साहित्य : सेलरी (२ स्टॉक), फेनेलचा छोटा बल्ब, एक सफरचंद (ग्रॅनी स्मिथ/हिरवे थोडे टार्ट चव असल्याने छान लागते/ नसल्यास कुठलेही चालेल), एक गाजर, आइसबर्ग लेट्युस, थोडे अक्रोडचे तुकडे, २ टीस्पून ऑलिव्ह ऑइल, १ टीस्पून लिंबू, १ टीस्पून बाल्सामिक व्हिनेगर, फ्रेश ग्राउंड पेप्पर, आवडत असल्यास ऍव्होकॅडो व चेरी टोमॅटो
सध्या मला वेगवेगळे सॅलड्स आकारून खायची आवड निर्माण झाली आहे. सॅलडची कृती सोपीच असते. फक्त जिन्नस लागतात.
१. फेनेलचा बल्ब मिळतो. त्याची पाने व स्टॉक काढून फक्त खालचा बल्ब घ्यायचा. तो किसून किंवा बारीक चिरून घ्यायचा व १० मिनिटे थंड पाण्यात ठेवायचा.
२. तोपर्यंत लेट्युस कापून , गाजर व सफरचंद किसून घ्यायचे. सेलरी पण किसूनच घ्यायची.
३. फेनेलचा कीस पाण्यातून काढून कोरडा करून घायचा व त्यात लेट्युस, सेलरी, गाजर, सफरचंद सगळे मिक्स करून घ्यायचे, यात अवोकाडोचे तुकडे व चेरी टोमॅटो ऑपशनल आहेत. मग थोडेसे बारीक अक्रोडचे तुकडे टाकायचे.. यात ऑलिव्ह ऑइल, व्हिनेगर व थोडे लिंबू पिळून टाका. (नसल्यास बाल्सामिक व्हिनेगर ड्रेसिंग वापरा). किंचित पांढरे पेप्पर टाका. सर्व छान एकत्र करून घ्या.
४. मस्तपैकी क्रंची फेनेल सॅलड ५ मिनिटात तयार होते.
अक्रोड थोडे रोस्ट करून मस्त लागतात
मला ग्रॅनी स्मिथ अँपल आवडते पण हनी क्रिस्प किंवा फूजी पण चालेल पण त्यामुळे सलाड थोडे गोडसर होते.
छान.
छान.
फेनेल कधी आणलं नाही. बघतो.
मस्त!
मस्त!
छान दिसत आहे.
छान दिसत आहे.
मस्तच
मस्तच
एरवी संस्थळांवर पब्लिकचे
एरवी संस्थळांवर पब्लिकचे उचलली जीभ लावली टाळ्याला प्रकार चालू असताना हे खर एफर्टफूल (प्रयत्नपूर्वक) आणि चांगले आहे. Kudos! I truly enjoyed this one.
आता काही गोष्टी ज्या मी वेगळ्या पद्धतीने केल्या असत्या: फेनेल किसून सहसा फक्त रेलिशसाठी वापरतात. सॅलड मध्ये बारीक स्लाईस्/वेजेसच बरे. (सुरूवातीला नाईफस्कील्स लिमिटेड असतांना मँडोलिन स्लाईसर वापरावे.) सफरचंदासाठीही स्लाईसरच. आईसबर्ग लेट्यूसचे पॅकेट शक्यतो नको. साल्मोनेला इंफेक्शनची भिती असते. थोडा महाग असला तरी लेट्यूसचा गड्डा आणायचा, पाने व्यवस्थित धुवायची, आणि कापायचा. सफरचंदाचा स्टीकर काढायचा आणि व्यवस्थित धुवून घ्यायचं. ग्रॅड स्टुडंट असल्यासारखा आळशीपणा करायचा नाही. ह्या सॅलड मध्ये २ चमचे मध हवे.
आणि सगळ्यात महत्त्वाचे वेगळे काय - सैपाकातच धारातीर्थी पडायचे नाही; फोटो काढताना जरा एफर्ट मारायचा, जरा एनर्जी टाकायची... समथिंग लाईक धिस-
छान दिसतेय. या तिरंगी स्पर्धा
छान दिसतेय. या तिरंगी स्पर्धा प्रकारात एकूणात सलाड खूप खावे आय मीन बघावे लागणार वाटते
धन्यवाद अमितव, मंजूताई,
धन्यवाद अमितव, मंजूताई, मनस्विता, लंपन, Barcelona, ऋन्मेष
Barcelona तुमच्या प्रतिसादाबद्दल खास धन्यवाद. तुम्ही परत पहिले तर दिसेल की मी फेनेल चाकूनेच कापले आहेत. माझ्याकडे mandolin slicer नाहीये. त्यामुळे चिरावेच लागले. मला crunchi आवडते म्हणून मी सगळेच चाकूने चिरते.
लेट्युस मी गड्डाच आणते कारण मी रोज ते खाते. पॅकेटमधला एक दिवसात खराब होतो म्हणून कधीच घेत नाही. तसेही बाजारात जे चिरलेले मिळते मी कधीच घेत नाही. कारण ते कधीचे असते काय माहित अशी भीती वाटते. सफरचंदाचा स्टिकर अर्थातच काढला पण फोटोत मात्र राहिला.
हे मात्र कबुल आहे की फोटो चांगले नाही आले कारण सलाड कापायला सुरवात केली आणि आठवले की साहित्याचाही फोटो घ्यायचा आहे. त्यामुळे lettuce ऑलरेडी चिरून झाले होते. घरी पाव गड्डाच होते. शिवाय पाककृती द्यायचा शेवटचा दिवस होता, उद्यापासून ट्रीपला जाणार आहे म्हणून परत करायलाही वेळ नव्हता. परत मला फोनवरून लॅपटॉपवर व तिथून माबोवर अपलोड करायला खूप त्रास होतो. फाईल साईझ नेहमी जास्त असतो. ह्या फोटो adjustment मध्ये एक दिवस गेला. मी अजून शिकत आहे (स्वयंपाक नाही, माबोवर लिहायला) त्यामुळे चूक भूल माफ असावी. पुढच्या वेळी सगळे ठीक असेल तर नक्की अजून चांगला प्रयत्न करीन