टेरारियम (Terrarium) आणि वाढदिवसाची पार्टी

Submitted by मामी on 26 October, 2013 - 03:48

वाढदिवस साजरा करायचा म्हणजे सोपं थोडीच असतं? दरवेळी काहीतरी नविन क्लृप्ती काढायची. 'हटके' झालं पाहिजे, इतरांपेक्षा वेगळं काहीतरी आणि तरीही इंटरेस्टिंग!!! हम्म्.......

बरीच भवति न भवति होऊन लेकीच्या यंदाच्या अकराव्या वाढदिवसानिमित्तच्या पार्टीकरता थीम ठरली - टेरारियम (Terrarium).

टेरारियम म्हणजे अ‍ॅक्वेरीयम सारखीच बंद जागेत झाडं लावण्याची कला. Terra म्हणजे जमीन. तर बंद काचेच्या पारदर्शक भांड्यांतून छोटी छोटी, ज्यांना फार ऊनाची गरज नाही अशी इन्डोअर प्लँटस लावण्याची, ती जोपासण्याची कला. नुसतीच झाडं न लावता काही लहान, रंगित वस्तु वापरून त्यातून एक सुरेख लँड्स्केपही बनवता येतं. या भांड्यांवर काचेची झाकणं ठेवली तर आठवड्यातून केवळ एकदा पाणी देऊन पुरेसं होतं. कारण आतलं पाणी आतच राहिल्यानं रिसायकल होत राहतं.

या करता अत्यंत सुरेख सुरेख सिरॅमिक फिगरीन्स चीनमध्ये बनतात आणि अमेरीका, युरोपमध्ये मिळतात. आपल्याकडे सहज उपलब्ध होत नाहीत. पण या फिगरीन्स कसल्या मस्त असतात म्हणून सांगू! छोट्या रंगित मशरूम्स, फुलपाखरं, परीकथेतले नोम्स (gnomes), गोगलगाई, सुबक घरं... एक न दोन, चिक्कार प्रकार. हवे ते निवडा आणि सुरेख टेरारियम बनवा.

काही महिन्यांपूर्वीच नेटवर इथे तिथे हुंदडताना असल्या सुंदर सुंदर टेरारीयम्सचे फोटो हाती लागले होते. ते बघून भुरळ पडली होतीच. लेकीला तर फारच. (Terrarium असा सर्च देऊन बघा. कसल्या भारी भारी इमेजेस आहेत.) असं काही करायचंय म्हणून मागे लागली. मग काय? शोधाशोध सुरू.

लेकीच्या १५ मैत्रिणींकरता फिशबोल्स आणले, क्रॉफर्ड मार्केटमधून बरंच शोधून सुरेख लहान लहान (फायबरची) घरं आणि बाहुल्या आणल्या, चायनिज गिफ्टवाल्या दुकानांतून रंगित काचेच्या लांबटगोल गोट्या, चपट्या गोट्या मिळवल्या. रानडेरोडवरच्या कुंभाराच्या दुकानातून अगदी छोटी छोटी मातीची भांडी मिळाली. ती घेतली. अन घरी आणून अ‍ॅक्रिलिक रंगात लेकीनं आणि मी मिळून मस्त रंगवली.

टेरारियममध्ये काही विशिष्ट प्रकारची झाडं लागतात. त्यांची माहिती नेटवर आहे. ती झाडं देण्याचं आणि मुख्य म्हणजे टेरारियम बनवण्याची अ‍ॅक्टिव्हिटी मुलींकडून करवून घेण्याचं महत्त्वाचं काम एका ओळखीतल्या स्त्रीनं आनंदानं अंगावर घेतलं. या माझ्या मैत्रिणीची प्रभादेवीला झाडांची नर्सरी आहे.

दादर कबुतरखान्याजवळच्या विसावा हॉटेलच्या गल्लीत अत्यंत मस्त ज्युटच्या बॅग्ज मिळाल्या. काहींवर आधीच प्रिंटस होते. तीन बॅग्ज प्लेन होत्या. त्यावर पुन्हा आम्ही दोघींनी कुंचला चालवला. प्रत्येकीचा टेरारीयम बबल रॅपमध्ये गुंडाळून या ज्युटच्या बॅग्जमधून दिला. मुलींनीही जपून नेला.

मात्र या सगळ्या मेहनतीचं फळ फारच उत्तम आलं. लेकीच्या मैत्रिणींनी भारी आनंदानं टेरारीयम्स बनवली. (तीच त्यांची रीटर्न गिफ्टही होती). प्रत्येकीचा तिनं बनवलेल्या टेरारियमसोबत फोटो घेतला आणि केक कापणे आणि जेवणखाण इ. होईपर्यंत लगेच जवळच्या दुकानातून A4 साईजच्या जाड कागदावर प्रिंट करून लॅमिनेट करून जाताना प्रत्येकीला दिला.

एकूणात काय आम्ही खुष अन पब्लिक खुष. तुम्हीही या आनंदात सहभागी व्हा ....

फिशबोल्स आणि फिगरीन्स :

मातीची भांडी आणि काचेचे पेबल्स :

रंगवलेली भांडी :

सजवून वेगवेगळे प्रकार ट्रेजमध्ये घालून ठेवले. मुलींनी प्रत्येकातील एक्-एक आणि मग उरलेल्यातले हवे तसे निवडले. मग दोन-दोन, तीन-तीन मडकी टेरारीयममध्ये जाऊन बसली. एकीनं तर दोन दोन घरं देखिल टेरारियममध्ये ठेवली. Happy

या ज्युटच्या बॅग्ज - आधीच प्रिंट असलेल्या :

या आम्ही हात साफ करून घेतलेल्या :

अ‍ॅक्टिव्हिटीची जय्यत तयारी :

तयार टेरारियम्स :

हे लेकीनं केलेलं टेरारियम.

मुख्य विषयापासून दूर जातेय पण तरीही हे हवंच म्हणून - केक आणि खाऊ.

फोटो फक्त स्नॅक्सचेच आहेत - आल्याआल्या खाऊ दिला त्याचे. मुख्य जेवणात रेड पास्ता, व्हाईट पास्ता, डॉमिनोजचा पिझ्झा आणि चटणी सॅंडविचेस होती त्याचे फोटो काढले गेले नाहीत. नवरा, मी आणि खास बोलावलेला फोटोग्राफरही विसरलाच बहुतेक ते फोटो काढायला. Proud

विविध स्वादाची, रंगाची जेली :

जेली, सोया पफ्स, वेफर्स बिस्कीटं, ज्यूस (वाट्यांमधे नंतर पिझा पास्तावर घालण्याकरता पिझा सिझनिंग आणि चिली फ्लेक्स आहेत.) :

केक. आतून रेनबो केक होता. मात्र कापल्यावरचा फोटो नाहीये. :

टेरारियम प्रमाणेच आणखी एक अफलातून प्रकारही या निमित्ताने कळला - ब्रोकन पॉट गार्डनिंग. याकरता broken pot garden असा सर्च देऊन इमेजेस बघा. हा ही प्रकार आता करून बघणार आहे.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

प्राची नेटवर बघ. खाली पेबल्स/चारकोल, मग जाळी, मग कोकोपिट, त्यात झाडं लावून त्यावर माती, त्यावर पुन्हा वाळू अथवा रंगित माती वगैरे टाकता येईल.

dhanyavaad patkan reply dilyaabaddal
कोकोपिट>> sorry ghor adnyaan aahe pan mhanaje kay? net var vachun neet kalale nahi mhanoon ethe vicharale

Happy ohhh k .... mhanaje te naaraL solataanaa paDate , te asel ... bar bar ... :swagat : aata te kuThun miLavaave bare?? Happy

चांगल्या नर्सरीमध्ये मिळेल. यात सहसा शोभेची, इन्डोअर प्लँटस लावतात कारण याला वजनच नसल्याने कुंड्या सहज इकडून तिकडे हलवता येतात. शिवाय हे जास्त पोरसही असतं.

मस्तं आहे, हा प्रकार माहितही नव्हता. धन्यवाद सांगितल्याबद्दल. करुन बघण्याचा मोह होतोय पण चिरंजीव अद्याप लहान आहेत त्यामुळे होत्याचं नव्हतं होण्याचे चान्स जास्त आहेत. Happy

मामी मस्तच. सिम्पली ग्रेट. ..लाराला वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा....
नविन माहीती कळली.

कल्पनाशक्ती, उत्साह आणि पेशन्स - तीनही गोष्टींसाठी दंडवत !! >>>+1 Happy

फारच भारी आहेत सर्व आयडियाज.
त्या ज्युट बॅग्स पण सुंदर आहेत, एखाद्यावर्षी असल्या बॅगा आणुन मुलामुलींना रंगवा अन घरी न्या असे करता येईल .

लाराला अनेक आशीर्वाद

लाराला बिलेटेड हॅप्पी बड्डे.
मामी यू बिलाँग टू अ डिफरंट लीग....
ए असलं काही करायची मी कल्पाना पण नाही करू शकत.

Lara , Many many happy returns of the day. Happy
मामी, क्लास आयडिया आहे. खुपच आवडली. फार सुरेख केलय सगळचं.

सुपर भारी केलंय सगळंच. ते छोटे पॉट्स काय सुरेख एकसारखे रंगवले आहेत. मस्त मस्त. लेकीला उशीराने शुभेच्छा Happy

आपण काही करायला घेतलं की मुलांना डबल उत्साह येतो आणि व्हाइस वर्सा Happy

मामी अगदि मस्त! मुलिला शुभेच्छा!
ति इतकि सुंदर रंगवलेलि मडकि दिसत का नाहियेत कुठे?

धन्यवाद सर्वांना. केलेल्या कष्टाचं चीज झालं इथल्या प्रतिक्रीया वाचून. त्याबद्दल मनापासून आभार. Happy

मेधा, दोन वर्षांपूर्वीच कॅनव्हासच्या बॅग्ज नटवण्याचा सोहळा पार पडलाय. Happy ते 'वर्ल्ड पीस' साईन पार्टी ऑरगाइझरनं आधीच प्रिंट करून बेसिक कलर्स देऊन आणलं होतं. बॅग्जही आत पुठ्ठा घालून व्यवस्थित पॅक करून आणल्या होत्या. त्यावर रंगित चपटे मणी वगैरे लावून मुलामुलींनी आपापल्या बॅग्ज सजवल्या.

प्रिया, लेकीनं या टेरारियममध्ये पॉट नाही ठेवलाय. अजून दोन तीन फिशबोल्स उरले आहेत. त्यात काहीतरी वेगळी रचना करण्याचा विचार आहे तिचा. Happy

लाराला अनेक आशीर्वाद. Happy

मवा +१
एका समरमधे हे टरेरियमचे प्रयोग बरेच 'भोगले' आहेत. Proud
पण मुलं भयंकर एन्जॉय करतात आणि शिकतातही खूप या निमित्ताने. Happy
तुझा उत्साह आणि सगळी जमवाजमव भारी. चार दिवस खेळून विस्मरणात जाणार्‍या खेळण्यांपेक्षा हे असले क्रिएटिव्ह अनुभव चिरकाल समृद्ध करणारे असतात. Happy

काय सुरेख केलंय सगळं मामी!!! कल्पना खूप आवड्ली.
बॅगाही सुरेख आहेत. येत्या वर्षी ती आयडिआ नक्की वापरणार आम्ही Happy

सुकन्येला अनेक आशीर्वाद!!

रंगवलेली छोटी मातीची भांडी, ज्युट बॅग्स, आणि टेरारियम सगळचं भारी!!

खरचं कल्पक आणि उत्साही आहेस तू मामी.

लाराला वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा व आशीर्वाद Happy

मस्तंच!!! मला भयंकर आवडलंय हे प्रोजेक्ट, आता बर्थडे पार्टी थीम्समध्ये अजून एकाची भर पडली. Happy

लेकीला खूप खूप शुभेच्छा Happy

Pages