टेरारियम (Terrarium) आणि वाढदिवसाची पार्टी

Submitted by मामी on 26 October, 2013 - 03:48

वाढदिवस साजरा करायचा म्हणजे सोपं थोडीच असतं? दरवेळी काहीतरी नविन क्लृप्ती काढायची. 'हटके' झालं पाहिजे, इतरांपेक्षा वेगळं काहीतरी आणि तरीही इंटरेस्टिंग!!! हम्म्.......

बरीच भवति न भवति होऊन लेकीच्या यंदाच्या अकराव्या वाढदिवसानिमित्तच्या पार्टीकरता थीम ठरली - टेरारियम (Terrarium).

टेरारियम म्हणजे अ‍ॅक्वेरीयम सारखीच बंद जागेत झाडं लावण्याची कला. Terra म्हणजे जमीन. तर बंद काचेच्या पारदर्शक भांड्यांतून छोटी छोटी, ज्यांना फार ऊनाची गरज नाही अशी इन्डोअर प्लँटस लावण्याची, ती जोपासण्याची कला. नुसतीच झाडं न लावता काही लहान, रंगित वस्तु वापरून त्यातून एक सुरेख लँड्स्केपही बनवता येतं. या भांड्यांवर काचेची झाकणं ठेवली तर आठवड्यातून केवळ एकदा पाणी देऊन पुरेसं होतं. कारण आतलं पाणी आतच राहिल्यानं रिसायकल होत राहतं.

या करता अत्यंत सुरेख सुरेख सिरॅमिक फिगरीन्स चीनमध्ये बनतात आणि अमेरीका, युरोपमध्ये मिळतात. आपल्याकडे सहज उपलब्ध होत नाहीत. पण या फिगरीन्स कसल्या मस्त असतात म्हणून सांगू! छोट्या रंगित मशरूम्स, फुलपाखरं, परीकथेतले नोम्स (gnomes), गोगलगाई, सुबक घरं... एक न दोन, चिक्कार प्रकार. हवे ते निवडा आणि सुरेख टेरारियम बनवा.

काही महिन्यांपूर्वीच नेटवर इथे तिथे हुंदडताना असल्या सुंदर सुंदर टेरारीयम्सचे फोटो हाती लागले होते. ते बघून भुरळ पडली होतीच. लेकीला तर फारच. (Terrarium असा सर्च देऊन बघा. कसल्या भारी भारी इमेजेस आहेत.) असं काही करायचंय म्हणून मागे लागली. मग काय? शोधाशोध सुरू.

लेकीच्या १५ मैत्रिणींकरता फिशबोल्स आणले, क्रॉफर्ड मार्केटमधून बरंच शोधून सुरेख लहान लहान (फायबरची) घरं आणि बाहुल्या आणल्या, चायनिज गिफ्टवाल्या दुकानांतून रंगित काचेच्या लांबटगोल गोट्या, चपट्या गोट्या मिळवल्या. रानडेरोडवरच्या कुंभाराच्या दुकानातून अगदी छोटी छोटी मातीची भांडी मिळाली. ती घेतली. अन घरी आणून अ‍ॅक्रिलिक रंगात लेकीनं आणि मी मिळून मस्त रंगवली.

टेरारियममध्ये काही विशिष्ट प्रकारची झाडं लागतात. त्यांची माहिती नेटवर आहे. ती झाडं देण्याचं आणि मुख्य म्हणजे टेरारियम बनवण्याची अ‍ॅक्टिव्हिटी मुलींकडून करवून घेण्याचं महत्त्वाचं काम एका ओळखीतल्या स्त्रीनं आनंदानं अंगावर घेतलं. या माझ्या मैत्रिणीची प्रभादेवीला झाडांची नर्सरी आहे.

दादर कबुतरखान्याजवळच्या विसावा हॉटेलच्या गल्लीत अत्यंत मस्त ज्युटच्या बॅग्ज मिळाल्या. काहींवर आधीच प्रिंटस होते. तीन बॅग्ज प्लेन होत्या. त्यावर पुन्हा आम्ही दोघींनी कुंचला चालवला. प्रत्येकीचा टेरारीयम बबल रॅपमध्ये गुंडाळून या ज्युटच्या बॅग्जमधून दिला. मुलींनीही जपून नेला.

मात्र या सगळ्या मेहनतीचं फळ फारच उत्तम आलं. लेकीच्या मैत्रिणींनी भारी आनंदानं टेरारीयम्स बनवली. (तीच त्यांची रीटर्न गिफ्टही होती). प्रत्येकीचा तिनं बनवलेल्या टेरारियमसोबत फोटो घेतला आणि केक कापणे आणि जेवणखाण इ. होईपर्यंत लगेच जवळच्या दुकानातून A4 साईजच्या जाड कागदावर प्रिंट करून लॅमिनेट करून जाताना प्रत्येकीला दिला.

एकूणात काय आम्ही खुष अन पब्लिक खुष. तुम्हीही या आनंदात सहभागी व्हा ....

फिशबोल्स आणि फिगरीन्स :

मातीची भांडी आणि काचेचे पेबल्स :

रंगवलेली भांडी :

सजवून वेगवेगळे प्रकार ट्रेजमध्ये घालून ठेवले. मुलींनी प्रत्येकातील एक्-एक आणि मग उरलेल्यातले हवे तसे निवडले. मग दोन-दोन, तीन-तीन मडकी टेरारीयममध्ये जाऊन बसली. एकीनं तर दोन दोन घरं देखिल टेरारियममध्ये ठेवली. Happy

या ज्युटच्या बॅग्ज - आधीच प्रिंट असलेल्या :

या आम्ही हात साफ करून घेतलेल्या :

अ‍ॅक्टिव्हिटीची जय्यत तयारी :

तयार टेरारियम्स :

हे लेकीनं केलेलं टेरारियम.

मुख्य विषयापासून दूर जातेय पण तरीही हे हवंच म्हणून - केक आणि खाऊ.

फोटो फक्त स्नॅक्सचेच आहेत - आल्याआल्या खाऊ दिला त्याचे. मुख्य जेवणात रेड पास्ता, व्हाईट पास्ता, डॉमिनोजचा पिझ्झा आणि चटणी सॅंडविचेस होती त्याचे फोटो काढले गेले नाहीत. नवरा, मी आणि खास बोलावलेला फोटोग्राफरही विसरलाच बहुतेक ते फोटो काढायला. Proud

विविध स्वादाची, रंगाची जेली :

जेली, सोया पफ्स, वेफर्स बिस्कीटं, ज्यूस (वाट्यांमधे नंतर पिझा पास्तावर घालण्याकरता पिझा सिझनिंग आणि चिली फ्लेक्स आहेत.) :

केक. आतून रेनबो केक होता. मात्र कापल्यावरचा फोटो नाहीये. :

टेरारियम प्रमाणेच आणखी एक अफलातून प्रकारही या निमित्ताने कळला - ब्रोकन पॉट गार्डनिंग. याकरता broken pot garden असा सर्च देऊन इमेजेस बघा. हा ही प्रकार आता करून बघणार आहे.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

ओह्ह!!! तू फिगरीन्स विचारत होतीस, माझ्या डोक्यात मातीच्या जरा हटके शेपच्या कुंड्या असलं काहीतरी भलतंच आलं होत. म्हणून तुला धारावी कुंभारवाडा सुचवला होता.

तुझम हे प्रोजेक्ट भाऽरी झालं आहे. खूप छान कल्पना आणि ती अंमलातही मस्तप्रकारे आणली आहे.

हे वॉव मामी..
सर्वात आधी लाराला हॅप्पी हॅपी वाला बर्थ डे!!!!!!!!
ग्रेट आहे आयडिया.. खूऊऊऊऊऊप्पच आवडली..

लगेच सर्च करायला बसतीये
थँक यू सो सो मच या नवीन अ‍ॅक्टिविटी ला इथे शेअरकेल्या बद्दल

धन्यवाद मंजूडी, वर्षुताई, पिन्की, वरदा आणि चैत्रगंधा. Happy

हो मंजूडी. ती फिगरीन्स, खोके आणि बबल रॅपची चौकशी याच करता होती. Happy

मस्त.
तू आणि तुझी लेक दोघीही खूपच उत्साही आहात. खूपच छान अ‍ॅक्टिव्हिटी आहे मुलांसाठी.
पुढच्या सुट्टीत करून बघणार.

लारा पॉलीमर क्ले वापरून फिगरीन्स बनवू शकेल. मशरुम्स, कॅटरपिलर, लेडीबग वैगरे सोप्प्या सोप्प्या वस्तू तर अगदी आरामात जमतिल. तसाही तिच्या "क्लेकारी" मध्ये सफाई आहे. Happy

लारा बिलेटेड हॅप्पी बर्थडे.
अगो धन्य आहात तुम्ही मामी आणि लेकही... काय अप्रतिम केलंय हे...
काय सुंदर प्रकार आहे हा टेरारियम.. भन्नाटच!!

आणि बर्थ्डेचा मेन्यू पण झक्कास

वॉव सो क्युट ना... लारा इज सो लकी कि तिची आई इतकी क्रियेटिव्ह आहे असेच लाराच्या सर्व मैत्रिणी बोलल्या असतील.

खुप सुंदर. आणि तिच्या सर्व मैत्रिंणी हे सगळे जपून ठेवतील. नक्कीच.

मी अशी झाडे अरुंद तोंडांच्या जारमधे वाढवलेली बघितली आहेत. ही रोपे त्या जारमधेच बियांपासून तयार केलेली असतात आणि मग त्यांची जोपासना करण्यासाठी चॉपस्टीकसारखी हत्यारे वापरावी लागतात. ( दुर्बिणीने शस्त्रक्रिया करतात तसे. ) मग आतमधे लँडस्केप केलेलं असतं. ( मुद्दाम लिहितोय कारण ही तुझ्यासाठी पुढची पायरी आहे Happy )

मामी, लेकीला वाढदिवसाच्या शुभेच्छा आणि शुभाशिर्वाद.
किती उत्साह तुला बाई... आणि लेकिलाही. लेक भाग्यवान आहे तुझी असच म्हणेन मी Happy

मामी, आणि लारा हार्दिक अभिनंदन.
लाराला हॅप्पीवाला बर्थ डे!
सुंदर उपक्रम, अफाट कष्ट!

मामी, मस्त. तुझ्या उत्साहाचे जास्त कौतुक.

टेरारीयमचे इमेजेस काय कातील दिसतायत नेटवर.

केक मस्त दिसतोय. अगदी थीमला साजेसा!!

सगळ्यांना धन्यवाद. Happy इतकं काही लाजवू नका रे. दोन वर्षांतून एकदा उत्साह दाखवायला काय जातंय?

दिनेशदा, हो ती एक वेगळीच कला आहे. बिया पेरतात का ते माहित नाही. पण बरेचदा ट्विझर्सनं अत्यंत कौशल्यानं छोटी झाडं आत नेऊन लावतात. भारीच चिकाटीचं काम आहे ते.

नंदिनी, हो गं. अत्यंत गोडुले टेरारियम्स आहेत. मॉस वगैरे लावून तर भारीच दिसतात.

लाराला बिलेटेड हॅपी बड्डे. फोटो बघायच्या नादात शुभेच्छा द्यायला पण विसरून गेले.
>>> मी पण Happy

लाराला हॅपी बर्थ डे आणि अनेक उत्तम आशीर्वाद.

धन्यवाद, लोक्स!

काचेच्या अत्यंत छोट्या बाटलीत टेरारियम बनवून त्यांची पेन्डन्टस देखिल बनवलेली आहेत हौशी लोकांनी.

आणि ब्रोकन पॉट गार्डन पाहिलं की नाही नेटवर?

वॉव!! सुंदर कल्पना आणि ती प्रत्यक्षात आणण्यासाठीची तुझी धडपडही कमालीची आहे! एन्ड प्रॉडक्ट काय सुरेख दिसतंय! मस्त, मस्त! थँक्स इथे शेअर केल्याबद्दल.
लाराला बिलेटेड हॅप्पीवाला बर्थडे! Happy

धन्यवाद, सगळ्यांना. Happy

लाराच्या सहाव्या वाढदिवसाच्या पार्टिला रंगित पानांच्या झाडाच्या कुंड्या सजवण्याची अ‍ॅक्टिविटी ठेवली होती. लहान वयोगटातल्या मुलांकरता ही अ‍ॅक्टिव्हिटी मस्त पडते.

Pages