गच्चीतली बाग..

Submitted by सेनापती... on 13 December, 2011 - 05:49

आमच्या घराच्या गच्चीमधल्या बागेत गेल्या आठवड्यात काही झाडे नव्याने लावली तर काही जुनी झाडे मुळे छाटून नव्याने लावली. बरेच फोटो आहेत. थोडे थोडे करून टाकीन इथे... ज्यांची नावे ठावूक आहेत ती दिली आहेत. जी नाहीत ती अर्थात जाणकार देतीलच... Happy शिवाय मराठी नावे असतील ती देखील ठावूक असल्यास सांगावी...

१.

२.

३. शेरेसा..

४. चिकू..

५. ऑल स्पाईस..

६. सुरंगी..

७. ऑर्किड..

८. कम्रख..

९.

१०.

११. इक्झोरा

१२. सदाफुली..

१३. कार्नेशन..

१४. प्लंबॉगो..

अजून काही फोटो

१५. गुलाब..

१६.

१७. संत्रे

१८. शमीच्या झाडाचे खोड. झाड नुकतेच ट्रिम केले. पण लगेचच पालवी फुटली सुद्धा... Happy

१९.
दीपकळी - हेलीकोनिया..

२०.

२१.

२२. स्ट्रॉबेरी

.
.

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वॉव, मस्त बाग. मी ती काचेच्या भांड्यात रोप लावायची आयडिया कॉपी करणार. तेच ग्रास किंवा जे काय असेल ते साध्या छोट्या कुंडीत आहे माझ्याकडे. सुरेख आहे बाग. आणि well maintained पण.

१० - पुदिना आहे का?

१० नंबर पुदिनाच आहे.
९ नंबर सप्तरंगी किंवा त्या कुळातील असावे.

पण ही मोठी झाडे बालकनीतून नंतर काढावी लागतील. उदा. चिकू, सुरंगी, ५, ९.

मस्तच आहे बाग ...........मलापण आवड आहे पण सवड नाहीये.

१० - पुदिना आहे का?>>>>>>> मला स्ट्रॉबेरी वाटतेय .......
४. चिकू.. >>>> कश्यात लावला, ?

chhaanacha aahe baag. karamaLaalaa tar phaLehee laagalee aahet.
(aaj aamachyaakaDe devanaagareechaa problem aahe !!)

जागू, मनीमाऊ... तो पुदिना नाहीये. Happy

जागू.. होय ती झाडे काही काळाने जमिनीत लावावी लागणार आहेत.. Happy नाहीतर त्यांची वाढ खुंटेल ना!

केदार२०... स्ट्रॉबेरी पण नाहीये. कारण स्ट्रॉबेरी दुसऱ्या कुंडीत (Flat pot) लावली आहे. त्याचा फोटो टाकतो काही दिवसात.

दिनेशदा.. कम्रखचे बोन्साय आहे. त्याला मस्त फळे लागली आहेत.. Happy

चिकूची आणि सुरंगीची पण बोनसाय झाडं करा की.. बाकी झाडं मस्त दिसतायेत... झाडांना गाणी ऐकवता काय? बागेतच रिमोट दिसतायेत ते.. Happy

हिम्सकुल...गाणी ऐकवतोच. पण पाहिला फोटो बागेतला नाहीये. घरातल्या एका बाल्कनी कडचा आहे.. Happy त्यावर ही काही इनडोर प्लान्ट ठेवली आहेत..

सेनापती, गच्चीतल्या बागेचे फोटो मस्तच आहेत. एकदम टवटवीत. अजुनही येऊ द्यात. आमच्या वडिलांच्या मित्रांच्या कडे अनेक वर्षांपासून गच्चीतील बाग आहे आणि ती सगळी बाग केवळ गांडूळ खतावर उभी केलेली आहे. त्या बागेत मोठे मोठे पेरू, चिक्कू, पपया, अशी फळे होतात. कधी गेलेच पहायला तर फोटो नक्कीच काढेन.

बाकी सेनापती, सध्या खादंती कमी झालीय का? म्हणजे खादाडीचे फोटो आले नाहीत बरेच महिन्यांत. (निदान मला तरी नाही दिसले.) Wink Wink

गच्चीत इतकी सुंदर बाग केलीये म्हणजे काय म्हणावे? फारच छान! कमरक प्रथमच पाह्यला. सगळी मंडळी अगदी मस्त दिसताहेत. तुमचं प्रेम मिळतंय ना! त्याचा परिणाम आहे तो.
जागूने सांगतल्याप्रमाणे चिकू,सुरंगी मात्र तुम्हाला कुंडीतून खाली जमिनीत लावावे लागतील.
अजून इतर मंडळींचे फोटो लवकर द्या इथे.

बाग मस्तच आहे. गच्चीत मोठी सिमेंटची कुंडी ठेवता आली तर चिकू त्यात वाढू शकेल. खूप नाही आले तरी घरचे चिकू खाल्ल्याचे समाधान नक्की मिळेल.

स्ट्रॉबेरीला रोपाभोवती प्लॅस्टीकची शीट घालतात - फळ मातिला लागता कामा नये म्हणून. मातीने फ़ळ डागाळते आणि मातितल्या ओलाव्याने खराब पण होऊ शकते.

स्टॉबेरी कशी लावलीत? त्याला उन चालतं का? प्लीज सांगता का?
लेकीना सध्या झाडं लावायच वेड लागलंय त्यात अजुन एक भर.....

मस्त बाग
संत्र, चिकू सारखी मोठी झाडं गच्चीत म्हणजे छानच
मी पण गच्चीत बरीच झाडं लावली आहेत पण मोठी नाही.

मातीत केळ्याचीसाले टाकली/पुरलीतर तर गुलाबाच्य पाकळ्यांची संख्या वाढवीण्यास मदत होते, स्वानुभव

समई... झाड आणले तेंव्हा मी देखील पहिल्यांदाच पाहिले. Happy

शांतीसुधा.. त्या बागेचे फोटो आवर्जून एकदा काढाच.. Happy आणि सध्या खाद्यंती तशी कमीच आहे. जी होईल ती तुम्हापर्यंत पोचवण्यात येईल याची नोंद घेतलेली आहे.. Lol

तन्वी.. यावेळी चक्कर व्हायलाच हवी. कोणतेही कारण चालणार नाहीये.

शांकली... धन्यवाद. होय चिकू वगैरे अजून काही काळाने हलवले जातील.. Happy

माधव... चिकुसाठी मोठा ड्रम ठेवलाय. गेल्यावेल्चे चिकू खाऊन ते समाधान प्राप्त झाले.. Happy

मेधा... सुरांगीचे झाड मला दापोली कृषी विद्यापीठाच्या नर्सरीत मिळाले. त्याबाजूला कधी जाणे होणार असेल तर बघा. तिथे सर्वच रोपे अतिशय स्वस्त दरात मिळतात.

साक्षी१.. स्टॉबेरीला ऊन चालत नाही. ते थेट उन पडू नये असे ठेवलंय.

जो_एस.. धन्यवाद.. Happy

केदार.. करून बघायला काही हरकत नाही. काय होते ते कळवितो... Happy

>>>सध्या खाद्यंती तशी कमीच आहे. जी होईल ती तुम्हापर्यंत पोचवण्यात येईल याची नोंद घेतलेली आहे.. :हाहा:>>> Lol Lol

सेनापती, लालबागचे पुढचे भाग टाकलेत. बघुन कळवणे.

खुप सुंदर आहे बाग! सर्व इन्डिव्हिज्युअल फोटोंसोबतच बागेच्या संपूर्ण व्ह्यू चा एखादा फोटो पहायला आवडला असता. Happy

Pages