वाढदिवस साजरा करायचा म्हणजे सोपं थोडीच असतं? दरवेळी काहीतरी नविन क्लृप्ती काढायची. 'हटके' झालं पाहिजे, इतरांपेक्षा वेगळं काहीतरी आणि तरीही इंटरेस्टिंग!!! हम्म्.......
बरीच भवति न भवति होऊन लेकीच्या यंदाच्या अकराव्या वाढदिवसानिमित्तच्या पार्टीकरता थीम ठरली - टेरारियम (Terrarium).
टेरारियम म्हणजे अॅक्वेरीयम सारखीच बंद जागेत झाडं लावण्याची कला. Terra म्हणजे जमीन. तर बंद काचेच्या पारदर्शक भांड्यांतून छोटी छोटी, ज्यांना फार ऊनाची गरज नाही अशी इन्डोअर प्लँटस लावण्याची, ती जोपासण्याची कला. नुसतीच झाडं न लावता काही लहान, रंगित वस्तु वापरून त्यातून एक सुरेख लँड्स्केपही बनवता येतं. या भांड्यांवर काचेची झाकणं ठेवली तर आठवड्यातून केवळ एकदा पाणी देऊन पुरेसं होतं. कारण आतलं पाणी आतच राहिल्यानं रिसायकल होत राहतं.
या करता अत्यंत सुरेख सुरेख सिरॅमिक फिगरीन्स चीनमध्ये बनतात आणि अमेरीका, युरोपमध्ये मिळतात. आपल्याकडे सहज उपलब्ध होत नाहीत. पण या फिगरीन्स कसल्या मस्त असतात म्हणून सांगू! छोट्या रंगित मशरूम्स, फुलपाखरं, परीकथेतले नोम्स (gnomes), गोगलगाई, सुबक घरं... एक न दोन, चिक्कार प्रकार. हवे ते निवडा आणि सुरेख टेरारियम बनवा.
काही महिन्यांपूर्वीच नेटवर इथे तिथे हुंदडताना असल्या सुंदर सुंदर टेरारीयम्सचे फोटो हाती लागले होते. ते बघून भुरळ पडली होतीच. लेकीला तर फारच. (Terrarium असा सर्च देऊन बघा. कसल्या भारी भारी इमेजेस आहेत.) असं काही करायचंय म्हणून मागे लागली. मग काय? शोधाशोध सुरू.
लेकीच्या १५ मैत्रिणींकरता फिशबोल्स आणले, क्रॉफर्ड मार्केटमधून बरंच शोधून सुरेख लहान लहान (फायबरची) घरं आणि बाहुल्या आणल्या, चायनिज गिफ्टवाल्या दुकानांतून रंगित काचेच्या लांबटगोल गोट्या, चपट्या गोट्या मिळवल्या. रानडेरोडवरच्या कुंभाराच्या दुकानातून अगदी छोटी छोटी मातीची भांडी मिळाली. ती घेतली. अन घरी आणून अॅक्रिलिक रंगात लेकीनं आणि मी मिळून मस्त रंगवली.
टेरारियममध्ये काही विशिष्ट प्रकारची झाडं लागतात. त्यांची माहिती नेटवर आहे. ती झाडं देण्याचं आणि मुख्य म्हणजे टेरारियम बनवण्याची अॅक्टिव्हिटी मुलींकडून करवून घेण्याचं महत्त्वाचं काम एका ओळखीतल्या स्त्रीनं आनंदानं अंगावर घेतलं. या माझ्या मैत्रिणीची प्रभादेवीला झाडांची नर्सरी आहे.
दादर कबुतरखान्याजवळच्या विसावा हॉटेलच्या गल्लीत अत्यंत मस्त ज्युटच्या बॅग्ज मिळाल्या. काहींवर आधीच प्रिंटस होते. तीन बॅग्ज प्लेन होत्या. त्यावर पुन्हा आम्ही दोघींनी कुंचला चालवला. प्रत्येकीचा टेरारीयम बबल रॅपमध्ये गुंडाळून या ज्युटच्या बॅग्जमधून दिला. मुलींनीही जपून नेला.
मात्र या सगळ्या मेहनतीचं फळ फारच उत्तम आलं. लेकीच्या मैत्रिणींनी भारी आनंदानं टेरारीयम्स बनवली. (तीच त्यांची रीटर्न गिफ्टही होती). प्रत्येकीचा तिनं बनवलेल्या टेरारियमसोबत फोटो घेतला आणि केक कापणे आणि जेवणखाण इ. होईपर्यंत लगेच जवळच्या दुकानातून A4 साईजच्या जाड कागदावर प्रिंट करून लॅमिनेट करून जाताना प्रत्येकीला दिला.
एकूणात काय आम्ही खुष अन पब्लिक खुष. तुम्हीही या आनंदात सहभागी व्हा ....
फिशबोल्स आणि फिगरीन्स :
मातीची भांडी आणि काचेचे पेबल्स :
रंगवलेली भांडी :
सजवून वेगवेगळे प्रकार ट्रेजमध्ये घालून ठेवले. मुलींनी प्रत्येकातील एक्-एक आणि मग उरलेल्यातले हवे तसे निवडले. मग दोन-दोन, तीन-तीन मडकी टेरारीयममध्ये जाऊन बसली. एकीनं तर दोन दोन घरं देखिल टेरारियममध्ये ठेवली.
या ज्युटच्या बॅग्ज - आधीच प्रिंट असलेल्या :
या आम्ही हात साफ करून घेतलेल्या :
अॅक्टिव्हिटीची जय्यत तयारी :
तयार टेरारियम्स :
हे लेकीनं केलेलं टेरारियम.
मुख्य विषयापासून दूर जातेय पण तरीही हे हवंच म्हणून - केक आणि खाऊ.
फोटो फक्त स्नॅक्सचेच आहेत - आल्याआल्या खाऊ दिला त्याचे. मुख्य जेवणात रेड पास्ता, व्हाईट पास्ता, डॉमिनोजचा पिझ्झा आणि चटणी सॅंडविचेस होती त्याचे फोटो काढले गेले नाहीत. नवरा, मी आणि खास बोलावलेला फोटोग्राफरही विसरलाच बहुतेक ते फोटो काढायला.
विविध स्वादाची, रंगाची जेली :
जेली, सोया पफ्स, वेफर्स बिस्कीटं, ज्यूस (वाट्यांमधे नंतर पिझा पास्तावर घालण्याकरता पिझा सिझनिंग आणि चिली फ्लेक्स आहेत.) :
केक. आतून रेनबो केक होता. मात्र कापल्यावरचा फोटो नाहीये. :
टेरारियम प्रमाणेच आणखी एक अफलातून प्रकारही या निमित्ताने कळला - ब्रोकन पॉट गार्डनिंग. याकरता broken pot garden असा सर्च देऊन इमेजेस बघा. हा ही प्रकार आता करून बघणार आहे.
अरे वा! मस्तच कल्पना आहे
अरे वा! मस्तच कल्पना आहे
टेरारियम पण मस्त दिसताहेत.
मी मागे एकदा टेरारियम करायचा प्रयत्न केला होता. पण तो फसला. काही आठवड्यात रोपं सुकली. बहुतेक रोपं चुकीची निवडली होती. मामी कुठली रोपं / मॉस वगैरे वापरलं ते लिहशील का? म्हणजे पुन्हा प्रयत्न करुन पाहीन.
मवा, तुझी आयडीया पण चांगली आहे. बघते करुन.
पुनः एकदा प्रतिसादकर्त्यांना
पुनः एकदा प्रतिसादकर्त्यांना धन्यवाद.
>>>>>> आमच्याकडे मागच्या वर्षी लेक एक दिवस शाळेतून नाचत नाचत घरी आली व 'मी टरेरियम बनवणार' असं डिक्लेअर केलं तेव्हा मी पहिल्यांदा तो शब्द ऐकला. त्यांच्या शाळेत त्यांनी गॄप ने बनवलं होतं व तिला घरी तसंच बनवायचं होतं. अर्थात ते असं आर्टिस्टीक वगैरे नसून नॅचरल हॅबिटॅट्स शिकण्याच्या उद्देशाने होतं. घरी तिने माझ्याकडून लागेल ते साहित्य घेऊन स्वतः सगळं बनवलं होतं. त्यात बिया पेरुन अळ्या, किडे, गोगलगायी अश्या गोष्टी त्यात टाकल्या, माझी ४ वर्षांची धाकटी देखील अतीव उत्साहाने रोली-पोलीज, गांडूळं शोधून हातात पकडून आणायची तेव्हा. सर पे भूत संवार टाईप होतं त्यावेळी त्याचं. खोक्याच्या झाकणाला छिद्रं केली होती हवा यायला, पाणी टाकणे, कोण कोणाला खातं ते बघणे, झाडांची वाढ बघणे असे सर्व केले होते. अख्खे घर टरेरियम मय झाले होते १५-२० दिवस !
ज्यांना ७-८ वर्षांची मुलं आहेत त्यांनी घरी हे हॅबिटॅट स्टडी वालं टरेरियम करुन बघायला हरकत नाही, मुलं प्रचंड एंजॉय करतात व सगळी साखळी शिकतातही अगदी भरपूर ! आम्ही घरच्याच साहित्यातऊन बनवलं होतं पण कोणाला इंटरेस्ट असेल तर 'terrarium habitat kit' असं सर्च करा, इमेजेस पण बघू शकता अंदाज यायला.
>>>> मवा, तुला जरा सविस्तर उत्तर लिहायचं मनात होतं त्यामुळे ते उशीरा देतेय.
साधारण चौथी-पाचवीच्या वर्गातच शाळेत जलचक्र, फुड चेन्स, विविध हॅबिटाटस, फोटोसिंथेसिस, झाडांची अंतर्गत रचना वगैरे विषय अभ्यासात असतात. त्यामुळे या प्रकारच्या प्रोजेक्टमध्ये मुलं खूप छान रमतात. तुझ्या मुलींनीही अगदी मस्त एंजॉय केलं असणार यात शंका नाही. आता खोक्याऐवजी काचेच्या बोल्स मध्ये, जारमध्ये करायला दे. आणखी आवडेल त्यांना.
इथेही मुलींनी उत्साहानं मातीत हात माखवले. मध्येच कोणाच्यातरी हाती गांडुळही आलं. ईSSSSSS शीSSSSSSS चे उद्गारही निघाले. सैन्याची थोडीफार दाणादाणही उडाली. पण गांडुळाचं शेतीतील महत्त्व या विषयावर त्यानिमित्तानं पोरींचं बौद्धिक घेतलं मी. अगदी मनापासून ऐकलं आणि प्रत्यक्ष अनुभव आल्याने आता पुन्हा गांडुळ दिसलं तर त्याच्याकडे नक्कीच वेगळ्या नजरेनं बघितलं जाईल.
गंमत म्हणजे इतके मोठे काचेचे बोल्स पोरी भारी जपून हाताळत होत्या. काही प्रसंग आलाच तर असावेत म्हणून थोडे जास्तीचे आणून ठेवले होते. ते तसेच आहेत. नंतर त्यांच्या आयांनीही आवर्जून ही अॅक्टिव्हिटी आवडल्याचं सांगितलं.
मामी !! दंडवत
मामी !! दंडवत
मामी, इतक्या मुलींना हातात
मामी,
इतक्या मुलींना हातात रंगावाय्चे ब्रश / मातीत खेळायला मिळाल्यानंतर घर कसे साफ करतेस ते पण सांग. इथे सध्या एकाच मुलीच्या ( माझ्याच) हातात या वस्तु मिळाल्या की चुकून इथेच रंग लागला, तिथेच मातीचा हात लागला असे होते.
@ सावली टेरारियममध्ये सहसा
@ सावली
टेरारियममध्ये सहसा एकाच प्रकारच्या सवयी असलेली झाडं एकत्र लावावीत. उदा. फक्त सक्युलंटस किंवा फक्त फर्न्स. सक्युलंटसना कमी पाणी पुरतं तर फर्नसारख्या झाडांना जास्त मॉयश्चर लागतं. सक्युलंटस लावलेली टेरारियम्स उघडी ठेवली तरी चालतात. फर्न्स असतील तर वरून काचेची प्लेट (पारदर्शक असेल तर उत्तम) ठेवली तर आतलं पाणी आतच राहील.
टेरारियम अधून मधून आतून पुसून घ्यावे. पानं गळली तर ती उचलावीत कारण कीड वगैरे लागण्याची शक्यता असते. स्वच्छ टेरारियम मस्तच दिसतं.
टेरारियममध्ये लावता येणारी झाडं म्हणजे - सक्युलंटस , फर्न्स (नेचे), मंकी ग्रास, स्पायडर ग्रास, मिनिएचर कोलीयस, फिटोनिया, सिंगोनियम वगैरे.
नेटवरच्या टेरारियम इमेजेस बघून चिक्कार आयडियाज मिळतील.
सावली, एकदम प्रॅक्टिकल प्रश्न
सावली, एकदम प्रॅक्टिकल प्रश्न विचारलास. बहुतेक तुझ्या लेकीच्या पुढच्या वाढदिवसाला घडणार हा प्रोजेक्ट!
ब्रशनं रंगवण्याची अॅक्टिव्हिटी नव्हती. मडकी आम्हीच आधी रंगवून ठेवली होती.
ही अॅक्टिव्हिटी एका वेगळ्या खोलीतच मांडली होती. त्यामुळे माती वगैरे पसरली ती चालून गेली. ११-१२ वर्षांच्या मुली बर्यापैकी समजुतदार असतात. त्यामुळे भिंती वगैरे खराब झाल्या नाहीत. शिवाय यात माती ओली नसते. बोल्समध्ये माती/कोकोपिट भरल्यावर मग पाणी घालायचं असतं.
बाकी, मुलगी ५ वर्षांची होईपर्यंत घरभर सर्व भिंती पेन्सिल, पेनं, क्रेयॉन्सनी चिक्कार चितारून सोडलेल्या. टिव्हीसुद्धा त्यातून सुटला नव्हता. करू दिलं. हे बघ :
मामी ,,खुप मस्त आणी
मामी ,,खुप मस्त आणी ईनोव्हेटिव..
लेकीला हॅपी बड्डे..
थँक्यु मामी. ओके आता पुन्हा
थँक्यु मामी.
ओके आता पुन्हा टेरारियम प्रयोग करुन पहाते.
सहा , सात वर्षाच्या मुली तितक्या समजुतदार नसतात
क्लास !!! लाराला हॅपी बड्डे
क्लास !!!
लाराला हॅपी बड्डे !!
wow!!! Sahhi! Happy b 'day
wow!!! Sahhi!
Happy b 'day Lara
बेस्ट आहे ...दिवाळी गिफ्ट
बेस्ट आहे ...दिवाळी गिफ्ट म्ह्णून ट्राय करावे असा विचार आहे ...पहाते ....
मामी --- मनीप्लान्ट चालेल का टेरारियम मधे ???
Chalel ki.
Chalel ki.
मामी --धन्यवाद ....आजच
मामी --धन्यवाद ....आजच सुरुवात करते ....
मामी धन्यवाद .... आत ह्या
मामी धन्यवाद .... आत ह्या वीकेंड ला मुहुर्त लागला.... वरचे सग्ळे फोटो बघुन मला असे छोट्या बाहुल्या वगैरे ठेवाय्चे डोळ्यासमोर होते... पण झाडे लावुन झाल्यावर "तुझी छोटी छोटी खेळणी आण " असे सांगितल्यावर चिरंजीव सिंह, डायनॅसोर घेउन आले ... मग काय अपील नसतेच कारण ती त्याची अॅक्टीवीटी होती.... आता आमचे जंगल वाटते आहे
(No subject)
अगं मस्तच दिसतंय. एकदम
अगं मस्तच दिसतंय. एकदम ज्युरेसिक पार्क वाटतंय.
आणि आतला सीन हवा तेव्हा बदलता येईल तुला. काही दिवसांनी दुसरी खेळणी ठेव.
मजा वाटली मला खरं.... मुली
मजा वाटली मला खरं.... मुली आणी मुलं ह्यामध्ये नॅचरली च काही गोष्टी वेगळ्या असतात नाही
धन्य आहात तुम्ही मामी आणि
धन्य आहात तुम्ही मामी आणि लेकही... काय अप्रतिम केलंय हे...
काय सुंदर प्रकार आहे हा टेरारियम.. भन्नाटच!! <<<<< खरोखर सुपरलाईक.
सुपर्ब!!! मामी _/\_ तु आणि
सुपर्ब!!!
मामी _/\_ तु आणि लेक दोघीही महा उत्साही आहात....वाढदिवसाच्या पार्टीसाठी फारच युनिक आयडिया... बोलेतो एकदम फंटाश्टिक!!
प्राची तुमचे ही ज्युरासिक पार्क भारी दिसतय
मी आधी कसं बघितलं नव्हत हे ??/
धन्यवाद लाजो ...तरी फायनल
धन्यवाद लाजो ...तरी फायनल प्रॉड्क्ट चा फोटो नाही आहे , २ डायनॅसोर , हत्ती, सिंह असे सग्ळे सुखाने नांदत आहेत .... पण तुम्ही म्हणालात तसेच मला वाटले... फार वाइट नाही दिसत आहे आणि मुख्य म्हणजे मुलगा खुश आहे
वॉव मस्त बड्डॅ
वॉव मस्त बड्डॅ प्रोजेक्ट!
हे कसं काय नाही वाचलं गेलं आधी?
बेष्ट्च!
मामी, कसली हुशार आणि उत्साही
मामी, कसली हुशार आणि उत्साही आहे तुझी लेक
यू मस्ट बी प्राऊड ऑफ हर
आणि तिची आईही इतकीच ग्रेट आहे
शी मस्ट बी प्राऊड ऑफ यू
लाजोतै
बघितलं होतस की आधी
प्रतिसाद पण दिलेलास :अओ::फिदी:
हे माझं टेरारिअम! हा साईड
हे माझं टेरारिअम!
हा साईड व्ह्यू!
अरे वा! मस्त दिसतंय. साईडनं
अरे वा! मस्त दिसतंय. साईडनं पण फोटो घेऊन इथे टाक गं.
छान दिसतंय गं रायगड.
छान दिसतंय गं रायगड.
कोठल्याही कार्यक्रमाची खरी
कोठल्याही कार्यक्रमाची खरी मजा तेव्हांच येते जेव्हां आपण पाहुण्यांनादेखील त्यात सहभागी करून घेतो. तुम्ही ते फारच सुंदर पद्धतीनी केलं आहे.
तुम्हा दोघींचं अभिनंदन आणि नवनवीन कल्पनांना शुभेच्छा !
मामी, कसली गोड दिसताय्त ती
मामी, कसली गोड दिसताय्त ती पिंटू झाडं!!
लाराला थंब्स अप
किती भारी दिसतयं
किती भारी दिसतयं
Pages