तों.पा.सु.
तों.पा.सू. - उकडीचे मोदक - साक्षी
क्ले पासून बनवलेला पदार्थ : मोदक आणि वरून रवाळ तूप
साहित्य : पांढर्या रंगाची क्ले, रांगोळी, पाणी
कृती : क्लेचा मोदक बनवला आणि तूपासाठी रांगोळीत थोडेसे पाणी घातले.
तों.पा.सु.-स्वीट ट्रिट- कालाजाम-Maithilipingle
स्वीट ट्रिट- कालाजाम
साहित्यः- टेबलटेनिस बॉल- गुलाबजामसाठी,नेलपेंट्-रंगासाठी,फेविकॉल्-चिकटवण्यासाठी,सिल्व्हरफॉइल्-चांदीचावर्क,शेविंगक्रिम्-क्रिम्,क्रेपकागद्-पिस्ता.
तों.पा.सू. - फलाहार - सौरभ उप्स
शाडूच्या मातिपसून तयार केलेली सर्वांच्या आवडीची काही फळे.
साहित्य : व्यवस्थित मऊसर अशी शाडूची माती, acrylic कलर्स, पेंटिंग ब्रश, पाणी, लाकडाच्या काड्या किंवा झाडाच्या फांदिचे तुकडे (देठाकारिता)...
कृति: प्रथम शाडूची माती व्यवस्थित मलून घ्यायची, मग तिला फळआन्सरखा आकार द्यायचा...
पाण्याच्या सहाय्याने व्यवस्थित स्मूथ आकार द्यावा, मग आकर देताना उमटलेले ठसे ब्रश आणि पाण्याच्या सहाय्याने स्मूथ करायचे...
मग देठासाठी लाकडाच्या काड्या किंवा झाडाच्या फांदिचे तुकडे योग्य ठिकाणी रोवावे..
तों.पा.सु. - खमण ढोकळा - चहाबाज
खमण ढोकळा
साहित्यः पिवळा बाथ स्पंज, पांढरा दोरा, हिरवा क्रेप कागद, काळे मणी
कृती: पिवळ्या रंगाचा जाळीदार बाथ स्पंज घ्यावा. (आंघोळीसाठी न वापरलेला!!). एका धारदार सुरीने त्याचे चौकोनी तुकडे करावे. त्यावर काळे मणी, कातरलेला पांढरा दोरा (ओले खोबरे) आणि क्रेप कागदाचे तुकडे (कोथिंबीर) पसरावे. झाला ढोकळा तयार!
तों.पा.सू. - 'मिठास' - लाजो
|| जय श्री गणेश ||
'मिठास'
असं म्हणतात की मिठाई खल्याने बोलण्या -,वागण्यातही एक मिठास येते म्हणुन आम्ही खास मिठाईभरलं तबकच वाढुन आणलय तुम्हां करता... आपल्या आवडीची मिठाई उचला अन गट्टम करा
श्री गणेशाच्या कृपेने 'मिठास' पुर्या माबोवर पसरू द्या
उपलब्ध मिठाई:
काजू कतली,
पिस्ता बर्फी,
रोझ फ्लेवर्ड बर्फी,
चॉकलेट मावा बर्फी,
तों.पा.सू. - छोटे बडे - saakshi
छोटू............
त्याचा आणखी एक फोटो...
आणि हा मोठुला....
हा त्याचा आणखी एक फोटो
हा
साहित्यः
छोटू केक : क्ले, शेविंग फोम
क्ले वापरून केक केला आणि वरचं क्रीम शेविंग फोम....
मोठुला केक:
टॉवेल, napkin, लाल रिबीन.
तों.पा.सू. - पार्टी टाईम - वर्षा व्हिनस
नमस्कार मायबोलीकर्स,
तों.पा.सु., मायबोली गणेशोत्स्व २०१२ या स्पर्धेसाठी मी थीम निवडली आहे "पार्टी टाईम", मग यामध्ये बर्थडे पार्टी, वेडिंग पार्टी किंवा आपले एखादे घरगुती गेटटुगेदर असो, त्यासाठी आपला सर्वसाधारण मेनु असतो केक,मिठाई,स्वादिष्ट जेवण व शेवटी मुखवास म्हणुन पानाचा विडा
मी स्वादिष्ट जेवण वगळता बाकीचे पदार्थ बनवले आहेत, तर सर्व मायबोलीकरांना विनंती कि त्यांनी या चविष्ट व तोंपासु पदार्थाचा मनमुराद आस्वाद घ्यावा ( अर्थात फक्त फोटो पाहुन )
हे पदार्थ बनविण्यासाठी मी वापरलेले साहित्य खालीलप्रमाणे
साहित्य :-
१. क्ले
२. सिल्व्हर फॉईल
३. कार्डपेपर
४. फेव्हिकॉल
५. रंग
तों.पा.सु. - केक आणि कॉफी - avatar
साहित्य- रांगोळी, वॉटर कलर, पाणी, toothpaste, crayon, shaving cream
पिवळ्या रंगाच्या रान्गोळीत थोडे पाणी घातले. गोळा तयार होइल इतके. केकचा रंग यायला थोडा रंगही घालू शकतो.
तो गोळा मोल्डमधे दाबून बसवला आणी मोल्ड् उलटा करुन मोल्डमधून सोडवला. वर टुथपेस्ट्चे आयसिन्ग आणि चॉकलेटी रंगाचे चॉकलेट आयसिन्ग घातले.
पांढर्या रंगात ब्राऊन रंग, पाणी मिसळून कॉफी केली. वर शेव्हिन्ग क्रीमचे क्रीम आहे. आणि crayons चे तुकडे.
तों.पा.सु. - नैवेद्यम् समर्पयामी | - डॅफोडिल्स
गणेशोत्सवाची तोंपासु स्पर्धा...... मग बाप्पाला नैवेद्य हवा ना ?
मोदक, पिस्ता बर्फी, चॉकलेट बर्फी, मोतीचूराचे लाडू देखील केले..
बाप्पा म्हणे कंटाळलो काहीतरी वेगळे दे आता मी अमेरिकेन आहे म्हणून तरी..
म्हणून मग कपकेक, डोनट्स आणि स्विस् रोल नैवेद्याला केले
तरीही स्वारी नाखुशच..म्हणे खूप खूप गोड झाले !
मग दिले मस्त तिखट तिखट मिर्च्यांसोबत दोन जंबो वडापाव..