भारतातले मिलेट्स

Submitted by वेल on 14 November, 2013 - 01:32

मला मिलेट्स ला मराठी शब्द नाही माहित परंतु ज्वारी, बाजरी, नाचणी, वरी हे मिलेट्स आहेत. धान्य हा शब्द मला पटला नाही कारण गहू तांदूळ हीदेखील धान्ये आहेत, पन त्याचा अंतर्भाव मिलेट्स मधे होत नसावा असा माझा अंदाज आहे. रेफरन्स - खाली दिलेली वेबसाईट. काहीतरी गूगलताना मला ही खूप छान वेबसाईट मिळाली
www.milletindia.org

ज्वारी, बाजरी, नाचणी, वरी ह्याशिवाय भारतात कोणती कोणती मिलेट्स आहेत - राळ, जव इत्यादी त्याबद्दल खूप छान माहिती आहे. त्याबद्दलच्या अनेक पाककृती देखील आहेत. अन्नपूर्णांना आणि बागकामाची आवड असणार्‍यांना आणि ज्यांची घरची शेती आहे अशा अनेकांना ह्या वेब्साईटचा फायदा होईल.

ह्यातली अनेक मिलेट्स राळ, जव इत्यादी मुंबईत कुठे मिळतील हे कोणाकडून कळाले तर खूप बरे होइल.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

......

हे सगळं भारतात कोणत्याही वाण्याकडे मिळतं. काही ऑरगॅनिक शॉप्समधे एकत्रित केलेलं मिलेट्स किंवा त्यांचं पिठही मिळतं.

बोरिवलीत मला लिट्ल मिलेट - हळवी/ सावा / वरी (?) (कारण प्रोसो मिलेट - वरी,) इटालियन मिलेट - राळा, कोडो मिलेट - कोड्रा, बार्नयार्ड मिलेट हे पाहायला सुद्धा मिळाले नाहीत. ... म्हणजे पाहिले असतील, ओळखता आले नसतील.

बाकी ज्वारी बाजरी, नाचणी आणि वरी हे नेहमीच्या वापरात असतात.

पाककृती स्पेशालिस्ट्सना हा प्रश्न आहे,
वर्षानुवर्ष घरातल्यांना जेवणात गव्हाचा वापर करायची - पोळ्या खायची सवय लागली आहे. तो कमी करून ह्या धान्यांचा वापर कसा वाढवायचा?

चांगला धागा.
गहू आणी तांदूळ देखील तृणधान्यच.

चिनूक्सचे अन्न वै प्राणा: वाचा. त्यात प्राचीन काळातील अन्नाविषयी बरीच महिती दिली आहे. त्यातल्या काही पाककृती बनवून पाहता येतील.

पाककृती स्पेशलिस्ट नाही तरीही,
१. ज्वारी-बाजरी-नाचणी-तांदूळ यांच्या भाकर्‍या करता येऊ शकतील.
२. हे सर्व मिलेटस एकत्र करून दळून आणून त्याचे पॉरिज बनवता येऊ शकेल.
३. याच पीठाचे तांदळाच्या उकडीसारखें बनवता येते, चांगले चविष्ट लागते. ज्वारीची, नाचणीची उकड आपण बनवतोच.
४. थालिपीठ, धिरडे, दोसा इडली, आप्पे यामधे वर उल्लेखलेले पीठ वापरता येऊ शकेल.
५. बाजरीचा खिचडा नावाचा पदार्थ कमी वेळेत आणि अतिशय चविष्ट असा होतो. खानदेशी पदार्थ आहे बहुतेक चुभुदेघे.
६. वरीचे तांदूळ वापरून कितीतरी वेगवेगळे पदार्थ बनवले जातात. उदा: इडली, डोसा, इत्यादि. वरी उपास स्पेशल असल्याने त्याचा जास्त वापर होत नाही, पण उपासामधे साबुदाणा, बटाटा पेक्षा वरी, राजगिरा खाणे उत्तम.

राळे, जव हि धान्ये जर खास ऑर्गॅनिक फूड वाल्या दुकानातून, ब्रँड नावाने घेतली तर खुप महाग पडतात.
शहरात तशी साध्या दुकानात मिळणार नाहीत. पण कोल्हापूर, जुन्नर सारख्या ठिकाणी मला मिळाली होती.
राळे वरीसारखेच असतात पण रंगाने सोनेरी असतात. शिजायला वेळ लागतो. पण राळ्याची खिचडी चवीला अप्रतिम लागते.

मुंबईत वांद्र्याला गोदरेजचे एक मोठे दुकान आहे तिथे मला किन्वा पण मिळाला होता. किंग्ज सर्कलला पण एक दुकान आहे.

राजगिरा हे तृणधान्य नाही. ती एक पालेभाजी असते.
<<
ते ते राजगिरा नाही हो, लाडू वाले राजगिरा बद्दल चाललंय

मिलिंदा, मी जर बरोबर असेल तर पालेभाजीच्या राजगिर्‍याचे बी म्हणजे आपण वापरतो तो राजगिरा आणि ज्याचे लाडु बनतात त्या राजगिर्‍याच्या लाह्या.

२८/११/२०१३ - आणि परवाच एका पुस्तकात वाचले राजगिरा ही माठ वर्गातली पालेभाजी आहे.

हो वल्लरी राजगिरा माठ विभागातलीच आहे. माठासारखीच पाने असलेली रोपटी त्यांच्या बिया फुलवून राजगिरा बनवतात.