प्रकाशचित्रांचा झब्बू क्रमांक ४ - साडी, शालू, पैठणी ... उंss हूंss ! अलवार आठवणी...

Submitted by संयोजक on 2 September, 2022 - 12:54

आजचा विषय आहे - साडी, शालू, पैठणी उंss हूंss अलवार आठवणी...

"ही कोणती गं साडी?"
" नाही का, वहिनीच्या भाचीच्या बारशाची आणि ती पुतण्याच्या मुंजीची."
" ही मोरपंखी मित्राच्या लग्नातली आणि ती चिंतामणी रंगाची मैत्रिणीच्या डोजेची."

कपाट उघडलं की नानाविध साड्या डोकावत असतात. या ना त्या प्रसंगानुरूप साड्या खरेदी चालूच असते. आपण कलकत्ता, बनारस, येवल्याला फिरायला किंवा कामानिमित्ताने गेलो की आवर्जून तिथून एक तरी साडी आणतोच. कधी साडीचा रंग आवडतो तर कधी काठ पदर खुणावतो. कधी एखादीचा पोत सुखावतो. असा हा आपल्या सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय. मग उघडा तुमची पोतडी आणि काढा एकेक साडी. मायबोली गणेशोत्सव 2022 मध्ये झब्बू खेळण्यासाठी.

तुम्हाला तुमच्याकडे असलेली जी प्रकाशचित्रं पूर्णपणे प्रताधिकार मुक्त करावयाची असतील, ती यात झब्बू म्हणून देणं अपेक्षित आहे.
१. ही स्पर्धा नसून खेळ आहे.
२. झब्बू म्हणून एका वेळेस एकच प्रकाशचित्र टाकावे.
३. प्रकाशचित्र हे प्रताधिकारमुक्त असावे व संयोजकांनी दिलेल्या विषयाशी सुसंगत असावे. प्रकाशचित्र कोलाज स्वरूपातले नसावे.
४. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकतो, मात्र सलग दोन झब्बू देऊ शकणार नाही.
५. सर्व प्रकाशचित्रे मायबोलीच्या 'प्रकाशचित्रविषयक धोरणा'चे पालन करणारी असावीत.
६. झब्बूंचा खेळ मायबोलीकरांचे स्वतःचे प्रकाशचित्रसंग्रह सादर करण्यासाठी तयार केला आहे. तेव्हा कृपया तुमच्या जवळची (मग ती तुम्ही अथवा तुमच्या कुटुंबीयांनी काढलेली) प्रकाशचित्रे सादर करा. आंतरजालावरून घेतलेली प्रताधिकारमुक्त चित्रे झब्बूमध्ये देऊ नयेत.
७.मायबोलीवरील प्रकाशचित्रांचे धोरण इथे (https://www.maayboli.com/node/47635) पाहा.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

Screenshot_20220907-150217_Facebook.jpg

पैठणी ला झब्बु.
हेच कलर कॉम्बिनेशन हवं म्हणून खुप दुकानं पालथी घातली मग शेवटी पेशवाई मधे मिळाली.

पटोला? मोत्यांची माळ सुंदर आहे.

उपक्रमाच्या मथळ्यात 'पैठणी'नंतर काहीतरी विरामचिन्ह हवं आहे. (मी प्रश्नचिन्ह दिलं असतं किंवा एलिप्सिस (तीन ठिपके). गेला बाजार निदान स्वल्पविरामतरी!) ते 'पैठणी उंss हूंss' विचित्र वाटतंय वाचायला.

Screenshot_20220907-144507_Facebook.jpg
नवर्‍याने भेट दिलेली पहिली वहिली साडी. बंगळुर आर्ट ऑफ लिव्हिंग आश्रमामधे साडी शॉप आहे तिथुन आणली होती. ५ दिवसांच्या मेडिटेशन कोर्स मधे "बायकोला खुश ठेवणे हेच अंतिम सत्य" असा साक्षात्कार झाला असावा बहुतेक Wink माझी खुप खुप आवडती साडी.
तलम लिनन नेट आहे

एकदम आहाहा सर्वच.

जयू यांची पैठणी आहे , तो पैठणीतला माझा आवडता रंग आहे. डाळिंबी आहे का तो.

स्मिता यांची आहे, त्याच्या जवळ जाणारा रंग माझ्या सेमी पैठणीचा आहे (वांगी कलर आणि गुलाबी कॉम्बो आहे, बारीक बुट्टे आहेत वर मोर डिझाईनचे) आणि ती मला गिफ्ट मिळाली आहे, तेही कलर combo चांगलं दिसतं.

तसं सर्वच पैठणी छान दिसतात, सगळ्याच आपल्याकडे असाव्यात असं वाटतं पण साडी नेसत नाही मी फार. बघायला आवडतात.

जयू यांची पैठणी आहे , तो पैठणीतला माझा आवडता रंग आहे. डाळिंबी आहे का तो.>> मस्त आहे ना? प्रत्यक्षातहि सेम्च रन्ग आहे. पाहताक्षणी आवडला. Happy

ग्रुप फोटो कसला भारी आहे!! साड्या खरेदी एकदमच केली होती का? सिमिलर पॅटर्न्स च्या आहेत सगळ्यांच्या पैठण्या!!

प्र९ च्या फोटोवरून एक विनोदी किस्सा आठवला. माझ्या एका कलीग चा अगदी असाच चिंतामणी शालू होता लग्नात. तिच्या लग्नात पाठवणी करून आम्ही घरी आलो. नविन जोडपं सजवलेल्या गाडीतून देवदर्शन आणि मग बिबवेवाडिला तिच्या सासरी निघाले. नवरा नवरीसोबत ड्रायवर असलेल्या मावसदिरा व्यतिरिक्त बाकी कुणीच नाही! सगळे घरचे लोक नवरीच्या स्वागताची तयारी करायला आधीच घरी गेले. लग्नाचा मुहूर्त पावसाळ्यातला! बिबवेवाडीतल्या रस्त्यावर पोचता पोचता धो धो पाउस आला. अन त्यांची गाडी पाण्यात अडकली ना! तर शेवटी नाइलाजाने नवरा नवरीने दोन बाजूने धक्का मारत गाडी पाण्यातून बाहेर काढली आणी मग घरी मार्गस्थ झाले! तिचे पाठवणी चे फोटो आणि नंतरचे माप ओलांडतानाचे फोटो यात जमीन अस्मानाचा फरक! केस चिपकलेले, मेकप पुसलेला , शालू ओला होऊन चिंतामणीचा पार नेव्ही ब्लू ! ओळखू न येण्यासारखे फोटो आले होते ( तरी तिने ते आल्बम मधे लावून आम्हाला दाखवले हे विशेष!) Lol

एकदम खरेदी नाही केल्या पण ठरवून केली आहेत. म्हणजे आम्ही गेले 2 वर्षे गणपती विसर्जन आणि आदल्या दिवशी पूजेला पॅटर्न ठरवून साड्या नेसतो. आई, मावशी, आत्या, वहिनी, बहीण अशा सगळ्या मिळून. यंदा खूप मज्जा केली. रील पण बनवले. मॉडेलिंग करताना आई आक्का अशा लाजत होत्या ना Lol
आतापर्यंत बांधणी, खण, पैठणी, प्रिंटेड नेसून झाल्या Happy

Pages