आम्ही घरी गेली 12 वर्षे काही फुलं, फळं, भाजीपाला घरच्या ओल्या कचर्यापासून कंपोस्ट करुन सेंद्रिय पद्धतीने वाढवत आहोत.
बागेतले काही निवडक फोटो ईथे या सिरीज मध्ये देत आहे.
या भागात फुलांचे फोटो आहेत. गेल्या काही वर्षातले एकत्र असे हे फोटो आहेत.
यातली काही फुलं, फळं, भाज्या झाडे आता बागेत नाहीत, तर काही नवीन झाडांची अजून त्यात भर पडणे हे चक्र सुरु असते. 
वेग वेगळ्या भाज्या, फळे यांचा आहारात समावेश असावा म्हणून, सोपे , सहज जमणारे प्रकार म्हणून, व्यायामशाळेत जाताना हातात स्मूदीचा प्याला दिसला तर जास्त भाव मिळतो म्हणून, अशा अनेकविध कारणांनी अनेक जण स्मूदीचे फॅन आहेत. आंतरजालावर वजन वाढवणे, वजन कमी करणे, इथपासून प्रत्येक प्रकारच्या व्याधी साठी स्मूदी च्या कृती सापडतात. तरिही, मायबोलीकरांच्या ट्राईड अॅण्ड टेस्टेड स्मूदी पाककृतींकरता हा धागा.
मंडळी,
नॉर्थ ईस्ट भागात ब्लिझार्डमुळे फुटभर स्नो असताना वसंत ऋतूची स्वप्ने पहात बागकामाचा धागा काढणे काहिसे वेडेपणाचे वाटेल. परंतू या वर्षीचे कॅटलॉग्ज यायला लागलेत. गावातल्या शेतीच्या दुकानात बीयाही आल्यात. तेव्हा उबदार घरात बसून यावर्षीचे बागकामाचे प्लॅनिंग करण्यासाठी धागा सुरु करत आहे.

साहित्यः
ओरिगामीचे कागद, रंग, ब्रश, चिकटवायला फेव्हिकॉल.
कृती:
केळी, सिताफळ, कलिंगड हे करुन झाल्यावर रंगाने थोडे टच अप केले.
स्ट्रॉबेरी आणि पर्सिमॉन हे करायच्या आधीच पाने आणि ठिपके रंगांनी रंगवले.
माहितीचा स्त्रोत:
कलिंगड, पर्सिमॉन हे पुस्तकात पाहुन केले.
केळे - दुसर्या एका कृतीचा अर्धाभाग म्हणुन हा आकार तयार होत होता. तो केळ्याच्या रंगात करुन रंगवायचे ठरवले.
सध्या आंब्यांचा मोसम. भारतातले आंबे परदेशात मिळणे म्हणजे परमभाग्यच!
पण जेव्हा तीन /चार वर्षापुर्वी पहिल्यांदा इथल्या सुपरमार्केट मधे भारतीय आंबे बघितले तेव्हा आनंद व्हायच्या ऐवजी त्यांची किव आली, स्किन काळपट चॉकलेटी, डागाळलेली. क्वालिटी चेकचा स्टीकर लावलेला भाग खराब झालेला शिवाय तो चिकटपणा धुवुनही न जाणारा. कापल्यावर ५०% आंबे खराब होते. त्या नंतर हे आंबे पुन्हा त्या सुपर मार्केट मधे कधीही दिसले नाहीत.
आजच्या पाडव्याच्या सुमुहुर्तावर एका नवीन लेखमालिकेची सुरवात करायचा विचार करतोय.
माझ्या पहिल्या काहि लेखांपैकी एक होता, फ़लेषु सर्वदा. त्यावेळी पहिल्यांदाच भारताबाहेर पडलो होतो. अनेक अनोखी फळे चाखली, आणि त्यावेळी भारतात ती मिळतही नसत.
पण त्यानंतर पूलाखालुन बरेच पाणी वाहून गेले. अगदी एक्झॉटिक म्हणावीत, अशी फळेही भारतात मिळू लागली आहेत. आणि अर्थातच ती अपरिचित राहिली नाहीत.