बागकाम अमेरिका २०२२
Submitted by मेधा on 22 April, 2022 - 13:31
जगप्रसिद्ध फिलाडेल्फिया फ्लावर शो ची जागा आणि तारखा दोन्ही पँडेमिकमुळे बदलल्या आहेत. त्यामुळे माझं बागकामाचं वेळापत्रक गंडलंय.
सेंट पॅट्रिक डे ला वाटाणे आणि हिवाळी भाज्या अंगणात लावणे वगैरे पूर्वापार आलेले संकेत आता नव्याने आत्मसात करायला लागणार
तरी अर्थ डे चं निमित्त साधून हा धागा उघडतेय.
तुमचे यंदाचे प्लान काय, नवीन काय लावणार, शंका / कुशंका, रोपे, बी बियाणांचे ऑन लाइन किंवा इन पर्सन सोर्सेस अशा सगळ्या माहितीच्या देवाण घेवाणीसाठी हा धागा