निसर्ग शिल्प !

Submitted by एम.जे. on 21 April, 2024 - 23:32

टेक्सासमध्ये खूप बर्फ पडत नसला तरी ३-४ महिने थंडीचे असतात. त्यामुळे बागेचे काम दरवर्षी वसंत ऋतूत नव्याने करायला घ्यावे लागते. क्वचित हिमवर्षाव असला तरी काही आठवडे थंडीने बाग गारठून जाते. अशा काळात सकाळी लख्ख ऊन पडले की बाहेर एक चक्कर टाकायची निसर्गाची करामत पाहायला. 

एका हिवाळ्यात पाणलिलींच्या मोठ्या टबातल्या पाण्यावर बर्फाची जाडसर ताटली तयार झालेली. त्यामध्ये एक रोपाची रिकामी कुंडी आधी पडलेली असावी.
कुंडीत एक वाळकं पान होतं. त्याभोवती कुंडीच्या आकाराने बर्फ झालेल्या तबकडीचा हा नजारा… 

कोवळ्या उन्हात चमकणारे हे निसर्ग शिल्प !

~

सायली मोकाटे-जोग

#सायलीमोकाटेजोग

https://sayalimokatejog.wordpress.com/2024/01/03/natural-monument/

Group content visibility: 
Public - accessible to all site users