निसर्गाच्या गप्पा (भाग १७)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 20 February, 2014 - 01:57

निसर्गाच्या गप्पांच्या १७ व्या भागा बद्दल सर्व निसर्ग प्रेमींचे हार्दिक अभिनंदन.

वरील कोलाज वर्षू नील यांच्या सौजन्याने

सध्या अनुकूल अशा वातावरणामुळे सगळीकडे रंगीबिरंगी टवटवीत फुले डुलताना दिसत आहेत. फुला,झाडांच्या प्रदर्शनांचेही सध्या हंगाम चालू आहे. निरनिराळी फुले, फळे, रोपे, बी-बियाणे आपले खास आकर्षण घेऊन ह्या प्रदर्शनांमध्ये आपले गुण, वेगळेपण दर्शविण्याच्या प्रयत्नात आहेत. आपल्या निसर्ग प्रेमींपैकी काही निसर्ग प्रेमी ह्या प्रदर्शनांना भेटीही देऊन आले आहेत. राहीलेल्या ज्यांना कोणाला शक्य असेल त्यांनी अशा प्रदर्शनांना भेट देऊन ह्या निसर्ग घटकांच्या सौंदर्याचा, महतीचा लाभ घ्या. तसेच बी-बियाणे, रोपे आणून आपल्या परीसरातही त्यांना सामावून घ्या. व त्यांचे फोटो काढून नि.ग. च्या धाग्यावर सगळ्यांच्या लाभार्थी अवश्य द्या.

स्थापना - ५ डिसेंबर २०१०

निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू नील ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी ६२) मधू-मकरंद ६३) सुर्यकिरण ६४) पिशी अबोली ६५) सुमंगल ६६) गमभन ६७) दक्षिणा ६८) आर्या ६९) येळेकर ७०) प्राची ७१) हेमा वेलणकर ७२) अन्जू ७३) झरबेरा ७४) चंद्रा ७५) Sayali Paturkar

मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाच्या गप्पा (भाग ७) http://www.maayboli.com/node/34014
निसर्गाच्या गप्पा (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
निसर्गाच्या गप्पा (भाग९) http://www.maayboli.com/node/35557
निसर्गाच्या गप्पा (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
निसर्गाच्या गप्पा (भाग ११) http://www.maayboli.com/node/38565
निसर्गाच्या गप्पा (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
निसर्गाच्या गप्पा (भाग १३) http://www.maayboli.com/node/41996
निसर्गाच्या गप्पा (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
निसर्गाच्या गप्पा (भाग १५) http://www.maayboli.com/node/43773
निसर्गाच्या गप्पा (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755

निसर्गाशी निगडीत काही पुस्तकांची यादी १५ व्या धाग्यापर्यंत पाहता येईल.

मुंबईच्या राणीच्या बागेतील झाडांची यादी - http://www.saveranibagh.org/BW_listOfTrees.php

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सगळ्यांचे फोटो अगदी अफाट आहेत. मस्तच.

वर्षूताई त्या अर्धवट मिटलेल्या फुलांना आम्ही गाजरा म्हणतो. ही फुले पावसाळ्यात म्हणजे गौरी-गणपतींच्या दिवसांत जास्त येतात. ही सिंगलची दिसत आहेत. ह्यात डबलची पण असतात भरगच्च. रंगही वेगवेगळे आणि जरा हटकेच असतात.

साधना ती मुंग्यालागलेली वेल आहे ना त्याच्यावरची फुले आम्ही शाळेतून जाताना रस्त्यातून काढायचो. त्याचा गजरा करायचा तो किडीच्या आकाराप्रमाणे होतो. मी बरेच दिवस ती फुले शोधतेय पण जास्त प्रमाणात दिसत नाहीत. आता माझ्या घरीच उगवलेय. फुले पावसाळ्यात येतात जास्त. ती आली की मी किडीचा गजरा करणार. आम्ही त्याला किडीचीच फुले म्हणायचो. रंगही फुलांचा हिरवाच किडीसारखा असतो. Happy

शांकली माझे कसले अभिनंदन. आपण सगळ्यांचे म्हण. Happy आणि आता आमच्या ज्ञानात तुझ्याकडच्या ज्ञानाची जास्त भर पाडायला नियमीत येत जा. Happy

साधना, पिंपळाच्या पानांसारखा दिसणारा वृक्ष क्लाईनहॉव्हिया हॉस्पिटा असणार Kleinhovia hospita आणि दुसरं वडासारखं पण वड नाही असं झाड Ficus drupacea असावं, तू गुगलून बघ.
गौरी, ही बटरफ्लाय फुलं खूपच सुंदर दिसतात. व्हर्बिनॅसी फॅमिली मधली ही फुलं असून ह्या फॅमिलीतली बहुतेक सगळी फुलं अशीच असतात. उदा. आपली घाणेरी किंवा टणटणी!
वर्षा, मराठी नावं बर्‍याचदा वेगवेगळी असू शकतात. पण बोटॅनिकल नावाने सर्च केलं तर मात्र त्याच फुलांची किंवा वनस्पतींची आपल्याला माहिती मिळू शकते. Happy

हा आहे आफ्रिकन ट्युलिप चा वृक्ष !! एकाच वेळी हिरवीगार पानं आणि शेंदरी रंगाच्या फुलांचा साज अंगावर मिरवणारा !! फुलण्यासाठी याला पानगळीला सामोरं नाही जावं लागतं. हा फोटो आहे केरळ ला काढलेला पण परवा ठाण्याला गावदेवी मैदाना जवळ अचानक हा फुललेला दिसला आणि खूप दिवसानी जूना जिवलग भेटल्यावर होतो तसा आनंद झाला.
From mayboli

अरे वा, नवे भिडू मस्त खेळताहेत.
ते ओले पिस्ते नक्कीच नाहीत. ओले पिस्ते तूर्‍यानी येतात आणि त्याचे फळ वगैरे नसते. आपण पिस्ता खातो त्यावर एक जांभळट लालसर साल असते. ती सहज सोलता येते. पण ती खाण्याजोगी नसते.
मुंबईत ओले बदाम मिळतात पण ओले पिस्ते नाहीत. मी मात्र भाग्यवान. खास इराणी ओले पिस्ते खाल्ले आहेत मी.

सीतेवर रामायणात जितका अन्याय झाला तेवढाच मान तिला लोकसाहित्यात आहे.
सीतेच्या नावानेच अनेक फुले ओळखली जातात ( सीतेची वेणी, तिची आसवं, तिचा अशोक, तिचे रंजन, तिचे फळ.. ) जनमानसात तिचे स्थान रामाच्याची वरचढ आहे. ( ललिता पंचमी हा सण पण तिचाच.)

गौरीने मागच्या पानावर जांभळ्या फुलांचा फोटो टाकलाय त्यात पक्ष्याचा आकार दिसला का ? का मी बालितल्या पक्ष्य्तांचे फोटो एडीट करत बसलोय म्हणुन मला भास होतोय ?

रामायणातले युद्ध संपल्यावर राम आणि हनुमान आराम करत होते. त्यावेळी दशमुखी रावणाचा सिनियर ( भाऊ किंवा वडील ) शतमुखी रावण हल्ला करायला येत आहे अशी बातमी आली. त्याचा वध करायचे सामर्थ्य केवळ सीतेमधेच आहे हे रामाला माहीत होते. त्याने हनुमानाला तिला घेऊन यायला सांगितले. त्यावेळी ती निद्रा घेत होती म्हणून हनुमान तिला मंचकासकटच घेऊन आला. झोपमोड झाल्याने ते क्रुद्ध झाली होती. तिने शतमुखी रावणाचा एकटीने वध केला आणि त्या बेभान अवस्थेत ती त्याची मुंडकी हातात घेऊन नर्तन करू लागली.. तिच्या या रुपाचे ललिता पंचमीला पूजन करायचे असते.

शांकली.. पटलं तुझं म्हणणं... आता मराठी/ इंग्लिश नावाबरोबर बोटेनिकल नावांकडेही लक्ष देईन Happy

गाजरा.. सो क्यूट नाव..

ती बटरफ्लाय फुलं कसली सुंदर दिस्ताहेत.. दिनेश मलाही ती पक्ष्याच्या आकारातच दिसली....

ललितापंचमी ची गोष्ट पहिल्यांदाच समजली.. आणी रावणाचा सिनियर ही होता ही गोष्ट पण...

हेमाचा आफ्रिकन ट्युलिप खूप मस्त आहे...

या धाग्याशी संबंधीत थोडेफार ज्ञानकण माझ्याकडुनही.

मंडळी, काल पुण्यात पाऊस झाला. पहिल्या पावसानंतर येणारा जमिनीचा जो विशिष्ट वास आपल्याला भरभरुन घ्यावासा वाटतो ना त्या वासाला कारणीभुत जमिनीतील 'अ‍ॅक्टीनोमायसीट्स' नावाचे जिवाणु असतात.
हे जिवाणु फिलॅमेंट्स म्हणजे धाग्याच्या स्वरुपाचे असतात. त्यामुळे बुरशीसारखे दिसतात. जमिनीतील किटकांच्या अवशेषात असणारी कायटीन, सेल्युलोज सारखी काही गुंतागुंतीची किचकट कार्बनी संयुगे आणि क्लिष्ट शर्करा यांचं अपघटन करायचं कार्य हे जिवाणु करतात. जमिनीत उबदार जागी त्यांची वाढ होते. उन्हाळ्यातल्या कडक उष्णतेतही ते जगतात. त्या काळात त्यांचे प्रजनन होउन स्पोअर्स(बीज्)तयार होतात. आणि पहिला पाऊस आला की त्या पावसाच्या थेंबांना चिटकुन ते स्पोअर्स वातावरणात उधळले जातात. त्यामुळे तो विशिष्ट वास येतो.
औषधांमधील उपलब्ध अँटीबायोटीक्सपैकी ऑरीयोमायसीन, टेरामायसीन, स्ट्रेप्टोमायसीन, क्लोरोमायसीन, निओमायसीन, कॅनामायसीन यासारखी जवळजवळ निम्मी अँटीबायोटीक्स हे अ‍ॅक्टीनोमायसीट्स च्या अनेक जाती तयार करतात.
आम्ही प्रयोगशाळेत पेट्रीप्लेट्समधे एका विशिष्ट मेडीयमवर अँटीबायोटीक्स कल्चर तयार करायचो. त्यांची वाढं इतर जिवाणुंपेक्षा हळु असते. २-३ दिवस रुममधल्या तापमानालाच किंवा इन्क्युबेटरमधे प्लेट्स ठेवल्या की नंतर जेव्हा प्लेट उघडायचो तेव्हा तसाच 'मातीचा वास' यायचा. Happy

मी मागच्या महिन्यात एक नविन गुलाबाच कलम आणल. त्याला हे फुल होत.

फुलाच्या पाकळ्या गेल्यावरही काही मी त्याचे कटिंग केले नाही. ७-८ दिवसांनी गेलेल्या पाकळ्यांच्या जागी म्हणजे पराग असतात तिथे अशा छोट्या कळ्या येऊन त्या फुलताहेत. ही काय जादू आहे?

आर्या मला हे माहितच नव्हते ... मातीचा वास खूप आवडतो...
धन्यवाद सगळ्याना शांकली, दिनेशदा, शशांक , आर्या... ज्ञानात भर पडत आहे ....

अरेच्चा! इतकी छोटी केळी? आणि झाडावरच पिकलीत की! Happy ती वसईची केळी म्हणतात तशीच असतात ना?

जागु, त्या गुलाबात काहीतरी म्युटेशनल चेंजेस झाले असावेत. मधल्या स्टेप्स गाळुन त्यांनी डायरेक्ट 'फुलमें फुल' तयार केलं असावं. Lol

मी वाचलेले कुठेतरी मातीच्या वासाबद्दल.. पण असे प्रयोगशाळेत म्हणजे... मज्जाच्..

हेमाने टाकलेले खरे पिस्ते नाहीय. जंगली बदामाची फळे विकुन तिथे कोणी हातगाडीवाला आपली उपजिविका करतोय...

मागे अवलनेही जंगली बदामाबद्दल लिहिलेले http://www.maayboli.com/node/31551. तिच्या मावशीला जुनागडलाच मिळालेले हे.

(अजुन मुंबईतल्या हातगाडीवाल्यांना हे माहित नहीय नाहीतर इथल्या झाडांवर एकही फळ राहणार नाही शिल्लक)

@ प्राची , तो टमाटु मावळतीच्या सुर्या सारखाच दिसतोय. Happy
@जागुताई पिकलेल्या केळ्यांचा रंग सुंदर आहे कधी तरी चिप्स करुन बघा आणि ईथे पाक्रु टाका Happy

कोणी तरी वेटोळीवाल्या शेंगांचे नाव ही सांगा ना...

मी मार्खामिया चेक केले नेटवर पण त्याच्या शेंगा चपटय आहेत. आणि पाने खुप वेगळी. फॅमिली कदाचित तीच असेल पण थोडा फरक असेल असे वाटतेय.

आणि तो दुसरा फोटो डोम थेटरासमोरच्य झाडाचा, तयचेही नाव सांगा ना................

नितीन करते मी कच्च्या केळ्याचे चिप्स. बहुतेक मी आधी रेसिपी टाकलेय.

आर्या मस्त माहिती. जागू आणि प्राचीचे फोटोपण मस्तच.

जागू केळीच्या झाडावरून मला आठवले, मी नालासोपारा येथे आमच्या सोसायटीत केळी लावली त्यालापण अशीच केळी यायची आणि खूप फुलझाडे लावली होती आणि माडाचे झाडपण, त्याला नारळ यायला लागले आणि आम्ही नालासोपारा सोडले अर्थात सोसायटीच्या आवारात म्हणजे मालकी सोसायटीची पण आपल्या खिडकीतून बघायला छान वाटायचे.

अरेच्चा! इतकी छोटी केळी? आणि झाडावरच पिकलीत की! स्मित ती वसईची केळी म्हणतात तशीच असतात ना?>> अशी केळी द़क्शीन भारतात आढळतात.
हैद्राबादला जाताना गाडीत विकायला खुप जन घड च्या घड आणत असत.

Pages