गोडाचा शिरा
ती आज एव्हडी खूश होती स्वतःवरच की त्या आनंदात, समाधानात बसूनच रहावे असे तिला वाटत होते. सकाळपासून विविध प्रॉब्लेम्स ना तिने यशस्वीरीत्या dodge केले होते आणि ते सुद्धा तिच्या आंतरिक शांततेचा भंग न होता. त्यामुळेच ती खूप आनंदात होती.
कितीतरी वेळा आपण खूप आनंदात असतो,असेच आणि आपला पूर्ण दिवस तसाच सुखाच्या डोहात डुंबत जावा असे वाटत असते पण अचानक काहीतरी होते, कधी कामवाली बुट्टी मारते, तर कधी कामाच्या गडबडीत मुलांचे लास्ट मिनिट काहीतरी आठवते. काही नाही तर अचानक धो धो पाऊस आणि एखादे वेळेस, मानच अवघडते किंवा मायग्रेन चालू होतो. अगदी मिठाचा खडा पडावा तसे.
तर गंमत अशी झाली ....
आमच्या ऑफिसमध्ये एक प्रसाद नावाचा ईंजिनीअर आहे. साधारण वर्षभरापूर्वी त्याचे लग्न झालेय. अगदी हेवा वाटावा अशी सासू त्याला मिळालीय. सासुरवाडी म्हणाल तर अगदी हाकेच्या अंतरावर आहे. त्यामुळे वरचेवर तिथे जी पंचपक्वान्न बनतात, वा खास जावईबापूंसाठी बनवली जातात, ती याला घरपोच दिली जातात. आणि हा ते दुसर्या दिवशी ऑफिसला आणतो. किंबहुना ऑफिसला नेतो म्हणून त्याहिशोबाने जास्तच दिली जातात. त्यामुळे आमचीही चंगळ होते. प्रसाद आणि त्याची सासू अशी जोडी ऑफिसमध्ये प्रसिद्धच आहे. पण त्यापेक्षाही जास्त प्रसिद्ध आहे तो त्याच्या सासूने बनवलेला शिरा!
कणकेचा गोड शिरा
साहित्य : एक वाटी भरून गव्हाची जाडसर कणिक , एक सपाट वाटी भरून साखर , अर्धी वाटी साजूक तूप , दोन कप भरून दूध , आवडीप्रमाणे सुका मेवा (काजू,बदाम,बेदाणे,चारोळया व पिस्ता यांचे काप),किसलेले बारीक सुके खोबरे