Submitted by मेधा on 18 March, 2024 - 12:53
जगप्रसिद्ध फ्लावर शो संपला, वाटाणे आणि बटाटे यांची पेरणी करण्याचा मुहूर्त देखील टळला ( सेंट पॅट्रिक्स डे ) , तरी भाजीपाला लावण्याची काहीच तयारी नाहीये यंदा.
एका परिचितांकडून २० - २२ व्हाइट पाइनची रोपटी आणि काही हॉलीची रोपटी आणून लावली आहेत. मागच्या फॉलमधे लावलेले हिरवे जॅपनीझ मेपल चे झाड तगले आहे आणि त्यावर आता बारकी पाने दिसू लागली आहेत.
या वीकेंडला भाजीचा वाफा तयार करून वाटाणे तरी पेरावे असा विचार आहे. मग कार्ली ,दोडकी, भेंडी यांच्या बिया घरातच रुजत घालायला हव्यात .
यंदा झुकिनी लावणार नाही असा दरवर्षीप्रमाणे पण केला आहे .... पण ...
तुमचे काय प्लान्स मंडळी ? नवीन काही ट्राय करणार का कोणी ?
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
माझ्याकडे पिओनी डोकावायला
माझ्याकडे पिओनी डोकावायला लावली आहे. गेल्या वर्षी काही नवीन बल्ब्ज लावले होते त्याचं स्टेटस जरा नीट बघायला हवं आहे. आज आणखीन नवीन बल्ब्ज आणले आहेत. बाकी भाजीपाला लावत नाही. सालाबादप्रमाणे बेसील आणि झेंडू आणण्यात येईल. रोझमेरी एका मैत्रीणीने दिली आहे ती गेल्याच आठवड्यात कुंडीत लावली आहे.
आमच्याकडे एकच छोटे डॅफोडिल्स
आमच्याकडे एकच छोटे डॅफोडिल्स चे झाड आहे त्याला भरभरून फुले आली आहेत.
डॅफोडिल्स चे झाड >> डॅफोडिल्स
डॅफोडिल्स चे झाड >> डॅफोडिल्स चे झाड ????
यावर्षी मी पुन्हा एकदा
यावर्षी मी पुन्हा एकदा ग्रोलाईट घेण्याचे धाडस केले. आधीच्या ४ फुटी टी५ वाल्या, जळून गेलेल्या ग्रोलाईटचा स्टँड होता. त्याला अडकवता येइल असा २ फूट लांबीचा लेड चा ग्रोलाईट घेतला. लुमिनार एवरीडे ५९२५०. त्याच्याखाली ओरेगानो, पार्सली, सेज आणि थाईम च्या बीया रुजत घातल्या होत्या. ओरेगानो आणि पार्सलीची बरीच रोपं मिळाली. सेजची दोनच रोपं मिळाली आणि थाईमचे काहीच झाले नाही. काल बेसीलचे बी पेरले. बघू त्यातून किती रोपे मिळतात ते.
वेगवेगळ्या मिरच्यांचे बी काल चहात भिजत घातले होते ते आज रुजवणार. यावर्षी स्नो नाहीच त्यामुळे स्थानिक पेरेनियल्सच्या बीया कोल्ड ट्रीटमेंट्साठी फ्रीजमधे ठेवायला लागल्या, काल निम्म्या रुजत घातल्या, उरलेल्या आज.
यावर्षी आमच्या ग्रूपला गर्ल्स इंकच्या मुलींना बागकाम शिकवायच्या बदल्यात त्यांचे ग्रीनहाउस वापरायला मिळाले आहे. त्यामुळे फंडरेझिंगची रोपे + घरची रोपे असे पुढील आठवड्यापासून हळूहळू तिकडे नेइन आणि जशी घरी जागा मोकळी होईल तशी अजून रोपे करत रहाणार.
बाकी वाफे तयार आहेत. या रविवारी वाटणे, लेट्यूस, पालक,आर्गुला, पानासाठीचा टर्निप, बीट, लाल मूळा, सरसू वगैरे पेरणार.
अवांतर : गर्ल्स इंकला ग्रांटमधून मिळालेले ग्रीनहाऊस हेवा वाटावे असे आहे पण तिथली उत्साही व्यक्ती सोडून गेल्यावर ते गेली दोन वर्षे तसेच पडून होते. बागकामाची भरपूर अवजारे आणि जोडीला ४ सुरेख रेज्ड बेड्स आहेत. एक मायक्रोस्कोप, हातात धरायची छोटी भिंगं वगैरे सामान आहे. लॉट्स ऑफ पोटँशिअल!
मेधा, सायो, नंद्या, स्वाती
मेधा, सायो, नंद्या, स्वाती बागकाम मस्त सुरु आहे!
आमच्या कडे यंदा बराच पाऊस आहे, त्यामुळे बागेत तण खूप वाढलं आहे. ते साफ करण सुरु आहे.
बागेत सध्या पिंक जास्मीन बहरली आहे. हा आज घेतलेला फोटो -
हा अजून एक स्प्रिंग फोटो या वर्षीचा
पिंक जस्मिन अगदी भरभरून
पिंक जस्मिन अगदी भरभरून फुललाय आहे. मस्त फोटो
पिंक जस्मिन छान फुललाय. कुठला
पिंक जस्मिन छान फुललाय. कुठला झोन आहे तुमचा मीपुणेकर?
पिंक जस्मिन अगदी भरभरून
पिंक जस्मिन अगदी भरभरून फुललाय आहे. मस्त फोटो...+१.
पिंक जास्मिन किती सुरेख
पिंक जास्मिन किती सुरेख फुललाय.
या वीकेंडला वाटाणे, मुळे,
या वीकेंडला वाटाणे, मुळे, बीट, लेट्यूस, अरुगुला आणि चार्ड अशी पेरणी झाली
घरात टॉमेटो, मिर्च्या, कार्ली, दोडकी, दुधी अशा बिया रुजत घातल्या .
एक अमेरिकन पर्सिमन चं रोपटं पण लावलंय. या आधी दोन चार वेळा अॅपल आणि पेअरची रोलं लावली पण हरणांनी एका वर्षात त्याचा चट्टा मट्टा केला. आता हे एकदम लहान रोप आहे. सध्या एका मोठ्या कुंडीत लावून डेकवर ठेवलंय. सावकाशीने अंगणात लावू असा विचार आहे .
पिंक जॅस्मिन मस्त बहर आहे .
पर्सिमन >> सही! किती वर्षांनी
पर्सिमन >> सही! किती वर्षांनी फळं येतात? हार्डी असतं का?
पिंक जास्मिन किती सुरेख
पिंक जास्मिन किती सुरेख फुललाय.>>+१
पर्सिमन झोन ४ ते ७ पर्यंत
पर्सिमन झोन ४ ते ७ पर्यंत हार्डी आहे म्हणे. आम्ही लावलेलं कलमी नाहीये. ७-८ इंच बेअर रूट रोप आहे. ५-७ वर्षे तरी लागतील फळ धरायला बहुतेक.
Potting Soil एकदा वापरली असेल
Potting Soil एकदा वापरली असेल तर तीच पुन्हा नवीन रोपांसाठी वापरावी का? की फेकून द्यायची असते?
मागील वर्षीची काही रोपे विंटरमध्ये जगली नाहीत. ती उपटून बघितली तर त्या मातीत प्रचंड प्रमाणात बारीक मुळांचे जाळेच आहे.
ती मुळे काढली शक्य तितकी तर उरलेली माती वापरण्यायोग्य असते का?
काल होम डीपो मध्ये चेरीचे झाड
काल होम डीपो मध्ये चेरीचे झाड दिसल्यावर घ्यायचा मोह झाला पण वाचलं तर परागीकरणासाठी दुसरं वेगळ्या जातीच्या चेरीचं झाड लागतं असं दिसतंय. कुठली फळ झाडं जगवायला सोपी, सेल्फ पोलिनेटिंग, नॉर्थ ईस्ट मध्ये हार्डी (५ए), बॅक्यार्ड मध्ये लावता येईल असं असतं?
ती उपटून बघितली तर त्या मातीत
ती उपटून बघितली तर त्या मातीत प्रचंड प्रमाणात बारीक मुळांचे जाळेच आहे.
ती मुळे काढली शक्य तितकी तर उरलेली माती वापरण्यायोग्य असते का >> मी वापरते ती माती परत. मुळे आणि सुकलेली झाडे हे सर्व कंपोस्ट करते आणि माती रीसायकल करते.
अपवाद - काही वेळा मीली बग्ज ची लागण झालेली रोपं असतात. त्याची माती परत वापरत नाही
माझ्याकडे सेल्फ पॉलिनेटिंग अ
माझ्याकडे सेल्फ पॉलिनेटिंग अॅपल आहे. हे सांगताना प्र त्ये क वेळी तो हा धागा आणि तो हा जोक आठवून हसायला येतं.
मी पण वापरते ती माती. मुळं तशीच ठेवते. जुनी माती, नवी माती मिक्स करून त्यात कम्पोस्ट, बोन मील मिसळून ते अॅनुअल्सच्या कुंड्यांमध्ये वापरते. सगळा सीझन पुन्हा खत-बित लागत नाही मग.
ओके! शोधतो सेल्फ पॉलिनेटिंग
ओके! शोधतो सेल्फ पॉलिनेटिंग व्हरायटी. लोकल नर्सरीत जाऊन विचारतो. हे होम डिपो प्रकरण गळ्यात पडेल आणि मग झाड तगलं तरी फळं धरणार नाहीत असं होईल.
थँक्यू मेधा, सिंडरेला. मी पण
थँक्यू मेधा, सिंडरेला. मी पण वापरेन मग ती.
हायड्रेंजियाची नवी व्हरायटी
हायड्रेंजियाची नवी व्हरायटी कोणी लावली आहे का ? Burgundy Bliss. इथे त्यांछी अगदीच दशा होते समरमधे म्हणून दुधाची तहान ताकावर असे म्हणत variegated Hibiscus आणले यंदा. काय भन्नाट प्रकार आहे हा.
variegated Hibiscus >>>>
variegated Hibiscus >>>> हार्डी आहे का ? हिवाळ्यात आत आणावी लागेल ?
Burgundy Bliss >>> फोटो वरून तरी रंग नाही आवडला फार.
मी डेलियाचे कंद कधी जमिनीत नाही लावलेत. ते थंडीत बाहेरच राहिले थंडीत तर पुढच्या स्प्रिंगमध्ये परत येतील का?
तसच प्रोपोगेट होतात का ?
मीपु, पिंक जॅस्मिनचा फोटो भारी आहे!
तुम्ही बाहेरचं कंपोस्ट वापरत
तुम्ही बाहेरचं कंपोस्ट वापरत असाल तर कोणत्या ब्रँडचं वापरता?
पग्या, डेलिया अॅन्युअल्स
पग्या, डेलिया अॅन्युअल्स आहेत. पुढच्या वर्षी नव्याने लावावे लागतील. त्यामुळे कुंडीत लाव आणि त्याचे कंद बाहेर काढून थंडीत पेपरमध्ये ठेवून पुढच्या वर्षी पुन्हा लावण्याचं करुन बघ.
हार्डी आहे का ? हिवाळ्यात आत
हार्डी आहे का ? हिवाळ्यात आत आणावी लागेल ? >> नाही नि हो अनुक्रमे. माझा तोच प्लॅन आहे. म्हणून छोट्या कुंडीमधे लावलेय. Burgundy Bliss प्रत्यक्षात फारच मस्त दिसते रे. फारच कंट्रोल ठेवावा लागला न आणण्यासाठी.
variegated Hibiscus
variegated Hibiscus पहिल्यांदाच बघितलं. माझ्याकडे variegated bougainvillea आहे..सुंदर दिसतं.
वेरिगेटेड काहीही घेतलं की
वेरिगेटेड काहीही घेतलं की एकदम किंमत वाढते. मला हाऊस प्लांट्स खूप आवडतात. मध्यंतरी नर्सरीत वेरिगेटेड काहीतरी होतं एकदम बारक्या कुंडीत पण एकदम ५०/६० डॉ.
उन्हाळा सुरू होऊन पंधरवडा
उन्हाळा सुरू होऊन पंधरवडा उलटला, आपापल्या बागांचे अपडेट द्या.
आमच्याकडे स्ट्रॉबेर्या आणि रासबेर्या खूप आल्या! रासबेर्या अजूनही आहेत. इथे आधीच असलेल्या झाडाला सफरचंद पण आली आहेत. फॉलपर्यंत पिकावी चांगली!
मी गेल्यावर्षी लावलेल्या चारपैकी दोन मम्सना पानं आणि कळ्या आल्या आहेत. दोन मेली बहूतेक
हायड्रेंजी खूप फुलली आहेत. Rhododendron पण छान फुलला होता. पालक भरपूर आला आहे. टमॅटो, वांगीची झाडं मोठी झालीयेत पण अजून फळं धरली नाहीत. घरातल्या झाडांनाही चांगली फुट फुटली आहे.
आता चांगला उन्हाळा पडला आहे. त्यामुळे झाडंही वाढावी अशी अपेक्षा आहे.
नवीन काय.
नवीन काय.
कुणी केशर लावलं आहे का? खूप थंडीचा झाड आहे म्हणून विचारतो.
मी केशराचे २५ कंद लावले
मी केशराचे २५ कंद लावले होते एका वर्षी. बरीच फुले आली आणि केशराच्या काड्या गोळा केल्या होत्या. पुढच्या स्प्रिंग मधे त्या कुंडीतली माती अंगणात डंप केली - द वन हू शॅल नॉट बी नेम्ड
त्या नंतर परत लावीन म्हणता म्हणता राहूनच गेलंय. पेन्सिल्व्हेनिया मधले आमिश आणि जुने जर्मन/ डच सेटलर्स घराच्या अंगणात लावत असत कंद असं ऐकलंय . झोन ६-७ मधे असाल तर नक्की लावून बघा
अंबाडीचं एक रोप आलंय. मायाळू, चार्ड एकदम जोमात.
बाकी टॉमेटो, वांगी, झुकिनी , फुग्या मिरच्या सुद्धा जोमात आहेत. झुकिनी वाटप सुरु आहे
मायाळू ला काय म्हणतात ग ?
मायाळू ला काय म्हणतात ग ?
Pages