नैसर्गिक संसाधनांमधून गणेश - ऋतुराज.
गणपती बाप्पा मोरया
गणपती बाप्पा मोरया
कुठेही नदीकिनारी , समुद्रकिनारी, डोंगरात असो वा जंगलात, भटकायला गेल्यावर तिथले दगड, खडे, वाळू, शंख - शिंपले गोळा करून आणणे हा माझा आणि आता माझ्या लेकीचा देखील एक छंद आहे.. घरी आणून छान स्वच्छ धुवून लेबल लावून ठेवायचं. अश्या ऐवजांनी भरलेल्या बऱ्याच लहान मोठ्या थैल्या, डब्ब्या आहेत घरात.
त्यापैकी काही सामान वापरून गणपती बाप्पा साकार झाला.
टेरेसवर लावलेल्या प्राजक्ताच्या झाडाला काही दिवस खूप फुलं येत होती. तेव्हा केलेला हा प्रयत्न - पावसामुळे फुलं ओली झालेली ते पाणी पडलयं कागदावर. सध्या बहर ओसरला आहे त्यामुळे पुन्हा जमेल न जमेल म्हणून तोच फोटो देत आहे.
सगळे त्या मीम्सच्याच धाग्यावर बागडत आहेत, ऑफ कोर्स मस्तच धमाल चालली आहे तिकडे. इथे अजून कोणीच श्रीगणेशा केला नाहीये म्हणून माझ्या कडून हा छोटासा प्रयत्न.
दहा बारा काजू गर आणि वेळ म्हंजे पाच मिनिटं एवढच लागलं हा गणपती करायला.
कसे आहात छोट्या दोस्तांनो?
गणपती बाप्पाचे आगमन झाले ना? मग झाला का प्रसाद खाऊन?
आता शाळेला सुट्टी असेलच, मग थोडा फार तरी अभ्यास करताय ना? काय म्हणता कंटाळा आलाय ?
मग तोच कंटाळा घालवायला आम्ही एक उपक्रम घेऊन आलो आहोत
तर, तुम्हाला बनवायचं आहे बाप्पासाठी एक सुंदर तोरण किंवा छान छान पताका. यासाठी तुमच्याकडे उपलब्ध असणारे वेगवेगळे कागद, पुठ्ठा किंवा कापड वापरू शकता. शक्यतो प्लास्टिकचा वापर टाळाच. तोरण/ पताका सजवण्यासाठी तुम्ही निरनिराळे रंग, टिकल्या, मणी अश्या इतर वस्तू वापरू शकता.
नागपुरात बालजगत या संस्थेतर्फे दरवर्षी बाळ-गोपाळांसाठी विविध उन्हाळी शिबिरांचे आयोजन केले जाते. यात अडीच वर्षांच्या बाळांपासून ते १२-१३ वर्षांच्या किशोरांसाठी अनेकविध उपक्रम असतात. यात पोहणे, कराटे, बास्केटबॉल अशा शारीरिक खेळांबरोबरच विविध हस्तकला, गायन-वादन , शास्त्रीय नृत्य तसेच इंग्लिश व संस्कृत भाषेचे वर्ग घेतले जातात. या व्यतिरिक्त बुद्धिबळ, नाट्यकला, रांगोळी,बाल -संस्कारवर्ग इ. अनेक शिबिरे राबवली जातात.