्पाच्या आगमनाच्या , सजावटीच्या कामात मग्न झाले असाल. त्यामुळे जर तुम्हाला काही थकवा आला असेल तर तो बाप्पाचे लोभसवाणे रूप पाहून कधीच निघून गेला असेल. मन एकदम प्रसन्न होऊन अंगात नवचैतन्य आल्यासारखे वाटले असेल.
आजचा विषय:- मेंदी ,टॅटू
मनभावन हा श्रावण... श्रावणातला पहिला सण म्हणजे नागपंचमी. मागोमाग सण उत्सवांची लगबग सुरू होते आणि रोजच्या धबडग्यातून वेळ मिळताच मेंदीचा कोन मिळवला जातो. मेंदीचा तो वेडावून टाकणारा गंध आणि सुबक रेखाटनं यांनी हात सजतात. लग्न समारंभात तर मेंदीचा सोहळाच साजरा होतो. आपणही सगळ्यांनी कधी ना कधी मेंदी काढलीय तर कधी काढून घेतलीय.

बाप्पाचा आवडता पदार्थ मोदक असला तरी आपण मनापासून अर्पण केलेला नैवेद्य बाप्पाला आवडतोच
अशा आपल्या आवडत्या बाप्पाचे १० दिवस कोडकौतुक पुरवण्यात आपण कोणतीच कसर बाकी ठेवत नाही.
घरोघरी आपापल्या पद्धतीने नैवेद्याचे प्रकार बनतात आणि मग चांगला व नेहमीपेक्षा वेगळा नैवेदय सर्वांना फोटो काढून दाखवावासा वाटणारच ना!
मायबोलीकरहो, जसा आपल्यासर्वांमध्ये एक गायक दडलेला असतो आणि जेव्हा कोणी पहात नसते तेव्हा तो बाहेर पडतो. तसेच एक कविमनही प्रत्येकात दडलेले असते. तर आज त्या कविमनाला प्रतिभेच्या गगनी, मुक्त भरारी घेउ द्या .चला तर माबोकर - कवि, नवकवि, उदयोन्मुख कवि, होतकरु कवि, हौशेगवशे कवि आणि अन्य सर्वही, होउन जाऊ द्यात धमाल. आपल्या प्रतिभेच्या धुंवाधार प्रपातामध्ये सर्वांना दंग होउ द्यात. .
आजचा धमाल विषय आहे - मराठी गाण्यांच्या २ ओळी व मग त्यांना जोडून स्वरचित २ ओळी
उदाहरणार्थ -

"श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहिकडे,
क्षणात येती सर सर शिरवे क्षणात फिरुनि ऊन पडे" - बालकवी