आजचा विषय आहे - साडी, शालू, पैठणी उंss हूंss अलवार आठवणी...
"ही कोणती गं साडी?"
" नाही का, वहिनीच्या भाचीच्या बारशाची आणि ती पुतण्याच्या मुंजीची."
" ही मोरपंखी मित्राच्या लग्नातली आणि ती चिंतामणी रंगाची मैत्रिणीच्या डोजेची."
कपाट उघडलं की नानाविध साड्या डोकावत असतात. या ना त्या प्रसंगानुरूप साड्या खरेदी चालूच असते. आपण कलकत्ता, बनारस, येवल्याला फिरायला किंवा कामानिमित्ताने गेलो की आवर्जून तिथून एक तरी साडी आणतोच. कधी साडीचा रंग आवडतो तर कधी काठ पदर खुणावतो. कधी एखादीचा पोत सुखावतो. असा हा आपल्या सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय. मग उघडा तुमची पोतडी आणि काढा एकेक साडी. मायबोली गणेशोत्सव 2022 मध्ये झब्बू खेळण्यासाठी.
तुम्हाला तुमच्याकडे असलेली जी प्रकाशचित्रं पूर्णपणे प्रताधिकार मुक्त करावयाची असतील, ती यात झब्बू म्हणून देणं अपेक्षित आहे.
१. ही स्पर्धा नसून खेळ आहे.
२. झब्बू म्हणून एका वेळेस एकच प्रकाशचित्र टाकावे.
३. प्रकाशचित्र हे प्रताधिकारमुक्त असावे व संयोजकांनी दिलेल्या विषयाशी सुसंगत असावे. प्रकाशचित्र कोलाज स्वरूपातले नसावे.
४. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकतो, मात्र सलग दोन झब्बू देऊ शकणार नाही.
५. सर्व प्रकाशचित्रे मायबोलीच्या 'प्रकाशचित्रविषयक धोरणा'चे पालन करणारी असावीत.
६. झब्बूंचा खेळ मायबोलीकरांचे स्वतःचे प्रकाशचित्रसंग्रह सादर करण्यासाठी तयार केला आहे. तेव्हा कृपया तुमच्या जवळची (मग ती तुम्ही अथवा तुमच्या कुटुंबीयांनी काढलेली) प्रकाशचित्रे सादर करा. आंतरजालावरून घेतलेली प्रताधिकारमुक्त चित्रे झब्बूमध्ये देऊ नयेत.
७.मायबोलीवरील प्रकाशचित्रांचे धोरण इथे (https://www.maayboli.com/node/47635) पाहा.
(No subject)
(No subject)
माझा लग्नातला शालू , नंतर
माझा लग्नातला शालू , नंतर डोजे ला तोच नेसले. लेकाच्या लग्नापर्यंत जपून ठेवायचा विचार आहे.
कलकत्ता, बनारस, येवल्याला
कलकत्ता, बनारस, येवल्याला फिरायला किंवा कामानिमित्ताने गेलो की आवर्जून तिथून एक तरी साडी आणतोच. >> कर्ता स्पष्ट करा हो - आपण आदरार्थी एकवचनी, अनेकवचनी, की तो?? कर्ता स्पष्ट असला की 'कर्मं' म्हणायचं की नाही ते कळतं....
वरच्या हिरव्या साड्यांना
वरच्या हिरव्या साड्यांना झब्बू.. डोहाळजेवणाची साडी खरेदी करतानाचा फोटो.. बहुतेक ह्याच उपक्रमासाठी आजपर्यंत जपून ठेवलेला
मस्त आहेत सगळ्यांच्या साड्या.
मस्त आहेत सगळ्यांच्या साड्या.
हिरव्या रंगात माझाही झब्बू.
इम्पल्स बाय हा प्रकार माझ्या हातून सहसा होत नाही. आवडलेल्या 'नाइस टु हॅव' कॅटेगरीतल्या गोष्टी कार्टमध्ये काही दिवस मुक्कामाला राहतात. त्यातल्या बर्याच यथावकाश गळूनही पडतात. ही एक साडी मात्र याला सणसणीत अपवाद. ती ऑनलाइन पाहिली आणि अक्षरशः तिच्या प्रेमात पडले! हवी आहे की नको, आत्ताच हवी आहे का, किंमत रीझनेबल वाटते आहे की नाही वगैरे प्रश्न शिवलेसुद्धा नाहीत! घेण्याआधीपासूनसुद्धा माझीच होती ती, माझ्यासाठीच विणली गेली होती!
लिनन मटेरिअल आहे, आणि माझ्या आवडत्या प्राजक्तफुलांचं हाताने केलेलं भरतकाम!
Barcelona, धन्यवाद . कर्ता
Barcelona, धन्यवाद . कर्ता लिहिला आहे.
स्वाती आंबोळे >>> छान साडी.
स्वाती आंबोळे >>> छान साडी. सायली राजाध्यक्ष सारीजमधली आहे का? अशीच एक साडी त्यांच्या कलेक्शनमधे पाहिली होती.
मजेशीर शीर्षक आहे. साडी, शालू
मजेशीर शीर्षक आहे. साडी, शालू, पैठणी नंतरचा तो "उंss हूंss" हा हम आपके है कौन मधला उंssहूंss आहे काय?
Masaba masaba.
Masaba masaba.
मस्त आहेत साड्या सगळ्यांच्या.
मस्त आहेत साड्या सगळ्यांच्या.
अमा, मसाबा कलेक्शन फ्रेश दिसतंय.
(No subject)
छान साड्या सगळ्यांच्याच,
छान साड्या सगळ्यांच्याच, बघायला मजा येतेय. प्राजक्त फुलांची आणि मसाबाची विशेष आवडल्या.
नाही, सायली राजाध्यक्षांकडची
नाही, सायली राजाध्यक्षांकडची नाही.
अमा, बोल्ड (कलर) ॲन्ड ब्यूटिफुल आहे साडी.
अमा, बोल्ड (कलर) ॲन्ड
अमा, बोल्ड (कलर) ॲन्ड ब्यूटिफुल आहे साडी.>> धन्यवाद. जस्ट लाइक द ओनर. मसबा मस बा पहिल्या सीझन मध्ये नीना जेव्हा फराहा खान कडे कामासाठी जाते तेव्हा तिने ही साडी नेसली आहे. मला ऑनलाइन साइट वर मिळाली. चार दिवसात पोस्टाने आलीपण. एकदा मसबा स्टुडिओत जायचे आहे.
अमांची साडी बोल्ड & ब्युटिफुल
अमांची साडी बोल्ड & ब्युटिफुल एकदम. आणि गळ्यातला हार एकदम अप्रतिम!!!
(No subject)
खणाची साडी!
खणाची साडी!
ती ठुशी पण मस्त आहे!
सुंदर आहे.क्लासिक हिरवा खण.
सुंदर आहे.क्लासिक हिरवा खण.
छान साड्या सगळ्यांच्याच.
छान साड्या सगळ्यांच्याच.
लग्नातील वधुवस्त्र.
लग्नातील वधुवस्त्र.
(No subject)
.
(No subject)
.
येवला पैठणी
येवला पैठणी
अमांची साडी बोल्ड & ब्युटिफुल
अमांची साडी बोल्ड & ब्युटिफुल ....मस्त.
अमा साडी फार फार आवडली. मसाबा
अमा साडी फार फार आवडली. मसाबा मसाबा च्या त्या एपिसोड मधे पण खुप्च आवडली होती. मसाबा च्या वेबसाईट वर जाउन पाहिलं तर बरीच महाग वाटली मला . माझ्या बजेट च्या बाहेर आहे.
दुसर्या कुठल्या वेबसाईटवर स्वस्तात कॉपी मिळाली तर नक्की घेइन
स्वाती, पारीजात फुलांची साडी पण सुरेख आहे. ऑनलाईन घेतली असेल तर लिंक शेअर कराल का ?
(No subject)
येवल्याहून मागवलेली पैठणी!
सुंदर साड्या!
सुंदर साड्या!
मलापण प्राजक्ताच्या फुलांची खूप आवडली.
मसाबा मसाबा म्हणजे मसाबाने डिझाइन केलेली आहे का? मस्त आहे.
येवल्याहून मागवलेली पैठणी!..
येवल्याहून मागवलेली पैठणी!...झकास आणि ते हसू पण झकास.
इथून घेतली होती प्राजक्ताची
इथून घेतली होती प्राजक्ताची साडी. सध्या सोल्ड आऊट दिसते आहे.
Pages