जगप्रसिद्ध फ्लावर शो संपला, वाटाणे आणि बटाटे यांची पेरणी करण्याचा मुहूर्त देखील टळला ( सेंट पॅट्रिक्स डे ) , तरी भाजीपाला लावण्याची काहीच तयारी नाहीये यंदा.
एका परिचितांकडून २० - २२ व्हाइट पाइनची रोपटी आणि काही हॉलीची रोपटी आणून लावली आहेत. मागच्या फॉलमधे लावलेले हिरवे जॅपनीझ मेपल चे झाड तगले आहे आणि त्यावर आता बारकी पाने दिसू लागली आहेत.
या वीकेंडला भाजीचा वाफा तयार करून वाटाणे तरी पेरावे असा विचार आहे. मग कार्ली ,दोडकी, भेंडी यांच्या बिया घरातच रुजत घालायला हव्यात .
यंदा झुकिनी लावणार नाही असा दरवर्षीप्रमाणे पण केला आहे .... पण ...
जगप्रसिद्ध फिलाडेल्फिया फ्लावर शो ची जागा आणि तारखा दोन्ही पँडेमिकमुळे बदलल्या आहेत. त्यामुळे माझं बागकामाचं वेळापत्रक गंडलंय.
सेंट पॅट्रिक डे ला वाटाणे आणि हिवाळी भाज्या अंगणात लावणे वगैरे पूर्वापार आलेले संकेत आता नव्याने आत्मसात करायला लागणार
तरी अर्थ डे चं निमित्त साधून हा धागा उघडतेय.
तुमचे यंदाचे प्लान काय, नवीन काय लावणार, शंका / कुशंका, रोपे, बी बियाणांचे ऑन लाइन किंवा इन पर्सन सोर्सेस अशा सगळ्या माहितीच्या देवाण घेवाणीसाठी हा धागा
मंडळी,
नॉर्थ ईस्ट भागात ब्लिझार्डमुळे फुटभर स्नो असताना वसंत ऋतूची स्वप्ने पहात बागकामाचा धागा काढणे काहिसे वेडेपणाचे वाटेल. परंतू या वर्षीचे कॅटलॉग्ज यायला लागलेत. गावातल्या शेतीच्या दुकानात बीयाही आल्यात. तेव्हा उबदार घरात बसून यावर्षीचे बागकामाचे प्लॅनिंग करण्यासाठी धागा सुरु करत आहे.
आमच्या घराच्या गच्चीमधल्या बागेत गेल्या आठवड्यात काही झाडे नव्याने लावली तर काही जुनी झाडे मुळे छाटून नव्याने लावली. बरेच फोटो आहेत. थोडे थोडे करून टाकीन इथे... ज्यांची नावे ठावूक आहेत ती दिली आहेत. जी नाहीत ती अर्थात जाणकार देतीलच... शिवाय मराठी नावे असतील ती देखील ठावूक असल्यास सांगावी...
१.
२.