Submitted by संयोजक on 1 September, 2022 - 12:28
तर मंडळी धमाल गाणी या सदरात तुमच्यातला कवी मोकाट सुटलेला आहे. हास्याचे तुषार सतत उडत आहेत,
हास्याचा आणि मनोरंजनाचा हा धबधबा असाच चालू राहण्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत ,"धमाल गाणी - भाग-२ "
यात पहिली एक किंवा दोन ओळी हिंदी गाण्याच्या नंतरच्या स्वरचित
उदा -
रुप तेरा मस्ताना, प्यार मेरा दीवाना,
नीट बस नाही तर खुर्ची मोडेल बसताना
किंवा
सावन का महिना , पवन करे शोर
चकली नाही तुटणार तू किती पण दे जोर.
तर चालू करा काव्यसागरात डुंबणे.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
आता हाच एक धागा कुठे मोकळा
आता हाच एक धागा कुठे मोकळा सोडता मायबोलीकरांनो. द्या इथे काही प्लीज-
चाल - हे गाणे!
रssघू रssघू
रssघू रssघू
रघू रघू रघू रघू
रघू रघू रघू रघू
यह रघू रघू क्या है यह रघू रघू
यह रघू रघू क्या है यह रघू रघू
जब माबो पे कोई धागा निकला तो
आयडीज ने कहा रघू रघू, रघू रघू
संयोजक ने लाई शश स्पर्धा
तो बोली जनता रघू रघू, रघू रघू
जब कोई घराकडे बघता है
अंगनामे सवयीने येता है
तो दिल करता है रघू रघू, रघू रघू
यह रघू रघू, क्या है, यह रघू रघू,
रघू का मतलब राडा कर तू , राडा कर तू
रघू का मतलब राडा कर तू , राडा कर तू
(कार्यबाहुल्याने रघूकडे दुर्लक्षच झाले. रघूकडे लक्ष वेधल्याबद्दल सस्मित आणि अस्मिता यांना सादर अर्पण!
)
भोलिभाली लडकी...
भोलिभाली लडकी...
दोन दात किडकी
चार दात पडकी... ओ ओ ओ
(लहानपणी म्हणायचो. ते ऐकून एका भोलीभाली लडकीने आमचे चार दात पाडले.)
दोघेही
लोना, तुझ्या सगळ्या उखाण्यांना हे वेडंवाकडं विडंबन भेट.
माबोकर्स:
कभी तू छलिया लगता है, कभी दीवाना लगता है
कभी अनाड़ी लगता है, कभी आवारा लगता है
रघू:
तू जो अच्छा समझे ये तुझपे छोड़ा है
तेरा ये उत्सव भर का मैने शशक जोड़ा हैं
पास नहीं आना दूरही रहना
पास नहीं आना दूरही रहना
के तुझको ये सौगंध है
तेरे मुंह मे बडी दुर्गंध है...
#गुटखामुक्तभारत
बिचारा रघु
बिचारा रघु
रघ्घु बदनाम हुआ माबो तेरे लिये.
रघू का मतलब राडा कर तू , राडा
रघू का मतलब राडा कर तू , राडा कर तू >>
महान आहे हे!
रघू का मतलब राडा कर तू , राडा
रघू का मतलब राडा कर तू , राडा कर तू >> Biggrin महान आहे हे! +१११
रघू का मतलब राडा कर तू >>>
रघू का मतलब राडा कर तू >>>
इथे पण आला का रघू?
(No subject)
क्या है मेरा नाम ना पूछो
क्या है मेरा नाम ना पूछो
गिर जाएंगे जाम ना पूछो
कौन हूँ मैं ये जानके सबको
लग जाएगी थरथरी
दुनिया एक नंबरी , तो मैं कथाशंभरी
- इति रघू
रघूcool रीत उत्सव चली आयी
रघूcool रीत उत्सव चली आयी
शशक गेले पण धमालही आली
- अज्ञात
माय नेम इज रघु गोंसालविस
माय नेम इज रघु गोंसालविस
मैं इस घर मे अकेला हूं
शेजारका घर खाली, सब देते मुझको गाली,
मेरे पीछे पडी अख्खी मायबोली
जिसे मेरी याद आय, निकाले मेरी आयमाय
सब ने बनाया है मेरकू चारसोबीस
एक्सक्युज मी प्लीज!
भारीच मोरोबा
भारीच मोरोबा
बघ बघ बघ रघु कसं बुगु बुगु
बघ बघ बघ रघु कसं बुगु बुगु बोलतंय (कोणी तरी रघ्याचा बैल केला होता त्याला स्मरून)
धमाल आहे! हा खेळ रघू स्पेशल
धमाल आहे! हा खेळ रघू स्पेशल झालाय
(No subject)
(No subject)
मोरोबा
मोरोबा
अमेरिकेच्या पश्चिम किनार्
अमेरिकेच्या पश्चिम किनार्यावर आज रात्रीचे १२ वाजले की सर्व संपुष्टात येणार आणि रघूच्या सर्व करामतींचा अंत होणार ह्या भीतीने खालील काव्य प्रसवले आहे. अ'निरु'द्ध यांच्या एका धाग्याखाली हा प्रतिसाद दिला होता, पण इथेही सयुक्तिक ठरावा.
(अमेरिकेत) तरुण आहे रात्र अजुनी
रघु आता निजलास का रे?
बघ तुला पुसतोच आहे
पश्चिमेचा तो किनारा
द्वादशा घटिकेस आता
नाममात्र उरलास का रे
सांग ह्या माबोकरांच्या
उत्सवाला काय शशके!
पुर्वुनी बहु लाड त्यांचे
बहुरुपी ठरलास का रे
अजुनही शिजल्या न सगळ्या
शंभरीच्या गोष्ट-माला (कथाशंभरी उपक्रमात गोष्टींची एकापुढे एक अशी माळच लागली आहे - अशा अर्थाने)
घेउनी विविधांग रूपे
वेगळा नुरलास का रे
मस्त हपा!
मस्त हपा!