निसर्गाच्या गप्पांच्या १७ व्या भागा बद्दल सर्व निसर्ग प्रेमींचे हार्दिक अभिनंदन.
वरील कोलाज वर्षू नील यांच्या सौजन्याने
सध्या अनुकूल अशा वातावरणामुळे सगळीकडे रंगीबिरंगी टवटवीत फुले डुलताना दिसत आहेत. फुला,झाडांच्या प्रदर्शनांचेही सध्या हंगाम चालू आहे. निरनिराळी फुले, फळे, रोपे, बी-बियाणे आपले खास आकर्षण घेऊन ह्या प्रदर्शनांमध्ये आपले गुण, वेगळेपण दर्शविण्याच्या प्रयत्नात आहेत. आपल्या निसर्ग प्रेमींपैकी काही निसर्ग प्रेमी ह्या प्रदर्शनांना भेटीही देऊन आले आहेत. राहीलेल्या ज्यांना कोणाला शक्य असेल त्यांनी अशा प्रदर्शनांना भेट देऊन ह्या निसर्ग घटकांच्या सौंदर्याचा, महतीचा लाभ घ्या. तसेच बी-बियाणे, रोपे आणून आपल्या परीसरातही त्यांना सामावून घ्या. व त्यांचे फोटो काढून नि.ग. च्या धाग्यावर सगळ्यांच्या लाभार्थी अवश्य द्या.
स्थापना - ५ डिसेंबर २०१०
निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू नील ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी ६२) मधू-मकरंद ६३) सुर्यकिरण ६४) पिशी अबोली ६५) सुमंगल ६६) गमभन ६७) दक्षिणा ६८) आर्या ६९) येळेकर ७०) प्राची ७१) हेमा वेलणकर ७२) अन्जू ७३) झरबेरा ७४) चंद्रा ७५) Sayali Paturkar
मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाच्या गप्पा (भाग ७) http://www.maayboli.com/node/34014
निसर्गाच्या गप्पा (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
निसर्गाच्या गप्पा (भाग९) http://www.maayboli.com/node/35557
निसर्गाच्या गप्पा (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
निसर्गाच्या गप्पा (भाग ११) http://www.maayboli.com/node/38565
निसर्गाच्या गप्पा (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
निसर्गाच्या गप्पा (भाग १३) http://www.maayboli.com/node/41996
निसर्गाच्या गप्पा (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
निसर्गाच्या गप्पा (भाग १५) http://www.maayboli.com/node/43773
निसर्गाच्या गप्पा (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
निसर्गाशी निगडीत काही पुस्तकांची यादी १५ व्या धाग्यापर्यंत पाहता येईल.
मुंबईच्या राणीच्या बागेतील झाडांची यादी - http://www.saveranibagh.org/BW_listOfTrees.php
आर्या - ही घे नि ग भाग ८ वरील
आर्या - ही घे नि ग भाग ८ वरील माहिती -
http://www.maayboli.com/node/34852?page=29
<<<<<< पुरंदरे शशांक | 1 June, 2012 - 09:00
मला ओल्या मातीच्या वासाचं एक अत्तर मिळालं बाजीराव रोड वरच्या दुकानात. मस्तच. आत्ता तेच लावून नि. ग. वाचत्येय.>>>>> पहिल्या पावसानंतर मातीचा जो सुवास सुटतो त्यावर डॉ. मिलिंद वाटवे यांनी संशोधन करुन अॅक्टिनोमायसिट्स या प्रकारातले काही बॅक्टेरियांमुळे हा सुवास येतो हे दाखवून दिले होते - त्यावेळेस (१९८०-८२) गरवारे कॉलेजच्या मायक्रोबायॉलॉजी विभागात पेट्रीप्लेट्स मधे वाढवलेल्या या जीवाणूंचा सुवास घ्यायला गर्दी जमायची.... - स्थानिक वर्तमानपत्रे व काही शास्त्रीय जर्नल्समधेही हे प्रसिद्ध झाले होते... जिओस्मिन का असे काहीतरी नावही दिल्याचे आठवते...... >>>>>
शशांकजी. हो जिओस्मिन म्हणतात
शशांकजी.
हो जिओस्मिन म्हणतात त्याला. पण हे डॉ. मिलिंद वाटवेंनी संशोधन करुन दाखवलय हे माहित नव्हतं.
आमचे निसर्ग सोबती.
आमचे निसर्ग सोबती.
वा मस्त जागू, ते डोळे अगदी
वा मस्त जागू, ते डोळे अगदी गुंजेचे वाटतात.
साधना, डोम थिएटरपासचं झाड परत
साधना, डोम थिएटरपासचं झाड परत बहुधा फायकस फॅमिलीतलं असावं असं वाटतंय. खारवत (खरवत) Ficus exasperata बघ बरं (पण नक्की नाही सांगू शकत) कारण पानांची रचना, फळं तर त्या खारवतासारखीच वाटताहेत,झाड केवढं मोठं होतं? मध्यम आकारचं होतं, की झुडुपसदृश होतं की खूप मोठं होतं?
आणि त्या वळलेल्या शेंगांच्या वृक्षाला Haplophragma adenophyllum काटसागोन म्हणतात. मारखामिया आणि या काटसागोन ची फॅमिली एकच आहे बिग्नोनिअॅसी.
जागू, कोकिळेचा फोटो मस्त आलाय. पण मला एक नाही कळले, ही जमिनीवर कशी काय उतरलीये?
अरे वा.....हेमाचा आफ्रिकन
अरे वा.....हेमाचा आफ्रिकन ट्युलिप, गौरीचा. बटर फ्लाय बुके, प्राचीची घरची भाजी, जागूची केळी आणि बागेतला पाहुणा, आर्याची अत्तराची माहिती......सगळ् च भारी! चालू दे!
प्राची, घरची भाजी मस्तच!!
प्राची, घरची भाजी मस्तच!! फोटो पण खूप मस्त आलेत.
जागू, ही वेलची केळी आहेत का? आणि त्या गुलाबाच्या कळ्यांचं गूढच वाटतंय बरं का!!
हेमा तुम्ही टाकलेला स्पॅथोडियाचा फोटो पण फार सुंदर आलाय हं!
ओह्हो.. प्राची सुंदर टवटवीत
ओह्हो.. प्राची सुंदर टवटवीत भाजीये तुझ्या कडची...
जागु, फुलाची काय जादू आहे??? उलगडला का सस्पेंस????
केळी मस्त आहेत.. चीन मधे यांना गावठी केळी म्हणतात..
मातीच्या वासाचे अत्तर????????? वॉव..
रच्याकने... अमेरिकेला ,' गॅप" ब्रँड चा ,' ग्रास' नावाचा पर्फ्यूम मिळतो.......... अगदी ओल्या गवता चा खर्राखुर्रा वास आहे त्याला... ( आर्या.... गवताच्या वासाचे ही असेच काय कोडे हाये का??? )
मानुषी.. वाचलंस ना ???????????
हो वर्षू याबद्दल आधीही कुठे
हो वर्षू
याबद्दल आधीही कुठे तरी वाचलं होतं. मग वर शशांकने लिन्क दिलीये तेच असेल कदाचित!
की शिल्पा शेट्टीने काही पर्फ्यूम्स काढले(न्यू ब्रॅन्ड्स ) आठ्वत नाही.
हं..... लेकीच्या कलेक्षनात असेल हा ग्रास कदाचित.....पहावं लागेल.
हंा वेलची केळी! मला नाव
हंा वेलची केळी! मला नाव आठवेना काही केल्या.
आभार शांकली
इतर फोटो अाणि माहिती पण छानच
जागू हा पक्षी कोणता आहे? फोटो
जागू हा पक्षी कोणता आहे? फोटो मस्त आला आहे. खास तुझ्यासठी ( मी तुला तूच म्हणते हं) पोज दिली आहे अस वाटत आहे. किती clear आणि perfect आला आहे फोटो
मातीच्या अत्तराची माहिती रंजक आणि रोचक !!
प्राची टोमॅटो म्हणजे खरच सूर्याचा गोळा!!
बाकी सर्व फोटो अप्रतिम
जागुने फोटो टाकलेली केळी
जागुने फोटो टाकलेली केळी नक्की वेलची केळी आहेत का? कारण मला वाटते वेलची केळी ह्याच्यापेक्षा लहान आणि साल अजून पातळ असते. जाणकारांनी प्रकाश टाकावा.
सुप्रभात
सुप्रभात
जागूची केळी लहान आहेत पण
जागूची केळी लहान आहेत पण वेलची नाहीत. वेलची केळी आपल्या बोटाएवढीच असतात आणि पातळही तितकीच असतात. खायला मात्र सुंदर.
वर्षु. मस्तच ग..
साधना, डोम थिएटरपासचं झाड परत बहुधा फायकस फॅमिलीतलं असावं असं वाटतंय. खारवत (खरवत) Ficus exasperata बघ बरं (पण नक्की नाही सांगू शकत) कारण पानांची रचना, फळं तर त्या खारवतासारखीच वाटताहेत,झाड केवढं मोठं होतं? मध्यम आकारचं होतं, की झुडुपसदृश होतं की खूप मोठं होतं?
पंधरा ते विस फुट होतं साधारण. फायकस एक्ष. नाही वाटले मला. नेटवर शोधताना टेक्सास .. कायतरी असे झाड सापडले होते ज्याची पाने न फळे या झाडासारखी वाटलेली. आता नेमके ते नाव सापडत नाहीय... खारवत पाहिले. ते वेग्ळे वाटले मला.
धन्यवाद ...इथे आल्यामुळे
धन्यवाद ...इथे आल्यामुळे बागकाम करायला जास्तच मजा येत आहे ..हुरुप येतो... नविन नविन माहिती कळते आणी बागकामाच्या टिप्स पण
फायकस बद्दल गुगलताना ही
फायकस बद्दल गुगलताना ही माहिती मिळाली .....
Statistics
The Plant List includes 2,746 scientific plant names of species rank for the genus Ficus. Of these 830 are accepted species names.
The Plant List includes a further 822 scientific plant names of infraspecific rank for the genus Ficus. We do not intend The Plant List to be complete for names of infraspecific rank. These are primarily included because names of species rank are synonyms of accepted infraspecific names.
एवढे सगळे कोण शोधत बसणार आहे का ??? ही लिंक मिळेलच गुगलवर ... http://www.theplantlist.org/browse/A/Moraceae/Ficus/
हेमा वेलणकर | 25 February,
हेमा वेलणकर | 25 February, 2014 - 22:23
जागू हा पक्षी कोणता आहे? फोटो मस्त आला आहे. खास तुझ्यासठी ( मी तुला तूच म्हणते हं) पोज दिली आहे अस वाटत आहे. किती clear आणि perfect आला आहे फोटो >>>>>> हा पक्षी म्हणजे कोकिळा (फिमेल).
नर कोकीळ काळा कुळकुळीत असतो पण डोळे मात्र असेच - गुंजेसारखे लाल आणि हा नर पक्षीच साद घालत असतो - कुहू, कुहू करुन - त्यामुळे "गानकोकीळ" असं वर्णन केलं जावं ...
वर्षूदी - तू ज्या सूर्यफुलाचा
वर्षूदी - तू ज्या सूर्यफुलाचा फोटो टाकलाय त्याने चक्क सूर्याला चक्क पाठ दाखवली आहे .....
सुप्रभात. माझ्याकडची ही केळी
सुप्रभात.
माझ्याकडची ही केळी वेलची नाहीत. हिच्या कच्च्या केळ्यांचा जास्त भाजीसाठी उपयोग करतात. बहुधा ह्यांना राजेळी केळी म्हणतात.
जागू, ही फुले हायड्रेंजिया
जागू, ही फुले हायड्रेंजिया (hydrangea) आहेत का ?
जागूचा पक्षी : कोकिळा... मी
जागूचा पक्षी : कोकिळा... मी पण ओळखला..
जागूची केळी : मुठेळी आहेत का? खास वसई पट्ट्यातली?
मुलाला कॉलेज प्रोजेक्टमधे काही धान्य आणून वहीत चिकटवायला सांगितले आहे. त्यात एक teosinte आणि मका असे दोन्ही आहेत, teosinte जर गुगलून पाहीले तर मकाच मिळतो. teosinte काही वेगळे असते का?
हो शशांकजी खरे तर मी नाव आठवत
हो शशांकजी खरे तर मी नाव आठवत होते पण तुम्ही आठवून दिलत धन्स.
आमचा खंडू
आमचा खंडू
जागु कडच्या केळी चा घड बघून
जागु कडच्या केळी चा घड बघून मला गेल्या महिन्यात मझया कडे आलेल्या केळीच्या घडाची आठवन आली. फारच मोठा घड होता .. फोटो टाकायचा आहे.. परंतु आपलोड होत नाही आहे
फोटो कसा आपलोड करायचा ?
फोटो कसा आपलोड करायचा ?
जागू, हायड्रेंजिया
जागू,
हायड्रेंजिया (hydrangea) > कुठे मिळाली?
या फुलांचे रंग जमिनीच्या प्रतिप्रमाणे ( पीएच बॅलेन्स) बदलतात असे ऐकले आहे. खरेखोटे माहित नाही.
एक सुचवु का?
इथे बरेच वेळा कोणते झाड/ कोणते फुल / कोणते फळ असे प्रश्न विचारुन फोटो दिले जातात. नंतरचा पोस्टसमधे कोणीतरी माहित्गार त्याची माहीती देतात. पण नंतर धागा एकत्रितपणे वाचताना कुठली माहिती कोणत्या फोटोकरता हे कळत नाही, प्रश्नाचे उत्तर मिळण्याकरता पुढचे पानेच्या पाने वाचत बसावे लागते. त्यापेक्षा.
आपल्या प्रश्नाचे उत्तर मिळाले की ती स्वतःच पोस्ट संपादीत करुन तिथे तो प्रश्न आणि त्याचे योग्य उत्तरच लिहीले तर नंतर धागा वाचताना खुप उपयोगी पडेल.
जागुली च्या घरीच मुक्काम
जागुली च्या घरीच मुक्काम ठोकायचाये एकदा.. नेचर रिसॉर्ट मधे राहिल्याचा अनुभव घेता येईल..
शशांक... अर्रे खरंच... रे.. आम्ही बागेत फिरत असता ही वेडी फुलं चक्क सूर्याकडे पाठ करून आमच्याकडेच
बघत बसली (का उभी??) होती...
फोटो इमेज मध्ये जाउन उपलोड
फोटो इमेज मध्ये जाउन उपलोड केला तरी दिसत नाही आहे
(No subject)
ज्ञानेश, पिकासा अल्बम मधे
ज्ञानेश, पिकासा अल्बम मधे फोटो सेव करून त्याची लिंक इकडे दे..
Pages