बर्याच दिवसांनी दोघींना मोकळा वेळ मिळाला होता. नाही म्हटले तरी काही वर्षे लोटली होती. पूलाखालुन बरेच पाणी वाहून गेले होते. अचानक एकीचे लक्ष तिकडे गेले. अरे हे काय .......
"केवढाल्या ह्या ज्वाळा दिसताहेत?" कुंतीच्या आवाजात थोडी भीतीची छ्टा.
" हो.. . मलाही आवाज येतोय झाडं पेटण्याचा," गांधारीने कानोसा घेतला.
भारतीय युद्धानंतर कालांतराने वानप्रस्थाश्रम स्वीकारून तपोवनात राहू लागलेले धृतराष्ट्र, गांधारी आणि त्यांच्या सेवेसाठी गेलेली कुंती..
वर्षानुवर्षे पूर्वस्मृतींनी व्याकूळ होत, तरीही धर्माचरण म्हणून परस्परांची सोबत करणाऱ्या जावा.... शंभर पुत्रांची आई असूनही अभागी असं गांधारीचं मातृत्व नि जन्मापासूनच सतत विजनवास सोसणारं कुंतीचं अस्तित्व..स्वदुःखापेक्षा कमी तीव्र भासणाऱ्या त्या वडवानलाच्या स्वागतासाठी एका वेगळ्याच स्थितप्रज्ञतेने दोघीही सज्ज झाल्या..
कथाशंभरी - स्वीकार - प्राचीन
Submitted by प्राचीन on 3 September, 2022 - 05:03
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
वा! खरंच मस्त जमली आहे.
वा! खरंच मस्त जमली आहे.
मस्तच जमली आहे.
मस्तच जमली आहे.
छान!
छान!
वा! छान!
वा! छान!
सुंदर..
सुंदर..
सुंदर..
छान!
छान!
छान!
छान!
छान आहे!
छान आहे!
वावे, ममो, स्वरुप, सस्मित,
वावे, ममो, स्वरुप, सस्मित,भरत, मानव, अ'निरु'द्ध, मंजूताई कौतुकाबद्दल आभारी आहे.
छान.
छान.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
सुंदर..
सुंदर..
ठीक!
ठीक!
छान जमलीय ही
छान जमलीय ही![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
सगळ्या कथांची विषय निवड छान
सगळ्या कथांची विषय निवड छान होती . वेगळ्या होत्या
स्वाती_आंबोळे, सोनालीस, ऋन्मे
स्वाती_आंबोळे, सोनालीस,देवकी, शर्मिला ऋन्मे.. ष, बिपिन सांगळे, धन्यवाद.
ओह! शेवट चटका लावणारा. शंभर
ओह! शेवट चटका लावणारा. शंभर शब्दात परिणामकारक लिहिलेत.