हस्तकला उपक्रम : गणपतीसाठी पताका / तोरण तयार करणे, लहान गट

Submitted by संयोजक on 6 September, 2024 - 08:41

कसे आहात छोट्या दोस्तांनो?

गणपती बाप्पाचे आगमन झाले ना? मग झाला का प्रसाद खाऊन?
आता शाळेला सुट्टी असेलच, मग थोडा फार तरी अभ्यास करताय ना? काय म्हणता कंटाळा आलाय ?
मग तोच कंटाळा घालवायला आम्ही एक उपक्रम घेऊन आलो आहोत

तर, तुम्हाला बनवायचं आहे बाप्पासाठी एक सुंदर तोरण किंवा छान छान पताका. यासाठी तुमच्याकडे उपलब्ध असणारे वेगवेगळे कागद, पुठ्ठा किंवा कापड वापरू शकता. शक्यतो प्लास्टिकचा वापर टाळाच. तोरण/ पताका सजवण्यासाठी तुम्ही निरनिराळे रंग, टिकल्या, मणी अश्या इतर वस्तू वापरू शकता.

तर मग बनवा घरातील वस्तूंपासून एक सुरेख तोरण किंवा पताका, आणि पाठवा त्याचा फोटो आमच्याकडे .

धाग्याचे शीर्षक खालीलप्रमाणे असावे.
हस्तकला उपक्रम- तोरण/पताका - तुमचा मायबोली आयडी - छोट्यांचे पूर्ण नाव

नियम-
१) हा छोट्या दोस्तांसाठीचा उपक्रम आहे, स्पर्धा नाही.
२) हा उपक्रम फक्त मायबोलीकरांच्या मुलामुलींकरता आहे.
३) वयोगट - 15 वर्षे पर्यंत.
४) तोरण/ पताका हे मुलांनी बनवलेले असावे.
५) तोरण / पताका प्रवेशिका गणेश चतुर्थीपासून, ७ सप्टेंबर २०२४ (भारतीय प्रमाण वेळ) ते १७ सप्टेंबर २०२४ (अमेरिकेची पश्चिम किनार्‍यावरची प्रमाणवेळ) पाठवता येतील.
६) प्रत्येक प्रवेशिकेला "मायबोली गणेशोत्सव २०२४" अशी शब्दखूण द्यावी

छोट्या दोस्त मंडळींनो, पाठवताय ना मग तुम्ही तयार केलेली तोरणे, पताका ?

!!! गणपती बाप्पा मोरया !!!

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users