संयोजनासाठी नाव द्यावं की नाही अशा चलबिचल अवस्थेतून झालेली सुरुवात आज "अरे! संपलं सुद्धा, आता परत इ-भेट कधी?" अशा हुरहुर लावणार्या अवस्थेत संपली. संयोजनासाठी नाव देताना, हां ठिके! नाव देऊ - झाली निवड तर नेमून दिलेले काम करून कार्य पार पाडू, हा का ना का! एवढं सोपं वाटलं होतं. सुरुवात झाली तीच मुळी फेल गेलेली व्हिडिओ कॉन्फरन्स - मुख्य संयोजकांनी दुसर्या मिटींग नंतर घेतलेली सपशेल माघार - दोन तीन संयोजकांचा नो शो - नव्या संयोजकांची शोधाशोध - त्यांच्याबरोबर पुन्हा करावी लागलेली अथश्री - अशी, बेरीज थोडी आणि वजाबाकी जास्त...
नमस्कार मंडळी,
गणेशोत्सवातील सर्व स्पर्धांमध्ये आपण बहुसंख्येनी सहभागी झालात, तसेच भरभरून दादही दिलीत, त्याबद्दल संयोजक मंडळातर्फे आपणासर्वांचे मन:पूर्वक आभार.
यावर्षी आम्ही ४ स्पर्धा आयोजित केल्या होत्या.
१. तों.पा.सु. - हस्तकला स्पर्धा
२. गर्जा महाराष्ट्र माझा - गटलेखन स्पर्धा
३. मिसळम् पाकम् गट्टम् गट्टम् ! - पाककृती स्पर्धा - गोड विभाग व तिखट विभाग
४. चित्र बोलते गुज मनीचे - काव्य-प्रकाशचित्र स्पर्धा
नमस्कार मंडळी,
गेले काही दिवस वाजत गाजत असलेल्या २०१२ मायबोली गणेशोत्सवाची आता सांगता झाली. आपण सगळ्यांनी बाप्पांना " गणपती बाप्पा मोरया | पुढच्या वर्षी लवकर या ||" असं सांगून ती सुफळ संपूर्ण करविली.
अगदी श्रीगणेशाच्या प्रतिष्ठापनेपासूनच मायबोलीकरांच्या मदतीचा ओघ सुरु झाला. उच्चासनारूढ अशा गणेशमूर्तीचे प्रकाशचित्र जिप्सी यांनी अगदी विनाविलंब दिले. (मंडप, आजूबाजूची आरास वगैरे कलाकुसर संयोजकांची बर्का!) चैतन्य दिक्षीत यांनी बासरीवादनाचे पार्श्वसंगीत देऊन प्रतिष्ठापनेच्या मंडपाचे पावित्र्य द्विगुणित केले. हार्दिक आभार जिप्सी आणि चैतन्य!
गणेशोत्सव २०१२ मधील दैनंदिन कार्यक्रम, स्पर्धा आणि उपक्रमांच्या कल्पक जाहीराती इथे एकत्रीत स्वरूपात देत आहोत.
श्री गणेश प्रतिष्ठापना:-

प्रकाशचित्रः- जिप्सी संकल्पना आणि मांडणी:_मधुरा_
स्पर्धा आणि उपक्रम :
via