तों.पा.सु. - खमण ढोकळा - चहाबाज

Submitted by चहाबाज on 28 September, 2012 - 11:28

खमण ढोकळा

साहित्यः पिवळा बाथ स्पंज, पांढरा दोरा, हिरवा क्रेप कागद, काळे मणी
sahitya.jpgdhokala.jpg

कृती: पिवळ्या रंगाचा जाळीदार बाथ स्पंज घ्यावा. (आंघोळीसाठी न वापरलेला!!). एका धारदार सुरीने त्याचे चौकोनी तुकडे करावे. त्यावर काळे मणी, कातरलेला पांढरा दोरा (ओले खोबरे) आणि क्रेप कागदाचे तुकडे (कोथिंबीर) पसरावे. झाला ढोकळा तयार!

वि.सू.: पटकन एक तुकडा तोंडात टाकण्याचा मोह मात्र आवरावा Happy

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्तच....

या स्पर्धेतल्या प्रवेशिका बघून एक वाईट गोष्ट मात्र घडणार आहे... खरेखुरे हे पदार्थ समोर आले, तर ते खरेच आहेत का, अशी शंका येत राहणार !

खरंच मायबोलीकर खूप चतुर आहेत. काय एक एक भन्नाट कल्पना आहेत ना!!! मस्त दिसतोय ढोकळा. आणि दिनेशदांनी म्हटल्याप्रमाणे आता खरे पदार्थ खाताना हे नक्की आठवणार. Happy

जबरा Happy काय सुरेख जाळीदार हलका झालाय ढोकळा...खरंच तोंपासु
पांढरा इरेझर (खोडरबर) किसून टाकला तर अगदी खोबरं वाटेल नाही ? Happy

Pages