निसर्गाच्या गप्पा (भाग १७)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 20 February, 2014 - 01:57

निसर्गाच्या गप्पांच्या १७ व्या भागा बद्दल सर्व निसर्ग प्रेमींचे हार्दिक अभिनंदन.

वरील कोलाज वर्षू नील यांच्या सौजन्याने

सध्या अनुकूल अशा वातावरणामुळे सगळीकडे रंगीबिरंगी टवटवीत फुले डुलताना दिसत आहेत. फुला,झाडांच्या प्रदर्शनांचेही सध्या हंगाम चालू आहे. निरनिराळी फुले, फळे, रोपे, बी-बियाणे आपले खास आकर्षण घेऊन ह्या प्रदर्शनांमध्ये आपले गुण, वेगळेपण दर्शविण्याच्या प्रयत्नात आहेत. आपल्या निसर्ग प्रेमींपैकी काही निसर्ग प्रेमी ह्या प्रदर्शनांना भेटीही देऊन आले आहेत. राहीलेल्या ज्यांना कोणाला शक्य असेल त्यांनी अशा प्रदर्शनांना भेट देऊन ह्या निसर्ग घटकांच्या सौंदर्याचा, महतीचा लाभ घ्या. तसेच बी-बियाणे, रोपे आणून आपल्या परीसरातही त्यांना सामावून घ्या. व त्यांचे फोटो काढून नि.ग. च्या धाग्यावर सगळ्यांच्या लाभार्थी अवश्य द्या.

स्थापना - ५ डिसेंबर २०१०

निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू नील ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी ६२) मधू-मकरंद ६३) सुर्यकिरण ६४) पिशी अबोली ६५) सुमंगल ६६) गमभन ६७) दक्षिणा ६८) आर्या ६९) येळेकर ७०) प्राची ७१) हेमा वेलणकर ७२) अन्जू ७३) झरबेरा ७४) चंद्रा ७५) Sayali Paturkar

मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाच्या गप्पा (भाग ७) http://www.maayboli.com/node/34014
निसर्गाच्या गप्पा (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
निसर्गाच्या गप्पा (भाग९) http://www.maayboli.com/node/35557
निसर्गाच्या गप्पा (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
निसर्गाच्या गप्पा (भाग ११) http://www.maayboli.com/node/38565
निसर्गाच्या गप्पा (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
निसर्गाच्या गप्पा (भाग १३) http://www.maayboli.com/node/41996
निसर्गाच्या गप्पा (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
निसर्गाच्या गप्पा (भाग १५) http://www.maayboli.com/node/43773
निसर्गाच्या गप्पा (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755

निसर्गाशी निगडीत काही पुस्तकांची यादी १५ व्या धाग्यापर्यंत पाहता येईल.

मुंबईच्या राणीच्या बागेतील झाडांची यादी - http://www.saveranibagh.org/BW_listOfTrees.php

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

१७ वा पण आला.

मी लावलेली पालक आणि मेथी कबुतर आणि चिमण्या नि खावुन स॑पवलि आम्हाला मिळालीच नाही

माझ्या एका मैत्रिणीने तिच्या पुण्याच्या घरी कुंडीत भाज्या पिकवल्या आहेत. पालक, मिर्ची, बीट, वांगं, बटाटा आ़णि अजून बरंच काही आहे. सगळं गांडूळ खत वापरुन केलंय. ४ जणांच्या कुटुंबाला भाजी पुरतेय.

अरे वा भाग १७ !! मस्तच.
कुंडीत भाज्या लावायचा विचार आहे. झाडे लावणे आणि सांभाळाने याबाबतित मी ढ आहे. मला योग्य सल्ले द्याल का?

नुकतेच ऋतुराज वसंताचं आगमन झालेलं आहे आणि सगळीकडे आता त्याचं विलोभनीय साम्राज्य झळकू लागेल .....

a1.JPG

सर्वांचे हार्दिक अभिनंदन आणि अनेकानेक शुभेच्छा .....

इन्ना, माझी ती मैत्रिण ठाणे-पुणे करत असते. तिला सविस्तर विचारते आणि तुला कळवते. तिलाच डायरेक्ट विचार हवं तर. तिने आमच्या संस्थेच्या 'ग्रामिण-विकास' प्रोजेक्टच्या अंतर्गत 'सेंद्रिय शेती' अभ्यासक्रमात 'परस बाग' हा विषय अभ्यास केला आहे.

ती पण आर्किटेक्टच आहे Wink

सेंद्रिय खत कसे कराय्चे? ईथे खूपच महाग आहे .... मी एका कुंडीमध्ये ओला कचरा मातीबरोबर मिक्स करून ठेवला आहे .... २-३ वीक्ने ती माती बाकि कुंड्यामध्ये घालते ... उपयोग झाला का ते कळत नाही Uhoh

अरे वरची फोटो आणि माहीती सगळेच मस्त.

बाळगाजरे क्युट आहेत प्राची.

माझ्या वरच्या लिखाणात काही चुका किंवा सजेशन असेल तर नक्की सांगा.

प्राची ते फूल झाडावरच राहू देत. कालांतराने बिया धरतील, सुकेल. त्यात आपोआल कलौंजी तयार होईल.

सध्या आपल्याकडे हायब्रीड भाजीपाल्यांची बियाणे मिळतेय. त्यांची उगवण क्षमताही चांगली असते. उन पाण्याचे तंत्र संभाळले कि झाले. अगदी छोटी जागा असेल तर पालेभाज्या लावणे योग्य. त्यातल्या "उत्पादना"चे प्रमाण जास्त असते.

जागा आहे तशी भरपूर ... पण हवा आणी माती सुपिक नाही ...
ते फूल मग काढत नाही ... वाट बघते :)... मेथी आणी कोथिंबीर छान आली होती ... एका आठवड्याला पुरणारी कोथिंबीर आली आणी एक पेंडी मेथी Happy ... आता पालक लावला आहे अजुन १ इन्च रोप आहेत

शशांक,
मागे मी फक्त पाण्यात वाढवलेल्या झाडांबद्दल एक फिल्म बघितली होती. मातीचा वापर नाहीत. काचेतल्या भांड्यात आधाराने झाड उभे करायचे. झाडाला आवश्यक ती सर्व द्रव्ये त्या पाण्यातूनच द्यायची. खुप भाज्या अश्या वाढवल्या होत्या. कदाचित ती इस्रायल मधली शेती असणार. ते पाणी बहुतेक वाहते ठेवले होते.

पुण्यात नाही पण कदाचित पाचगणी, महाबळेश्वरला ट्यूलिप लागवड यशस्वी होऊ शकेल. तसे प्रयत्नही झाले असतील.

मागच्या भागातल्या वांग्याच्या झाडावरच्या वांग्याचा रंग मस्त आहे, मधु.
वांग्याचे झाडही सहज वाढवता येते.

शोभे, हे झाड कुठे दिसले ? करीर चे झाड हे. खास नगर भागाची खासियत आहे. याच दिवसात असे फुलते. याला नंतर फळे लागतात ती खाद्य असतात. त्याचे लोणचेही घालतात.

दिनेशदा, हे आम्हाला गोंदवल्याला दिसले. डिसेंबरमध्ये छान फ़ुले आली होती पण नाव माहित नव्हते. धन्यवाद! Happy आता फ़ळे येऊन गेली असतील ना? Uhoh

शोभा , मस्त आहे फोटो, करीर.. इंग्लिश / हिन्दी नांव आहे का माहीत याचे?? बोटेनिकल नाही..

मधूच्या फोटोत वांगं आहे ...ओह... मला काकडी वाटली Blush

प्राची , छान गुटगुटीत आहेत बाळ गाजरं..

tumhi size kashi reduce karata. maza mukhya prashna toch aahe. nahitar anek anek uttam uttam photoes ahet mazyakade. pan khari adachan size kami karanyachi. aani tyasathi kashta ghenyachya weLechi aahe!!!!

बी, फ़ोटो Microsoft Office Picture Manager मध्ये उघडा. तिथे एडीट पिक्चर आहे. तिथे एडीट करता येईल. तुम्ही जर पिकासा वर फ़ोटो अपलोड केलेत तर तिकड्ची फ़क्त लिंक इथे देता येईल. मला येवढेच माहित आहे. अजून माहिती तज्ञ लोक सांगतीलच
Happy

राणी च्या बागेत फुललेली... सोनसावर??????????

साधना कडील तिन्ही पिढ्या अतिशय उत्साहाने , न दमता बागेतले प्रत्येक झाड,फूल निरखत होत्या...
प्रचंड कौतुक वाटलं त्यांचं ,, जिप्सी, साधना आणी उजू मुळे माझ्या सा ज्ञा मधे बरीच भर पडली...

हसतमुख , प्रसन्न व्यक्ती आणी फुलांच्या सहवासात पुन्हा दिवस घालवायला तयार आहे Happy

बी फोटो पिकासावरुन टाक. इथे मायबोलीवर अपलोड करुन टाकायला जाशील तर साई़ज कमी करुन करून आपल्या मेंदूची साईज कमी व्हायला लागते.... तरीही तुला माबोवरुनच टाकायचे असेल तर शोभाने सांगितले ते कर. एडित मध्ये जाऊन वेब वर्शन सेव करायचे.

मधु, तत्परतेने माहिती दिल्याबद्दल आभार गं तुझे. आता लगेच मेल सेंडतेच तुझ्या ग्रीनथंबवाल्या माळीबुवांना. Happy

वर्षू, याला मराठीत नेपती म्हणतात. माझाही एक लेख होता.. तो आता गायब झालाय वाटतं.
थेट ज्ञानकोषातलाच संदर्भ देतोय.

http://www.marathivishwakosh.in/khandas/khand8/index.php?option=com_cont...

नेपती : (नेवती; हिं. करेर, कारी; गु. केरडी; क. निबटी, शिप्रिगिड; सं. करीर, गूढपत्रा; लॅ. कॅपॅरिस एफायला, कॅ. डेसिड्युआ; कुल-कॅपॅरिडेसी). हे क्षुप (झुडूप) सिंध, अरबस्तान, उ. आफ्रिकेतील उष्ण भाग, भारत इत्यादींतील रुक्ष प्रदेशांत (उदा., पंजाब, राजस्थान इ.) सर्वत्र आढळते. तो लहान वृक्षही असतो. जून फांद्यांवर पाने नसतात. कोवळेपणी लहान, बिनदेठाची, साधी पाने असतात; ती लवकर गळतात. उपपर्णी काटे सरळ, लांब, तीक्ष्ण व नारिंगी असतात. अनेक लाल व लहान फुलांचे गुलुच्छासारखे (झुबक्यासारखे) [→ पुष्पबंध] फुलोरे जून खोडावर किंवा बाजूच्या लहान फांद्यांवर नोव्हेंबर ते मार्चमध्ये येतात. संदले व प्रदले प्रत्येकी चार, सुटी व विषम आकारांची; प्रदले शेंदरी; केसरदले अनेक (सु. १५), लालसर; किंजपुट १.५ सेंमी. किंजधरावर (केसरदलातून वर आलेल्या दांड्यावर)असतो [→फूल]. फळ गोलसर, लाल, करवंदाएवढे, मांसल व बिया अनेक. इतर सामान्य लक्षणे ⇨ कॅपॅरिडेसी कुलात (वरुण कुलात) वर्णिल्याप्रमाणे असतात. याचे लाकूड पिवळट तपकिरी, मध्यम प्रतीचे, जड व कठीण आणि वाळवीपासून सुरक्षित असते. अनेक सामान्य वस्तूंकरिता, शेतीची अवजारे, घाणे, गाड्या,हत्यारांचे दांडे, खांब व जळणास उपयुक्त असते. कळ्यांचे आणि फळांचे लोणचे करतात. फळे उकडून भाजी करतात; फळे ताकात मीठ घालून तीन दिवस भिजवून नंतर वाळवून भाजी करतात. खोडाची साल तिखट, सारक, कृमिघ्न (कृमिनाशक), स्वेदक (घाम आणणारी) व कफनाशक (कफ काढून टाकणारी) आणि दमा व दाह यांवर उपयुक्त असते. फळ स्तंभक (आकुंचन करणारे) असून पित्तविकार व हृदयविकार यांवर उपयुक्त असते. मूळ कडू, ज्वरनाशक व संधिवातावर गुणकारी असते. कोवळ्या फांद्यांचा आणि पानांचा लगदा गळवे व सूज यांवर बांधतात आणि तो चघळल्यास दातदुखी थांबते. मुळे व त्यांवरची साल तिखट व कडू असून संधिवात आणि पाळीच्या तापावर देतात. वैदिक वाङ्‌मयात करीराचा उल्लेख असून यज्ञात आहुती देण्यास फळे वापरीत असत.

Pages