सॅलड
रंगीबेरंगी पौष्टिक सलाड - चटपटीत साउथवेस्टर्न सॅलड - मैत्रेयी
चटपटीत साउथवेस्टर्न सॅलड
आमच्याकडे सॅलड खायची फ्याशन अज्जिबात नव्हती खरं तर. सॅलड म्हणजे काहीतरी बेचव, गारढोण प्रकार औषध घेतल्यासारखा खाणे ही अॅटिट्यूड! पण माझ्या आता टीनेजर असलेल्या लेकीने काही वर्षांपासून सॅलड्स आवडीने खायला सुरुवात केल्यावर मी रेसिप्या शोधून प्रयोग करायला सुरुवात केली. मग कुठे लक्षात आले की सॅलड्स पण मस्त चविष्ट करता येतात की! आता जो प्रकार लिहितेय तो मुलीच्या खास आवडीचा. एरवी सॅलडची रेसिपी वगैरे काय लिहायचीय असे वाटले असते पण गणेशोत्सवाच्या निमित्ताने मुद्दाम फोटो काढून लिहिली गेली.
या सॅलडला लागणारे ड्रेसिंग पण मी घरीच बनवते.
रंगीबेरंगी पौष्टिक सलाड-पंजाब मीटस वेस्ट-mi_anu
हे नाव आपलं उगीच बरं का.
आता कोणत्याही पाककला स्पर्धेत भाग घ्यायचा तर घरात इन्व्हेंटरी हवी.आमच्या घरातली इन्व्हेंटरी चंद्राच्या कलांप्रमाणे पौर्णिमा ते अमावस्या अशी बदलते.
सामान आणल्याचा दुसरा दिवस: धपाधप खोबरं कोथिंबीर पेरून भाज्या, डब्यात सॅलड, त्यात भरपूर ऑलिव्ह, ड्राय फ्रुट चा डबा 4.3० साठी(जो जास्त भूक लागल्याने सकाळी 11.30 लाच संपलेला असेल ☺️☺️).नाश्त्याला रेडी मिक्स वापरून 20 मिनिटे वाचवणे.
संपदा- ज्युनिअर मास्टर शेफ- पास्ता सॅलड- मैत्रेयी- वय १३ वर्षे
गणेशोत्सव आला की मायबोलीचे उपक्रम जाहीर होतात हे आमच्या पाल्याला आता व्यवस्थित माहिती आहे. त्यामुळे लगेचच विचारणा झाली आणि सॅलड आवडत असल्याने ह्या पाककृतीवर पटकन एकमत झाले. मूळ कृती जेमी ऑलिव्हरची आहे. त्यात थोडे फेरफार करून आमच्या घरी हे सॅलड नेहमीच बनत असते. आज मैत्रेयीने ते बनवले आहे. फोटो काढून इथे अपलोड करण्याचे आणि सर्व स्टेप्स लिहिण्याचा आग्रह केल्याने पूर्ण पाककृती लिहिण्याचे काम मी केले आहे
लागणारा वेळ- १/२ तास
मायबोली मास्टरशेफ - अरुंधती कुलकर्णी - बटाटा मुळा बीट बास्केट्स
मायबोलीवरच्या या स्पर्धेत भाग घ्यायचा हे जरी ठरवले असले तरी हाताशी असणारा वेळ, उपलब्ध घटक, संधी आणि जरासा निवांतपणा यांचा ताळमेळ बसून शेवटी मनात असलेला पदार्थ बनवायला अनंत चतुर्दशी उजाडली!
जो पदार्थ बनवायचा तो स्पर्धेच्या नियमांत बसणारा आणि हेल्दीही हवा असे मनोमन वाटत होते. तसेच हा पदार्थ करायला सोपा हवा हेही माझ्यासारख्या अपरिपक्व बल्लवाचार्यांच्या एकूण अनुभवावरून पक्के माहीत होते. मग त्याप्रमाणे मनात जुळणी सुरू झाली. सर्व घटक पदार्थ एकत्र जमवून त्यांची ही बास्केट किंवा गठडी वळताना मजा आली!
घटक पदार्थ :
बटाटा गाठोडे / बास्केटसाठी :
स्विट कॉर्न आणि लाल कांदा सॅलड
आंबा-अंडं-पपई सॅलड
स्विस चार्ड सॅलड
कोण म्हणतंय जमत नाही?
अहो, मी डाएट बद्दल बोलतेय.
"कसं काय तुम्ही लोक डाएट करता बुवा? मला तर भात खाल्ल्याशिवाय शांत नाही वाटत."
'वडापाव आठवड्यातून एकदा तरी खाल्लाच पाहिजे'
'पोट मारून जगायचं तर खायचं कधी?'
कधीतरी मरणारच ना? मग खाऊनच मरू....
हे डाएट न करणारे किंव करू न शकणारे आणि थोडे स्थूलतेकडे झुकणारे लोक असं काहीतरी बडबडत असतात. पण कधीतरी आपण हे करून पाहू असा विचार (निदान विचार तरी) करून पाहतात की नाही कोण जाणे.