_१ वाटी रवाळ कणीक
_लिपिड प्रोफाइल बघून पाव ते अर्धी वाटी साजुक तूप
_१ वाटी फुल फॅट गरम दूध + शिपके मारून शिजवायला लागेल तसं
_वेलदोडा पावडर
_पाव वाटी खडबडीत बदाम पावडर
_अर्धी वाटी किसलेला गूळ
- जाड बुडाच्या कढईत कणीक आधी कोरडीच, मंद आचेवर भाजायला घ्यायची.
- टीपाप्यात चार पोस्टी टाकायच्या. सटरफटर बाफं वाचायचे. अधेमधे कणकेला ढवळत रहायचं. चांगली अर्धा तास भाजून झाली की आता थोडं थोडं तूप ओतून भाजायची.
- सगळं तूप ओतून झाल्यावर कणीक कोरडी दिसायला नको. तशी दिसली तर (लि.प्रो. नुसार) चमचाभर तूप घालायचं.
- कढत दूध थोडं थोडं ओतून कणीक फुलवायची. सगळं भस्सकन ओतलं तर एक विचित्र गोळा तयार होईल आणि त्याचा गाभा गुळाचा अनुल्लेख करेल.
- झाकण ठेवून शिजू द्यायची.
- गूळ, वेलदोडा पावडर घालून परतायचं.
- गूळ वितळून लगदा होईल. पण धीर न सोडता लगदा परतायचा, त्यात बदामपूड घालायची.
- लापशीछाप आवडत असेल तर आत्ताच खायला घ्यायचा. नाहीतर थोडा आणखी परतायचा.
_सुजाता मल्टिग्रेन कणीक किंवा लाडवांसाठी जरा जाडसर कणीक मिळते ती चालेल.
_अर्धी वाटी गूळ घालून बेताचा गोड शिरा होतो. आणखी कमी गोड हवा असल्यास अर्थातच गुळाचं प्रमाण कमी करावं.
_गुळाऐवजी रॉ ब्राउन शुगर चालेल.
_वेलदोड्याच्या जोडीनं जायफळ किसून घातलं तरी चांगलं लागेल.
_पानात वाढायच्या कमीत कमी तासभर आधी तरी शिरा तयार असावा. मुरला की जास्त छान लागतो. शिर्यांच्या अलिखित नियमानुसार दुसर्या दिवशी तर फारच छान लागतो.
खल्लास दिसतोय शिरा! मला
खल्लास दिसतोय शिरा! मला आवडतो! मी करणार नक्की!
'शारदाबेन'च्या हातचा इतका
'शारदाबेन'च्या हातचा इतका खाल्ला की आजतागायत त्याच नाव काढल नाही.
या पद्धतीने एकदा करुन बघायला हवा.
रेसिपी आल्या दिवशी मी करुन
रेसिपी आल्या दिवशी मी करुन पाहण्याचा विक्रम या रेसिपीच्या नावे झाला आहे. शिरा मस्त झालाय. कनक गूळ पाऊण वाटी घातला. सिंडी अन मृणला धन्यवाद.
मी सुद्धा केला . मस्तच झालाय,
मी सुद्धा केला :). मस्तच झालाय, धन्यवाद सिंडे :).
बदामाची भरड पूड असल्याने ते छोटे पांढरे कण दिसत आहेत.
सुंदर!!! करता येणार नाही
सुंदर!!! करता येणार नाही कारण टीपापात पोष्टी टाकत नाही. मग कच्चाच होऊन जाईल नाहीतर गोळा...
आई नेहमी भाजलेल्या गव्हाच पीठ
आई नेहमी भाजलेल्या गव्हाच पीठ पाठविते. लाडु करावेत म्हणुन.(लाडु पण पाठविते. पण हे मी परत करेन म्हणुन) खास दळुन आणलेल असत ते. त्याचा करून पाहिन हा शिरा.
तृप्ती आवटी बाई , फोटो जबरी आहे.
'शारदाबेन'च्या हातचा इतका
'शारदाबेन'च्या हातचा इतका खाल्ला >>> हां? मग आम्हाला होम डिलिवरी नाही आली ते?
संपदा, भारी दिसतोय शिरा. असा छान केशरी रंग कशानं आला?
नताशा, लगे रहो
सुनिधी, चार मैत्रिणींची विचारपूर कर की मग
मस्तच! पण तूप घालून कणीक
मस्तच!
पण तूप घालून कणीक भाजली तर नाही का चालत? जळण्याचे कमी चान्सेस.
आणि चवपण छान येते ना तूपावर खमंग भाजण्यानी.
खरंतर मी केशरसुद्धा नाही
खरंतर मी केशरसुद्धा नाही घातलंय. मी कणीक बराच वेळ भाजली, अफलातून झालाय मात्र
छान दिसतोय . कंटाळा वाल्यांनी
छान दिसतोय :).
कंटाळा वाल्यांनी आसपासच्या गुरुद्वारात जाऊन खावा, बरोबर पोट्भर जेवणही फ्री !
बे एरीया वाल्यांनी फ्रिमाँट किंवा सॅन होजे गुरुद्वारामधे ट्राय करा.
डिजे, हो फ्रिमाँट
डिजे, हो फ्रिमाँट गुरुद्वारामध्ये खाल्लाय. तुपात थबथबलेला
पाककृती इथे दिल्याबद्दल
पाककृती इथे दिल्याबद्दल सिंडीचे आभार!
मंजूडीनं (विपुतपाकृलिहिल्याबद्दलचकारशब्दहीनबोलताथेट) प्रतिक्रिया दिली, म्हणून तिचेही आभार!
संपदा, फोटोत शिरा सही दिस्तोय.
>>पण तूप घालून कणीक भाजली तर नाही का चालत? जळण्याचे कमी चान्सेस.
राखी, जाड बुडाच्या कढईत, मंद आचेवर भाजली तर कणीक जळणार नाही. आधी कोरडी भाजून घेऊन मग तूप घातल्यावर चवीत जाणवण्याइतका फरक पडतो. शिरा जास्त खमंग लागतो.
हो राखी , फारच थबथबलेला असतो
हो राखी , फारच थबथबलेला असतो !
हो सिंड्रेला. आता कोणाच्या
हो सिंड्रेला. आता कोणाच्या विपुत मी काही लिहिले की समजा मी हा शिरा करायला घेतलाय. ... बहुतेक उद्या नंबर लागेल याचा... यम्म!!!
मंजूडीनं
मंजूडीनं (विपुतपाकृलिहिल्याबद्दलचकारशब्दहीनबोलताथेट) प्रतिक्रिया दिली,>>> हे मी 'मंजूडीनं बोथट प्रतिक्रिया दिली' असं वाचलं
खरंतर या पाकृची विपू मी वाचली नव्हती, थेट पाकृच वाचली म्हणून चक्कार शब्दही काढला नाही बरं का
मस्त पाकृ.
मस्त पाकृ.
मस्त पाकृ. आईची आठवण आली...
मस्त पाकृ. आईची आठवण आली...
कोणतंही पीठ (लाडूसाठीसुद्धा)
कोणतंही पीठ (लाडूसाठीसुद्धा) भाजताना अगोदर थोडा वेळ कोरडं भाजून मग तूप घातलं तर जास्त चांगलं भाजलं जातं नि खमंग होतं. आधीच तूप घातलं की भाजायला जड जातं.
बरं आता प्रश्न! रवाळ कणीक नाहिये. इतक्यात रवाळ दळण घ्यायची शक्यता कमी आहे. तर साध्या कणकेचा करू का? जरा जास्त पेशन्सनी भाजली कणीक, तर गिच्चगोळा होणार नाही अशी आशा करावी का?
छान रेसिपी .आणि फोटो.
छान रेसिपी .आणि फोटो.
आई असाच करते! 'मन लावून'
आई असाच करते! 'मन लावून' किंवा 'चित्त भाजण्यात ठेवुन' कणीक भाजल्यास हा शिरा मस्त होतो!
दोन्ही फोटो कातिल! उद्या जाड कणीक शोधण्याचे काम मागे लागले!
बरं आता प्रश्न! रवाळ कणीक
बरं आता प्रश्न! रवाळ कणीक नाहिये. इतक्यात रवाळ दळण घ्यायची शक्यता कमी आहे. तर साध्या कणकेचा करू का? जरा जास्त पेशन्सनी भाजली कणीक, तर गिच्चगोळा होणार नाही अशी आशा करावी का?
मनस्विनीनेही कणकेच्या शी-याची पाकृ दिली होती. त्यात रवाळ कणिक नसेल तर दोन चार चमचे रवा घालुन कणिक 'रवा'ळ करण्याची सुचना होती. इच्छुकांनी करुन पाहावे.
मीही अर्थात करुन पाहिनच. कणकेचा शीरा अतिशय आवडीचा प्रकार आहे. इथले फोटो अगदीच वाईट आहेत, बघुन बघुन हालत खराब होतेय.....
(हा प्रकार तुपात थबथबवुन करुन घालणारी व्यक्ती आता दुरदेशी निघुन गेल्यावर माझ्या हातुन तितके तुप पडेल का हा प्रश्न आहेच, तरीही...)
मनःस्विनीने दिलेली कृती काढली
मनःस्विनीने दिलेली कृती काढली काय तिनं? मला तरी नाही सापडली.
बदामाची पूड पण अगदी वस्त्रगाळ न करता जरा खरबरीत केली तर कणिक आणि पूड मिळून coarse मिश्रण होइल.
त्यात रवाळ कणिक नसेल तर दोन
त्यात रवाळ कणिक नसेल तर दोन चार चमचे रवा घालुन कणिक 'रवा'ळ करण्याची सुचना होती. इच्छुकांनी करुन पाहावे.>>> हं... आला हाही विचार एकदा मनात. पण मग संपूर्ण कणकेचा असा नाही ना होणार तो शिरा. बदामपूड भरड घ्यावी असं वाटतंय.
एकूणातच शिरा म्हणजे जीव की प्राण आहे मला.. रव्याचाही. त्यामुळे 'रवा'ळही करीन. बघू कायकाय घडतंय हातून!
मी नॉर्मल कणकेचाच केलाय.
मी नॉर्मल कणकेचाच केलाय. रवाळ कणीक मिळेपर्यंत धीर कोणाला? अतिशय शांतपणे आणि भरपूर भाजल्यास कणिक अजिबात गिच्चगोळा होत नाही.
फारच धिराची संपदा
फारच धिराची संपदा
संपदा, माझ्याकडे
संपदा, माझ्याकडे अन्नपूर्णा/पिल्सबरी सारखा आटा आहे त्याचा करू म्हणतेस?
अनु, कर साध्या कणकेचा, हरकत
अनु, कर साध्या कणकेचा, हरकत नाही. सिंडीने लिहिल्याप्रमाणे दूध थोडं थोडं घालायचं, मग शिरा मस्तच होतो :).
रवाळ कणिक नसल्याने जाड रवा
रवाळ कणिक नसल्याने जाड रवा मिक्सरवर वाटून हा शिरा सकाळी केला होता. बदाम घातले नसूनही अतिशय छान झाला होता. पाकक्रुतीबद्दल धन्यवाद.
माझ्याकडे 'आशिर्वाद' चे कणिक
माझ्याकडे 'आशिर्वाद' चे कणिक आहे (गॅस सबसिडीचा फॉर्म भरल्यावर भारतगॅसने फ्री दिलयं :डोमा:) त्याच्या पोळ्या चिवट झालेल्या. शिरा चांगला होईल का?
शेवटी न रहावुन घरी असलेल्या
शेवटी न रहावुन घरी असलेल्या पिल्सबरी कणकेचाच केला. मी कोब्रा असल्याने थबथबेपर्यंत तुप घालण्याचे डेअरिंग झाले नाही. पण अप्रतिम झाला होता. मोकळा, मऊ तरी ही शिजलेला. गुळामुळे रंग ही सुंदर आला होता. फोटो नाही काढला मात्र. आता लवकरच होईल पुन्हा. तेव्हा फोटो काढीन .
मी लोखंडी कढईत केला होता. त्यामुळे ही जास्त चांगली चव आली असेल का?
Pages