कथाशंभरी- मगल- शर्मिला आर.

Submitted by SharmilaR on 5 September, 2022 - 02:04

कथाशंभरी- मगल- शर्मिला आर.

बर्‍याच दिवसांनी दोघींना मोकळा वेळ मिळाला होता. नाही म्हटले तरी काही वर्षे लोटली होती. पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले होते. अचानक एकीचे लक्ष तिकडे गेले. अरे हे काय .......

“अजूनही कुठे कोपर्‍यात झाडू दिसला, की तो घेऊन उडावसं वाटतं नं..? विसरायला होतं.. व्होलडयामोर्ट च्या पाडावानंतर आपण सगळ्यांनी मगलचं आयुष्य स्वीकारलेय.. पण ह्या बेशिस्त वाहतुकीत गाडी चालवायला अगदी नको नको वाटतं....”

“हो ना.. ह्या नवीन आयुष्याशी जुळवून घेण्यात इतकी वर्षे कशी सरली ते कळलंच नाही. हे मोबाइल येईपर्यंत तर संपर्कही बंदच झाला होता आपला.. ते घुबडही नव्हतं पटकन निरोपा निरोपी करायला.. ”

हरमिओनी आणी जिनीच्या नजरेसमोर हॉगवऱ्ट्स चे दिवस तरळत होते..

*************

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

काय हे. इथे आम्ही मगल्स विझार्डच्या राज्यात जायची स्वप्नं बघतो आणि तुम्ही त्यांना मगलवलंत?

मस्त!
तुझे सासरे मात्र भारी खूष असतील ना हर्मायानी! त्यांना टिक टॉक वर फॉलो करते मी! हे पण टाका.

मस्त! Lol

मस्त! Lol

मस्त...

शर्मिला, मी विचार करत होते इतके वेळा H.P पाहिलंय पण मला अमी कोण आहे कळेना ? रॉन च्या gf च नाव वाटलं आधी पण ती तर लव्हेंडर ना.. हरमाईनी आणि जीनी एकदम परफेक्ट

अरेच्या!!!
ही कथा तर मी विसरलेच होते.