मायबोली मास्टरशेफ - अरुंधती कुलकर्णी - बटाटा मुळा बीट बास्केट्स

Submitted by अरुंधती कुलकर्णी on 15 September, 2016 - 01:55

मायबोलीवरच्या या स्पर्धेत भाग घ्यायचा हे जरी ठरवले असले तरी हाताशी असणारा वेळ, उपलब्ध घटक, संधी आणि जरासा निवांतपणा यांचा ताळमेळ बसून शेवटी मनात असलेला पदार्थ बनवायला अनंत चतुर्दशी उजाडली!
जो पदार्थ बनवायचा तो स्पर्धेच्या नियमांत बसणारा आणि हेल्दीही हवा असे मनोमन वाटत होते. तसेच हा पदार्थ करायला सोपा हवा हेही माझ्यासारख्या अपरिपक्व बल्लवाचार्यांच्या एकूण अनुभवावरून पक्के माहीत होते. मग त्याप्रमाणे मनात जुळणी सुरू झाली. सर्व घटक पदार्थ एकत्र जमवून त्यांची ही बास्केट किंवा गठडी वळताना मजा आली!

घटक पदार्थ :

टाटा गाठोडे / बास्केटसाठी :

उकडून मऊसूत कुस्करलेले मध्यम आकाराचे टाटे - ३
साला - मीठ, तिखट, हळद, जिरेपूड, धणेपूड
मिळून येण्यासाठी तांदळाची पिठी - १-२ चमचे
बास्केट घोळवण्यासाठी - भाजलेला जाडा रवा - २-३ चमचे

मुळा पालाभाजीसाठी :
मुळ्याचा हिरवागार पाला निवडून, धुवून चिरून
फोडणीचे साहित्य - तेल, मोहरी, हिंग, हळद, तिखट, हिरव्या मिरचीचा ठेचा, चवीनुसार मीठ, किंचित तेलावर परतून घेतलेले बेसन - ३ चमचे
मिळून येण्यासाठी - शिजून घोटलेली मूगडाळ - २-३ डाव

टॉपिंगसाठी :
अर्धे बीट उकडून सोलून किसून
अर्धा पांढरा मुळा किसून
वरून भुरभुरायला - मीठ, जिरेपूड, लिंबाचा रस

कृती :

बटाटे उकडून, सोलून त्यांचा लगदा करा व त्यात मीठ, तिखट, हळद, धणेपूड, जिरेपूड हा वर दिलेला मसाला करून एकजीव करा.

१]
kuskaralela batata.jpg

२]
kusakaralela batata masala.jpg

हवे असल्यास थोडा तेलाचा हात लावून त्याचे पोळीसाठी करतो त्यापेक्षा किंचित मोठे उंडे करून घ्या. या प्रमाणात २-३ उंडे होतील.

३]
kuskaralela batata gola.jpg

एकेक उंडा हातात घेऊन त्याला जरा चपटा करा, भाजलेल्या रव्यात घोळवून तळहातावर ठेवून त्याला बास्केटचा आकार द्या आणि छोट्या नॉनस्टिक कढल्याला आतून तेल / तूप लावून ही बास्केट त्यात अलगद ठेवा व मंद आंचेवर भाजा. खूप भाजायची गरज नाही. गार झाल्यावर बाहेर काढून तिला परत थोडे हाताने एकसारखे करा.

४]
batata basket paratun.jpg

मुळ्याच्या पाल्याच्या भाजीसाठी कढईत तेल, मोहरी, हिंग, हळद, तिखट, मिरची ठेच्याची फोडणी करून त्यात मुळा पाला परता.

५]
mula pala frame.jpg

६]

mula pala paratun1.jpg

पाला शिजला की त्यावर तेलात भाजून घेतलेले बेसन शिवरा, चवीनुसार मीठ घाला.

७]
mula pala peeth lavun.jpg

पालेभाजी मिळून येण्यासाठी २-३ डाव शिजवून घोटलेली मूगडाळ घालायला हरकत नाही. भाजी एकजीव करून झाली की गॅस बंद करा, भाजी गार होऊ द्यात.

अर्धा मुळा व अर्धे बीट किसून वेगवेगळ्या भांड्यांत ठेवा. त्यांत वरून मीठ, जिरेपूड, लिंबाचा रस मिसळून हलक्या हाताने मिसळा.

८]
kisalela mula.jpg

९]
kisalele beet.jpg

आता गार झालेली बटाटा बास्केट घ्या, त्यात हिरव्यागार मुळा पालाभाजीचे सारण भरा.

१०]
batata basket mula veggie.jpg

वरून किसलेले बीट व मुळा पेरा. अशा बास्केट्स तयार करून प्लेटमध्ये तयार करून ठेवू शकता.

११]
batata mula beet basket3.jpg

१२]

batata mula beet basket2.jpg

अधिक हौशी लोक मुळ्याची फुले, बीटची फुले करून आजूबाजूने रचू शकता. माझा धीर संपल्यामुळे मी त्या भानगडीत पडले नाही. बटाटा बास्केट करताना एक बास्केट रव्यात घोळवून व दुसरी बास्केट रव्यात न घोळवता करून पाहिली. रव्यात घोळवलेली बास्केट अर्थातच जास्त खमंग वाटते.

तर अशा या बटाटा मुळा बीट बास्केट्स दिसायला तर छान दिसतातच, खायलाही हेल्दी पर्याय म्हणून छान वाटतात. म्हटलं तर हा सायंकालीन नाश्त्याचा एक पदार्थ होऊ शकतो किंवा जेवणात सलादची जागा पटकावू शकतो.

पर्याय :
जाड्या रव्याऐवजी ब्रेडक्रंब्जमध्ये बटाटा बास्केटला घोळवू शकता.
वाफवलेले व मोड आलेले हिरवे मूग हेही वरून पेरू शकता.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त

वा. काय कल्पक आहेत एकेक माबोकर.. _______/\______
मला असले कध्धी सुचत नाही. मयबल वाचून पदार्थ तर सोडा, कच्च्या मालाची नावे सुध्दा जास्त आठवली नाहीत Happy

मस्त! शेवटचा फोटो छान दिसतोय.

ह्या बास्केटमध्ये वाफवलेले मूग, कांदा, टोमॅटो, भेळेच्या चटण्या इत्यादी मालमसाला भरून बास्केट चाट करतो आम्ही.

पण चवी बद्दल साशंकता आहे. प्लीज, रागावू नका. पण मुळ्याची भाजी, कच्चा मुळा, बीट...यांचे मिश्रण...!!!
त्या ऐवजी मूग वाफवून, त्यात चाट मसाला, लिंबू वर शेव..असे कदाचित अधिक चांगले लागेल.

प्रतिसादाबद्दल सर्वांना धन्यवाद!

आंबटगोड, चव चांगली लागते आहे बास्केट्सची व आतल्या मिश्रणाची. पांढरा मुळा व उकडलेले बीट हे मीठ, जिरेपूड व लिंबाचा रस यांत कालवले आहेत. त्यामुळे त्यांचा उग्रटपणा जेमतेम आहे. मुळ्याच्या पाल्याचा उग्रटपणा बेसन व मूगडाळीमुळे कमी झाला आहे.

मी नंतर आणखी एक वेरिएशन करून पाहिले. किसलेल्या मुळ्याची दही, मीठ, जिरेपूड घालून केलेली कोशिंबीर / रायते एका बास्केटवर टॉपिंग म्हणून घातले. ते काँबो जास्त छान वाटले. अर्थात तोवर मी प्रवेशिका दाखल केली होती. पण ज्यांना ही डिश उग्र वाटेल अशी शंका आहे त्यांनी मुळ्याचे दह्यातले रायते करून ते टॉपिंग म्हणून घालावे अशी विनम्र सूचना. Happy

परत एकदा, माबो शेफ्स च्या क्रिएटिव्हीटी ला सलाम!
या स्पर्धेतल्या डिश वर कॉपी राईट लावून वेगळे पुस्तक बनवावे अशी आगाऊ सूचना.

कढल्यात बास्केट भाजायची कल्पना छान आहे. अप्पेपात्रात मिनी कटोर्‍याही करता येतील.
बास्केटमधला माल नाही आवडला. मुळा अजिबात आवडत नाही.
अकु, मी तर अनंतचतुर्दशी आपल्याइथे मावळल्यावर रेसिपी करायला घेतली. इथे टाकायला मायबोलीच्या हेड ऑफिसचा टाइम झोन पाहून डेड लाइन पाळली.

भरत Happy
कांदा मुळा भाजी वगैरे काहीतरी घोळत असणार माझ्या डोक्यात! Wink

पालक, मेथी, सिमला मिरची यांसारख्या राजमान्य भाज्यांचा पर्याय असतोच. त्यात सध्या लोकप्रिय असणारे स्वीट कॉर्न, बेबी कॉर्न वगैरे भरही घालता येऊ शकते. टॉपिंगला किसलेले चीज, शेव, बुंदी वगैरे. परंतु डोक्यात याच काँबोने घर केले होते. शेवटी रेसिपी केली, इथे लिहिली व सुटका झाली! Proud