बर्याच दिवसांनी दोघींना मोकळा वेळ मिळाला होता. नाही म्हटले तरी काही वर्षे लोटली होती. पूलाखालुन बरेच पाणी वाहून गेले होते. अचानक एकीचे लक्ष तिकडे गेले. अरे हे काय .....
तिसरी आज इतक्यात?
तशा त्या रोजच भेटतात. मोकळा वेळ वगैरे शब्दांचे बुडबुडे! अंधार पडला की अनादि कालापासून रंगणारा खेळ सुरू!
अरे, चौथी पण आली, पाचवी, सहावी...
बर्याच दिवसांनी दोघींना मोकळा वेळ मिळाला होता. नाही म्हटले तरी काही वर्षे लोटली होती. पूलाखालुन बरेच पाणी वाहून गेले होते. अचानक एकीचे लक्ष तिकडे गेले. अरे हे काय...
लांबून एक मिशीवाला आडदांड तरूण आणि सोबत एक बारीक उंच मनुष्य इकडेच येताना दिसत होते. त्या चांडाळाने वसूलीला पाठवलेली माणसं तर नाहीत ना ही? तिच्या जाड चष्म्याआड डोळ्यातली ही भिती दुसरीने क्षणार्धात टिपली आणि लगबगीने धुणं वाळत घालायची काठी शोधायला ती धावली.
बर्याच दिवसांनी दोघींना मोकळा वेळ मिळाला होता. नाही म्हटले तरी काही वर्षे लोटली होती. पुलाखालुन बरेच पाणी वाहून गेले होते. अचानक एकीचे लक्ष तिकडे गेले. अरे हे काय .......
.........
"हे हरीण अगदी तुझा पाठपुरावाच करतंय गं ताई. " मैत्रेयीचा कौतुकभरला स्वर.
" अगं त्याच्या आईचं नि माझं फार गूज असे. काय करणार! स्वामींकडून मिळणाऱ्या आत्मज्ञानाच्या ओढीने तू आश्रमात केवळ देहाने उपस्थित आणि स्वामी तर नेहमीच ज्ञानयज्ञात गुंतलेले.शिष्यांनी वेढलेले.. . मला बापडीला तुम्हा दोघांशी जे बोलावंसं वाटे ते हरिणीजवळ सांगायची मी.. "
बर्याच दिवसांनी दोघींना मोकळा वेळ मिळाला होता. नाही म्हटले तरी काही वर्षे लोटली होती. पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले होते. अचानक एकीचे लक्ष तिकडे गेले. अरे हे काय .......
"इतक्यात तिसरीही आली?!" ती चकित होऊन उद्वेगाने म्हणाली.
"माझी जुळी बहीण आहे ती." दुसरी खिन्नतेने म्हणाली.
"म्हणजे दोघींबद्दलही कळतं का त्यांना?" पहिलीने इवलुसा प्रश्न विचारला.
"हो! आता सगळंच कळतं आधीच ताई!" तिसरी शांतपणे म्हणाली.
"काय तरी बाई एकेक नवीन! आमच्या वेळी असलं काही नव्हतं!" पहिली उद्गारली.
"पण मग तुला कसं इकडे आणलं?"
"माझ्या नशिबात दूध होतं गं बाई!"
भारताविषयी संस्कृत रचना शोधताना एकात्मता स्तोत्र मिळाले खरे परंतु ते तब्बल तेहतीस श्लोकांचे असल्याने ते न लिहिता, मी वेगवेगळ्या भारतविषयक श्लोकांचे येथे संकलन केले आहे.
अर्थात् भारतभूच्या गौरवासाठी शब्द अपुरे आहेत, याची जाणीव आहे.
उखाणा - नावातच सगळं आहे .
कविता, लावण्या, विडंबन करण्यात मायबोलीकर माहिर आहेतच. आता होऊदे जल्लोष गमतीदार उखाण्यांचा.
कुणी खावा पेरू, कुणी खावा डाळिंब
माबोवर मात्र सोलून द्यावं लागतं संत्र
डू आयडी हाताळायचं एकदा जमलं तंत्र
की मिळतो धागा भरकटवायचा मंत्र
कुणी म्हणा भारी पुण्याची मिसळ
कुणी म्हणा भारी मुंबईचा वडापाव
चला घ्या पटकन उखाणा, जास्त खाऊ नका भाव
नियमः
१) हा उपक्रम आहे, स्पर्धा नाही.
२) उखण्यात मायबोलीचे नाव येणे अपेक्षित आहे.
३) उखाणा मुख्यतः मराठी भाषेतच असावा... एखाददुसरा अमराठी शब्द चालू शकेल.
आजचा विषय आहे - साडी, शालू, पैठणी उंss हूंss अलवार आठवणी...
"ही कोणती गं साडी?"
" नाही का, वहिनीच्या भाचीच्या बारशाची आणि ती पुतण्याच्या मुंजीची."
" ही मोरपंखी मित्राच्या लग्नातली आणि ती चिंतामणी रंगाची मैत्रिणीच्या डोजेची."
बर्याच दिवसांनी दोघींना मोकळा वेळ मिळाला होता. नाही म्हटले तरी काही वर्षे लोटली होती. पूलाखालुन बरेच पाणी वाहून गेले होते. अचानक एकीचे लक्ष तिकडे गेले. अरे हे काय.. आणि तिने लेकीचा हात घट्ट पकडला. हसू क्षणार्धात मावळलं. चेहेराच काय अंगांग ताठर झालं. ती भिती/ घृणा होती का हादरल्याची भावना? तरळू लागला २२ वर्षांपूर्वीचा काळ. गरोदर असताना माहेरी आलेली तो दिवस. घरदार पेटण्याआधी काढलेला पळ. तीन वर्षाच्या मुलीचा नराधमांनी दगडावर आपटून घेतलेला जीव. अगदी कंसाने घेतल्यासारखा. तलवारी परजताना नाव मात्र कृष्णाचं. कलेवराची केलेली सामुहिक विटंबना! ही बेशुद्ध पडली म्हणून वाचली. पण भिती त्याची न्हवती.
आजचा विषय:- माझं झाड माझी आठवण