कला उपक्रम: नैसर्गिक संसाधनांमधून गणेश : मृण्मयी (मनिम्याऊ)

Submitted by मनिम्याऊ on 17 September, 2024 - 07:20

कुठेही नदीकिनारी , समुद्रकिनारी, डोंगरात असो वा जंगलात, भटकायला गेल्यावर तिथले दगड, खडे, वाळू, शंख - शिंपले गोळा करून आणणे हा माझा आणि आता माझ्या लेकीचा देखील एक छंद आहे.. घरी आणून छान स्वच्छ धुवून लेबल लावून ठेवायचं. अश्या ऐवजांनी भरलेल्या बऱ्याच लहान मोठ्या थैल्या, डब्ब्या आहेत घरात.
त्यापैकी काही सामान वापरून गणपती बाप्पा साकार झाला.
IMG-20240917-WA0001.jpg

मुख्य दगड वर्धा नदीत सापडलेला गोटा... त्यात गणेशाचा आकार दिसतच होता.. मी फक्त हायलाईट केलं. नदीतले आणि समुद्रातले शंख शिंपले वापरून हा एकदंत आकार घेऊ लागला. तांदुळाच्या अक्षता वापरून कपाळी गंध सजवले, मसुरीची डाळ गळयात माला बनली. तर लवंगीचे देठ वापरून गजनेत्र सजले.

IMG-20240917-WA0003.jpg

एक रिकामा पडलेला ट्रे घेतला. त्यात छोटंसं गार्डन रुजवलं. हरळी लावली, छोटी छोटी फुलझाडे लावली आणि त्यात या गणेशाची स्थापना केली. आजूबाजूला आधाराला व सजावटीसाठी म्हणून इतर लहान लहान दगड ठेवले.. गणेशासमोरचे जांभळे दगड नर्मदेतील तर पाय गंगेतील गोटे आहेत. मागे आधाराला ब्रह्मपुत्रेच्या व इंद्रावतीच्या पात्रातील खडे आहेत.
समोर पाना-फुलांनी रांगोळी काढली
IMG_20240917_164534.jpg
असा हा रॉक गणेश आमच्या बाल्कनी बागेची शोभा वाढवतोय.
या दर्शनाला
IMG_20240917_161516.jpg
.
IMG_20240917_164519.jpg
दिवेलागणीनंतर
IMG-20240917-WA0013.jpg

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुंदरच
नर्मदा गंगा वर्धा सगळ्या नदीतून बाप्पा साकार

फारच सुंदर झाला आहे. तुम्ही कुठली सामग्री वापरली ते लिहिल्याने वाचताना काही वेगळंच वाटत होतं.
पाना फुलांत इतका सुरेख दिसतोय. _/\_

सुंदर!

खूप च छान.
शिळेतून बाप्पा साकारला की बाप्पा प्रकट झाला?
अहोभाग्य आणि अप्रतिम कलागुण!

खूप सुंदर!
गणपती बाप्पा मोरया! _/\_

श्री गणेशाला नमस्कार. खूपच सुंदर आणि कल्पकतेतून सादर केली आहे मूर्ती म्रृण्मयी.तू एक उत्तम शिल्पकार होऊ शकते.अभिनंदन आणि पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा तुला आणि तुझ्या गोड गोड माउला.