मायबोलीवरच्या या स्पर्धेत भाग घ्यायचा हे जरी ठरवले असले तरी हाताशी असणारा वेळ, उपलब्ध घटक, संधी आणि जरासा निवांतपणा यांचा ताळमेळ बसून शेवटी मनात असलेला पदार्थ बनवायला अनंत चतुर्दशी उजाडली!
जो पदार्थ बनवायचा तो स्पर्धेच्या नियमांत बसणारा आणि हेल्दीही हवा असे मनोमन वाटत होते. तसेच हा पदार्थ करायला सोपा हवा हेही माझ्यासारख्या अपरिपक्व बल्लवाचार्यांच्या एकूण अनुभवावरून पक्के माहीत होते. मग त्याप्रमाणे मनात जुळणी सुरू झाली. सर्व घटक पदार्थ एकत्र जमवून त्यांची ही बास्केट किंवा गठडी वळताना मजा आली!
घटक पदार्थ :
बटाटा गाठोडे / बास्केटसाठी :
उकडून मऊसूत कुस्करलेले मध्यम आकाराचे बटाटे - ३
मसाला - मीठ, तिखट, हळद, जिरेपूड, धणेपूड
मिळून येण्यासाठी तांदळाची पिठी - १-२ चमचे
बास्केट घोळवण्यासाठी - भाजलेला जाडा रवा - २-३ चमचे
मुळा पालाभाजीसाठी :
मुळ्याचा हिरवागार पाला निवडून, धुवून चिरून
फोडणीचे साहित्य - तेल, मोहरी, हिंग, हळद, तिखट, हिरव्या मिरचीचा ठेचा, चवीनुसार मीठ, किंचित तेलावर परतून घेतलेले बेसन - ३ चमचे
मिळून येण्यासाठी - शिजून घोटलेली मूगडाळ - २-३ डाव
टॉपिंगसाठी :
अर्धे बीट उकडून सोलून किसून
अर्धा पांढरा मुळा किसून
वरून भुरभुरायला - मीठ, जिरेपूड, लिंबाचा रस
कृती :
बटाटे उकडून, सोलून त्यांचा लगदा करा व त्यात मीठ, तिखट, हळद, धणेपूड, जिरेपूड हा वर दिलेला मसाला करून एकजीव करा.
१]
२]
हवे असल्यास थोडा तेलाचा हात लावून त्याचे पोळीसाठी करतो त्यापेक्षा किंचित मोठे उंडे करून घ्या. या प्रमाणात २-३ उंडे होतील.
३]
एकेक उंडा हातात घेऊन त्याला जरा चपटा करा, भाजलेल्या रव्यात घोळवून तळहातावर ठेवून त्याला बास्केटचा आकार द्या आणि छोट्या नॉनस्टिक कढल्याला आतून तेल / तूप लावून ही बास्केट त्यात अलगद ठेवा व मंद आंचेवर भाजा. खूप भाजायची गरज नाही. गार झाल्यावर बाहेर काढून तिला परत थोडे हाताने एकसारखे करा.
४]
मुळ्याच्या पाल्याच्या भाजीसाठी कढईत तेल, मोहरी, हिंग, हळद, तिखट, मिरची ठेच्याची फोडणी करून त्यात मुळा पाला परता.
५]
६]
पाला शिजला की त्यावर तेलात भाजून घेतलेले बेसन शिवरा, चवीनुसार मीठ घाला.
७]
पालेभाजी मिळून येण्यासाठी २-३ डाव शिजवून घोटलेली मूगडाळ घालायला हरकत नाही. भाजी एकजीव करून झाली की गॅस बंद करा, भाजी गार होऊ द्यात.
अर्धा मुळा व अर्धे बीट किसून वेगवेगळ्या भांड्यांत ठेवा. त्यांत वरून मीठ, जिरेपूड, लिंबाचा रस मिसळून हलक्या हाताने मिसळा.
८]
९]
आता गार झालेली बटाटा बास्केट घ्या, त्यात हिरव्यागार मुळा पालाभाजीचे सारण भरा.
१०]
वरून किसलेले बीट व मुळा पेरा. अशा बास्केट्स तयार करून प्लेटमध्ये तयार करून ठेवू शकता.
११]
१२]
अधिक हौशी लोक मुळ्याची फुले, बीटची फुले करून आजूबाजूने रचू शकता. माझा धीर संपल्यामुळे मी त्या भानगडीत पडले नाही. बटाटा बास्केट करताना एक बास्केट रव्यात घोळवून व दुसरी बास्केट रव्यात न घोळवता करून पाहिली. रव्यात घोळवलेली बास्केट अर्थातच जास्त खमंग वाटते.
तर अशा या बटाटा मुळा बीट बास्केट्स दिसायला तर छान दिसतातच, खायलाही हेल्दी पर्याय म्हणून छान वाटतात. म्हटलं तर हा सायंकालीन नाश्त्याचा एक पदार्थ होऊ शकतो किंवा जेवणात सलादची जागा पटकावू शकतो.
पर्याय :
जाड्या रव्याऐवजी ब्रेडक्रंब्जमध्ये बटाटा बास्केटला घोळवू शकता.
वाफवलेले व मोड आलेले हिरवे मूग हेही वरून पेरू शकता.
हुश्श!! :मुदतीच्या आत पाककृती
हुश्श!! :मुदतीच्या आत पाककृती प्रकाशित करता आली याचा अतोनात आनंद झालेली बाहुली:
मस्त
मस्त
मस्त!
मस्त!
वा. काय कल्पक आहेत एकेक
वा. काय कल्पक आहेत एकेक माबोकर.. _______/\______
मला असले कध्धी सुचत नाही. मयबल वाचून पदार्थ तर सोडा, कच्च्या मालाची नावे सुध्दा जास्त आठवली नाहीत
मस्त!
मस्त!
भारीच!
भारीच!
जबरदस्त! मस्त रंगसंगती
जबरदस्त! मस्त रंगसंगती आहे.स्पर्धेसाठी शुभेच्छा.:स्मित:
मस्त! शेवटचा फोटो छान दिसतोय.
मस्त! शेवटचा फोटो छान दिसतोय.
ह्या बास्केटमध्ये वाफवलेले मूग, कांदा, टोमॅटो, भेळेच्या चटण्या इत्यादी मालमसाला भरून बास्केट चाट करतो आम्ही.
पण चवी बद्दल साशंकता आहे.
पण चवी बद्दल साशंकता आहे. प्लीज, रागावू नका. पण मुळ्याची भाजी, कच्चा मुळा, बीट...यांचे मिश्रण...!!!
त्या ऐवजी मूग वाफवून, त्यात चाट मसाला, लिंबू वर शेव..असे कदाचित अधिक चांगले लागेल.
प्रतिसादाबद्दल सर्वांना
प्रतिसादाबद्दल सर्वांना धन्यवाद!
आंबटगोड, चव चांगली लागते आहे बास्केट्सची व आतल्या मिश्रणाची. पांढरा मुळा व उकडलेले बीट हे मीठ, जिरेपूड व लिंबाचा रस यांत कालवले आहेत. त्यामुळे त्यांचा उग्रटपणा जेमतेम आहे. मुळ्याच्या पाल्याचा उग्रटपणा बेसन व मूगडाळीमुळे कमी झाला आहे.
मी नंतर आणखी एक वेरिएशन करून पाहिले. किसलेल्या मुळ्याची दही, मीठ, जिरेपूड घालून केलेली कोशिंबीर / रायते एका बास्केटवर टॉपिंग म्हणून घातले. ते काँबो जास्त छान वाटले. अर्थात तोवर मी प्रवेशिका दाखल केली होती. पण ज्यांना ही डिश उग्र वाटेल अशी शंका आहे त्यांनी मुळ्याचे दह्यातले रायते करून ते टॉपिंग म्हणून घालावे अशी विनम्र सूचना.
मस्तं दिसतय प्रकरण. मुळा आवडत
मस्तं दिसतय प्रकरण. मुळा आवडत नसल्याने पास.
मस्त दिसतंय.. जामच हेल्दी
मस्त दिसतंय.. जामच हेल्दी पर्याय
परत एकदा, माबो शेफ्स च्या
परत एकदा, माबो शेफ्स च्या क्रिएटिव्हीटी ला सलाम!
या स्पर्धेतल्या डिश वर कॉपी राईट लावून वेगळे पुस्तक बनवावे अशी आगाऊ सूचना.
भारी आहे हे !
भारी आहे हे !
मस्त कल्पक रेसिपी.
मस्त कल्पक रेसिपी. स्पर्धेसाठी शुभेच्छा.
खूप मस्त आहे ही पाकृ.
खूप मस्त आहे ही पाकृ.
भारी दिसतेय पाकृ!
भारी दिसतेय पाकृ!
मस्त कल्पक रेसिपी.
मस्त कल्पक रेसिपी.
मस्त पाक़कृती. स्पर्धेसाठी
मस्त पाक़कृती.
स्पर्धेसाठी शुभेच्छा!!!
कल्पक रेसिपी.
कल्पक रेसिपी.
कढल्यात बास्केट भाजायची
कढल्यात बास्केट भाजायची कल्पना छान आहे. अप्पेपात्रात मिनी कटोर्याही करता येतील.
बास्केटमधला माल नाही आवडला. मुळा अजिबात आवडत नाही.
अकु, मी तर अनंतचतुर्दशी आपल्याइथे मावळल्यावर रेसिपी करायला घेतली. इथे टाकायला मायबोलीच्या हेड ऑफिसचा टाइम झोन पाहून डेड लाइन पाळली.
चांगली आहे !
चांगली आहे !
भरत कांदा मुळा भाजी वगैरे
भरत
कांदा मुळा भाजी वगैरे काहीतरी घोळत असणार माझ्या डोक्यात!
पालक, मेथी, सिमला मिरची यांसारख्या राजमान्य भाज्यांचा पर्याय असतोच. त्यात सध्या लोकप्रिय असणारे स्वीट कॉर्न, बेबी कॉर्न वगैरे भरही घालता येऊ शकते. टॉपिंगला किसलेले चीज, शेव, बुंदी वगैरे. परंतु डोक्यात याच काँबोने घर केले होते. शेवटी रेसिपी केली, इथे लिहिली व सुटका झाली!