_१ वाटी रवाळ कणीक
_लिपिड प्रोफाइल बघून पाव ते अर्धी वाटी साजुक तूप
_१ वाटी फुल फॅट गरम दूध + शिपके मारून शिजवायला लागेल तसं
_वेलदोडा पावडर
_पाव वाटी खडबडीत बदाम पावडर
_अर्धी वाटी किसलेला गूळ
- जाड बुडाच्या कढईत कणीक आधी कोरडीच, मंद आचेवर भाजायला घ्यायची.
- टीपाप्यात चार पोस्टी टाकायच्या. सटरफटर बाफं वाचायचे. अधेमधे कणकेला ढवळत रहायचं. चांगली अर्धा तास भाजून झाली की आता थोडं थोडं तूप ओतून भाजायची.
- सगळं तूप ओतून झाल्यावर कणीक कोरडी दिसायला नको. तशी दिसली तर (लि.प्रो. नुसार) चमचाभर तूप घालायचं.
- कढत दूध थोडं थोडं ओतून कणीक फुलवायची. सगळं भस्सकन ओतलं तर एक विचित्र गोळा तयार होईल आणि त्याचा गाभा गुळाचा अनुल्लेख करेल.
- झाकण ठेवून शिजू द्यायची.
- गूळ, वेलदोडा पावडर घालून परतायचं.
- गूळ वितळून लगदा होईल. पण धीर न सोडता लगदा परतायचा, त्यात बदामपूड घालायची.
- लापशीछाप आवडत असेल तर आत्ताच खायला घ्यायचा. नाहीतर थोडा आणखी परतायचा.
_सुजाता मल्टिग्रेन कणीक किंवा लाडवांसाठी जरा जाडसर कणीक मिळते ती चालेल.
_अर्धी वाटी गूळ घालून बेताचा गोड शिरा होतो. आणखी कमी गोड हवा असल्यास अर्थातच गुळाचं प्रमाण कमी करावं.
_गुळाऐवजी रॉ ब्राउन शुगर चालेल.
_वेलदोड्याच्या जोडीनं जायफळ किसून घातलं तरी चांगलं लागेल.
_पानात वाढायच्या कमीत कमी तासभर आधी तरी शिरा तयार असावा. मुरला की जास्त छान लागतो. शिर्यांच्या अलिखित नियमानुसार दुसर्या दिवशी तर फारच छान लागतो.
फोटो जबरी आलाय, मी नेहमी साखर
फोटो जबरी आलाय, मी नेहमी साखर घालुन करते, आता गुळ घालून करुन बघेल.
सगळं भस्सकन ओतलं तर एक विचित्र गोळा तयार होईल >>> सहमतच! निट जमुन आल तर गोळा थापुन वड्या कापता येतात, मुलीला लहानपणी आवडायच फिन्गरफुड म्हणुन
फोटो छान आलाय .. माझ्या
फोटो छान आलाय ..
माझ्या बाबांचा आवडता पदार्थ .. पण आमच्याकडे थोडा सरसरीत करायची आई आणि ती बहुतेक साखर घालायची ..
एकदा करून बघेन ..
मस्त. रवाळ कणीक म्हणजे कशी?
मस्त. रवाळ कणीक म्हणजे कशी? कोणता ब्रँड वापरलास?
सायो, "सुजाता मल्टिग्रेन कणीक
सायो, "सुजाता मल्टिग्रेन कणीक किंवा लाडवांसाठी जरा जाडसर कणीक मिळते ती चालेल."
( पुरा पढते क्यों नही? ;))
अर्र, अहो आक्का, जिन्नस वाचून
अर्र, अहो आक्का, जिन्नस वाचून फोटो बघितला. तो बघून बाकी काही सुचलंच नाही बघा.
आहो, आक्का कोण?
आहो, आक्का कोण?
शिरा म्हणण्यापेक्षा हलवा शब्द
शिरा म्हणण्यापेक्षा हलवा शब्द योग्य होइल का ?
नाही! हिन्दीमध्ये ते योग्य
नाही! हिन्दीमध्ये ते योग्य होईल पण सहसा मराठीत भाज्यांच्या गोड पदार्थाला हलवा म्हणतात. शिरा हा धान्याच्या रव्याचा असतो. ( उद्या कुणी दुधी हलवा रेसिपी टाकली व त्याला दुधीचा शिरा नाव दिले तर ते मिस्लिडींग होईल )
मस्त रेसिपी व फोटो!!
वॉव! मस्त आहे फोटो. मला
वॉव! मस्त आहे फोटो. मला प्रचंड आवडतो हा शिरा.
मस्त. आणि पौष्टिक पण.
मस्त. आणि पौष्टिक पण.
मुगाच्या शिर्यालाही मुगाचा
मुगाच्या शिर्यालाही मुगाचा हलवा म्हणतात
मस्त मऊमोकळा झालाय शिरा. खूप
मस्त मऊमोकळा झालाय शिरा. खूप मन लावून, वेळ घेऊन केलेला आहे हे कळतंय
सुंदर फोटो!!
सुंदर फोटो!!
छान रेसिपी .आणि फोटो तर
छान रेसिपी .आणि फोटो तर सह्हीच
वा तृप्ती ...अगदी शेमटुशेम
वा तृप्ती ...अगदी शेमटुशेम माझीच पाकृ.
मुलं लहान होती ना तेव्हा दर वर्षी पहिला पाऊस सुरू झाला की मुलांसाठी हा शिरा आणि भजी असा बेत माझी नणंद करायची. मग मीही तेच करायला लागले तिचं बघून. आता सगळे चारी दिशांना पांगले पण सीझनचा पहिला पाऊस आला की या शिराभजीची आठवण हमखास सगळ्यांनाच होते.
फोटो दृष्ट लागण्याजोगा आला
फोटो दृष्ट लागण्याजोगा आला आहे. रेफ्रिजरेटर खजाना पार्टीसाठी पण चांगला आहे
आता हा मल्टीग्रेन आटा शोधावा लागेल.
मस्त फोटो!.. करुन बघेन
मस्त फोटो!.. करुन बघेन
छान रेसीपी. मस्त लागतो हा.
छान रेसीपी. मस्त लागतो हा. करके देखतुं.
मस्त फोटो आणि आवडता पदार्थ.
मस्त फोटो आणि आवडता पदार्थ.
वॉव.. गुरुद्वार्या त
वॉव.. गुरुद्वार्या त मिळणार्या परशादा सार्ख..अर्थात मायनस बदाम्,वेलची वगैरे..
मस्तये रेस्पी..
लिपिड प्रोफाईल पाहून तूप घेणे अगदी!!अगदी!!
फोटो मस्त !
फोटो मस्त !
सुर्रेख दिसतोय फोटो. एकदम
सुर्रेख दिसतोय फोटो. एकदम लाळगाळू!
वेका, इंडियन ग्रोसरी
वेका, इंडियन ग्रोसरी स्टोअरमध्ये स्वादचं जरा रवाळ पीठ मिळतं गव्हाचं, ते चालेल. मी तेच वापरलं आहे.
मानुषी, ही मायबोलीकर मृण्मयीनं दिलेली पाककृती आहे, मी केवळ विपूवाहक
तिच्याचतर्फे सर्वांचे आभार
आहाहा.. कणकेचा शिरा (आईच्या
आहाहा.. कणकेचा शिरा (आईच्या हातचा) फाआआआअर्र आठवतोय!
मृ आणि सिंडी, आभार्स!!
आता खुदके हातसे बनाके खाना पडेगाच.
यम्मी!! मला इतर कुणी करून
यम्मी!! मला इतर कुणी करून दिला तर खाईन बापडी! करायला बरेच कष्ट वाटत आहेत!
अन आता जो ही रेसिपी वाचेल तो टिपापात ४ पोस्टी जाऊन टाकायला लागला तर जबाबदार कोण आँ ?!!
चार पोस्टी
चार पोस्टी
वाह! यातल्या तुपाच्या सढळ
वाह! यातल्या तुपाच्या सढळ वापरामुळे कधी घरी हा शिरा करायचं धैर्य झालं नाही. पण अनेक पंजाबी, गुजराती व मारवाडी स्नेह्यांकडे कणकेचा, तुपात ओथंबलेला, सुक्या मेव्याने सजलेला गरमागरम शिरा खाल्लाय. पोटात गपगार पडून राहातो आणि असा शिरा खाऊन येणारी सुस्तीही काय वर्णावी!!
खरंतर मी हा कधीच घरी खाल्लेला
खरंतर मी हा कधीच घरी खाल्लेला नाही ( कोकणस्थांत बनवत नाहीत बहुतेक ). इथे आल्यावरच पहिल्यांदा खाल्ला, स्वतः बनवून खावा इतपत त्याबद्दल प्रेम निर्माण झालेच नाही. आता साग्रसंगीत रेसिपी मिळालीये म्हणजे बनवून बघायलाच हवा
संपदा, नागपूरकरांनी दिलेली
संपदा, नागपूरकरांनी दिलेली आहे रेसिपी म्हटल्यावर तू तर केलीच पाहिजे
मस्त रेसिपी, फोटो.
मस्त रेसिपी, फोटो.
Pages