कणकेचा गोड शिरा
साहित्य : एक वाटी भरून गव्हाची जाडसर कणिक , एक सपाट वाटी भरून साखर , अर्धी वाटी साजूक तूप , दोन कप भरून दूध , आवडीप्रमाणे सुका मेवा (काजू,बदाम,बेदाणे,चारोळया व पिस्ता यांचे काप),किसलेले बारीक सुके खोबरे
कृती : प्रथम गॅसवर एका कढईत साजूक तूप गरम करून घ्यावे ,तूप गरम झाले कि त्यात कणिक घालावी व चांगली खरपूस वास येईपर्यंत सोनेरी रंगावर भाजून व परतून घ्यावी.मिश्रण जास्त कोरडे वाटल्यास अजून थोडे तूप घालावे. (कणीक योग्य प्रमाणात भाजली गेली नाही तर शिरा चिकट व गिच्च गोळा होतो व चावही बिघडण्याची शक्यता असते, म्हणूनच जास्त भाजणे) भाजून कणिक चांगली लालसर झाली कि त्यात दोन कप भरून दूध घालावे व लगेचच साखर घालावी व चांगले परतून घ्या व लगेचच सुका मेवा घालून पुन्हा परतून घ्या.शिरा भांड्याला खाली चिटकू शकतो म्हणूनच सतत परतत रहावे. दूध घातल्यानंतर साधारण ५ मिनिटातच कणिक आळायला लागते म्हणजेच समजावे कि शिरा तयार झालेला आहे लगेच गॅस बंद करून गरमागरम शिरा सर्व्ह करावा .
कणकेचा गोड शिरा
Submitted by pltambe@yahoo.co.in on 3 April, 2014 - 20:34
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मस्त! मला रवा आणी कणिक
मस्त! मला रवा आणी कणिक दोन्हीचा शिरा खूप आवडतो. गुळाचा पण मस्त होतो.:स्मित:
धन्यवाद!
मस्त लागतो हा शीरा. माझ्या
मस्त लागतो हा शीरा. माझ्या एका मित्राने हा बनवण्यात पिएच्डी केलीय. मी त्याचा हातचाच खाते. मी बनवलेला खास होत नाही
मस्त! ...
मस्त! ...
गुळाचा पण मस्त
गुळाचा पण मस्त होतो........गुळाचे प्रमाण सांगा ना.
मस्त,.. करुन पाहणार.
मस्त,.. करुन पाहणार.
मस्त दिसतोय फोटो! जाडसर कणिक
मस्त दिसतोय फोटो!
जाडसर कणिक वेगळी विकत मिळते का?
मस्त दिसतोय फोटो! जाडसर कणिक
मस्त दिसतोय फोटो!
जाडसर कणिक वेगळी विकत मिळते का?
देवकी गुळ पाऊण वाटी बास होतो.
देवकी गुळ पाऊण वाटी बास होतो. पण आधी पाणी घालुन वाफ द्यायची. गुळ घातला की दूध घालु नये. मात्र त्यात जायफळ वेलचीचा मस्त वास लागतो/ चव पण छान येते.
धन्यवाद रश्मी!
धन्यवाद रश्मी!