Submitted by निकु on 5 September, 2022 - 09:14
तिचे आवडतीचे अत्तर सकाळपासून पासून सापडत नव्हते. इथेच तर कपाटात असते नेहमी आजच नेमके कसे हरवले माझ्या हातून.. आताशा वेंधळेपणा वाढला आहे खरा ! रामकाकांचे स्वगत चालले होते!
तिची आठवण म्हणून दर पाडव्याला बाहेर काढतो ती कुपी.. मग आज गेली कुठे. तो सुवास म्हणजे जणू तिचे अस्तित्त्वच!
खुर्चीत बसल्या बसल्याच आठवणींनी डोळे मिटले आणि हे काय... तोच सुगंध.. तोच दरवळ, तिचाच आभास!
बाबा, कशी दिसतेय मी ? लेकीच्या आवाजानी काकांनी डोळे जरा किलकिले केले. आज आईचा शालू नेसले तेंव्हा हे अत्तर सापडले.. छानेनै ?
खरंच, मुलीला आईची सावली उगाच म्हणत नाहीत!
काका प्रसंन्न हसले.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
आवडली.पण ही गणेशोत्सवाची
आवडली.पण ही गणेशोत्सवाची नाहीये ना?
पहिल्या प्रतिसादा बद्दल
पहिल्या प्रतिसादा बद्दल धन्यवाद केशवकूल!
हा पहिलाच प्रयत्न असल्याने आणि अति उत्साहात नियम न वाचल्याचा परिणाम आहे.
अजूनही सुधारणा करू शकता.
अजूनही सुधारणा करू शकता.