निसर्गाच्या गप्पा (भाग १७)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 20 February, 2014 - 01:57

निसर्गाच्या गप्पांच्या १७ व्या भागा बद्दल सर्व निसर्ग प्रेमींचे हार्दिक अभिनंदन.

वरील कोलाज वर्षू नील यांच्या सौजन्याने

सध्या अनुकूल अशा वातावरणामुळे सगळीकडे रंगीबिरंगी टवटवीत फुले डुलताना दिसत आहेत. फुला,झाडांच्या प्रदर्शनांचेही सध्या हंगाम चालू आहे. निरनिराळी फुले, फळे, रोपे, बी-बियाणे आपले खास आकर्षण घेऊन ह्या प्रदर्शनांमध्ये आपले गुण, वेगळेपण दर्शविण्याच्या प्रयत्नात आहेत. आपल्या निसर्ग प्रेमींपैकी काही निसर्ग प्रेमी ह्या प्रदर्शनांना भेटीही देऊन आले आहेत. राहीलेल्या ज्यांना कोणाला शक्य असेल त्यांनी अशा प्रदर्शनांना भेट देऊन ह्या निसर्ग घटकांच्या सौंदर्याचा, महतीचा लाभ घ्या. तसेच बी-बियाणे, रोपे आणून आपल्या परीसरातही त्यांना सामावून घ्या. व त्यांचे फोटो काढून नि.ग. च्या धाग्यावर सगळ्यांच्या लाभार्थी अवश्य द्या.

स्थापना - ५ डिसेंबर २०१०

निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू नील ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी ६२) मधू-मकरंद ६३) सुर्यकिरण ६४) पिशी अबोली ६५) सुमंगल ६६) गमभन ६७) दक्षिणा ६८) आर्या ६९) येळेकर ७०) प्राची ७१) हेमा वेलणकर ७२) अन्जू ७३) झरबेरा ७४) चंद्रा ७५) Sayali Paturkar

मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाच्या गप्पा (भाग ७) http://www.maayboli.com/node/34014
निसर्गाच्या गप्पा (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
निसर्गाच्या गप्पा (भाग९) http://www.maayboli.com/node/35557
निसर्गाच्या गप्पा (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
निसर्गाच्या गप्पा (भाग ११) http://www.maayboli.com/node/38565
निसर्गाच्या गप्पा (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
निसर्गाच्या गप्पा (भाग १३) http://www.maayboli.com/node/41996
निसर्गाच्या गप्पा (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
निसर्गाच्या गप्पा (भाग १५) http://www.maayboli.com/node/43773
निसर्गाच्या गप्पा (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755

निसर्गाशी निगडीत काही पुस्तकांची यादी १५ व्या धाग्यापर्यंत पाहता येईल.

मुंबईच्या राणीच्या बागेतील झाडांची यादी - http://www.saveranibagh.org/BW_listOfTrees.php

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कुंड्यांमधे वाढलेल्या भाज्या... माझ्या ऑफिस मधल्या,,,,,, आमच्या माळ्यांची जादू >>> मधु Happy मी तुलाच विचारणार होते की कसे कुंड्यांमध्ये वाढवतात. मी टॉमेटो, मिरची, भो मि कुंड्यांमध्ये लावली होती पण खुप मोठी होतात झाडे. टॉमेटो तर ५ फुट्च्या वर गेले होते.

खाटिक मी पण पहिल्यांदाच एकतेय. जागु Sad

एप्रिलमध्ये .... कुठले नवीन प्रदर्शन बघायला जाताय?

<<<हायला.. खतरनाक्कचे ही कोंबडी...

आफ्रिकेचा परिणाम दुसरं काय...

एक आमचे दिनेश काही अजून शिकत नाहीत >>> वर्षूदी, लै भारी... मला वाटलं कोंबडी "चायना"तून आली होती जनू !! Happy Wink

जागू - खाटिकांनी कोणावर तरी जोरदार हल्ला चढवला असणार .... तसे ते फार अ‍ॅग्रेसिव्ह आणि निर्दयी म्हणूनच प्रसिद्ध आहेत - त्यामुळे तर ते "खाटिक" नाव आलंय ...... Happy

मागे एकदा फुले-झाडे पहाण्याच्या निमित्ताने पुण्याच्या आसपास (ताम्हिणी घाटाच्या अलिकडे) फिरत होतो तेव्हा हे महाशय स्वस्थ बसलेले दिसले - आधी वाटले की जवळ गेल्यास लगेच उडून जातील पण मग लक्षात आले की अगदी जवळ जाऊनही उडत नाहीयेत... तेव्हा मग काढले काही फोटु ....

a1_0.JPG

रंग एकदम झळाळते आहेत पण याचे नाव काही कळले नाही .... कोणी जाणकार सांगतीलच ...

male Eggfly - जाणकारांकडून कळलेले नाव...

शशांक, मस्त फोटो.. फुलपाखरु ध्यान करत असेल त्यामुळे कळले नसेल त्याला...

एप्रिलमध्ये .... कुठले नवीन प्रदर्शन बघायला जाताय?

प्रदर्शन नाही, राणी बागेत अशीच चक्कर मारायला...

खाटिक नाव त्यांच्या स्वभावामुळे पडलंय काय??

खाटकावरुन आठवले. दोन वर्षांपुर्वी ऐशू पुण्याला तिच्या मैत्रिणिकडे दोन दिवस गेलेली. मैत्रिण संध्याकाळी म्हणाली की चल जाऊया, एका पक्षिमित्राचे व्याख्यान आहे. संध्याकाळचे सात वाजलेले.. ऐशुला वाटले सात वाजता कोण येणार? अर्धे लोक तर प्रवासात असतील ऑफिसमधुन परत येण्याच्या भानगडीत. व्याख्यानाला हॉल चक्क भरलेला पाहुन ती आश्चर्यचकित झाली. पुणेकरांना व्याख्याने देण्यात आणि ऐकण्यात इतका रस बघुन तीने त्यांना काहीच काम नसते असा निष्कर्ष काढला. तिला म्हटले की हा निष्कर्ष पुणेकरांच्या कानी जाऊ देऊ नकोस.. नाहीतर तुझे काही खरे नाही.. Happy (आता माझे काही खरे नाही Happy )

त्या व्याख्यानात तिने खाटिक पक्षाबद्दल ऐकले. मलाही खाटकाला खाटिक का म्हणतात ते माहित नव्हते. हा पक्षी म्हणे स्वतःच्या शिकारीचे मांस झाडाच्या काट्यांना व्यवस्थित टांगुन ते वाळवतो आणि मग निवांत खातो. हा उद्योग करतो म्हणुन तो खाटिक.

मानुषी, हो ग, खाटिक म्हणजेच ग्रे श्राईक. दिसायला खुप सुंदर दिसतात हे पक्षी. गावी माझ्या घरासमोर दिवसभर बसलेले अस्तात.

Parkia biglandulosa किंवा चेंडु-फूल झाड / बॅडमिंटन बॉल ट्री हे सगळ्यांना नक्कीच माहित असणार ...

त्याची फुले अशी असतात .....

p1.JPG

पुढे त्यावर अनेक पक्षी येऊन परागीवहन होते आणि त्याला शेंगा लागतात ....

p2.JPG

या शेंगा मोठ्या होऊन (परिपक्व) त्यातील पांढरी पावडर झाडाखाली पसरलेली दिसेल -ज्याच्यात या झाडाच्या बियाही असतील

p3.JPG

खाटकावरुन आठवले. दोन वर्षांपुर्वी ऐशू पुण्याला तिच्या मैत्रिणिकडे दोन दिवस गेलेली. मैत्रिण संध्याकाळी म्हणाली की चल जाऊया, एका पक्षिमित्राचे व्याख्यान आहे. संध्याकाळचे सात वाजलेले.. ऐशुला वाटले सात वाजता कोण येणार? अर्धे लोक तर प्रवासात असतील ऑफिसमधुन परत येण्याच्या भानगडीत. व्याख्यानाला हॉल चक्क भरलेला पाहुन ती आश्चर्यचकित झाली. पुणेकरांना व्याख्याने देण्यात आणि ऐकण्यात इतका रस बघुन तीने त्यांना काहीच काम नसते असा निष्कर्ष काढला. >>>>>> पुणेकरांना "लोकल ट्रेन" ची भानगड नसल्याने ते लवकर घरी येतात आणि पुढचे अगदी खरे आहे - व्याख्यांनामधे, संगीत सभेमधे भाग घेतात ... असे फार फार हौशी, रसिक आणि विद्वान आणि काय काय आहेत पुणेकर .... Happy Wink

मधे एकजण (मुंबईचा) सांगत होता --- सिंहगडाच्या पायथ्याशी एक ठिकाण आहे - जिथे खूप तर्‍हेतर्‍हेचे पक्षी येतात - पण शनिवार - रविवार इतकी गर्दी असते (फोटोग्राफर्सची) की विचारु नका... Happy

आणि पुढचे अगदी खरे आहे -

हे वाचुन "त्यांना काहीच काम नसते असा"" ह्यानिष्कर्षाबद्दल शशांकचे अनुमोदन आहे असा माझा क्षणभर (गैर)समज झाला... Happy बाकी पुणेकरांबद्दल काय बोलणार. सवाई गंधर्व उगीच नाही तिथे होत...

रच्याकने खाटकाब्द्दल नेटावर वाचत असताना ग्रे श्राईकचा अर्थही खाटीक असाच आहे हे नविनच कळले Happy

पार्कियाची पाने खुपच सुंदर दिसतात. गुलमोहरासारखीच पण अतिशय बारीक. अगदी चिंचेपेक्षाही थोडी लहान. मला खुप आवडली त्याने पाने. मी खरेतर हे झाड पानांमु़ळे ओळखु शकते. पार्ल्याच्या साठे कॉलेजच्या आवारात याची सात आठ झाडे आहेत.

"गच्चीतील भाजी-पाला ते वेदकालीन शिवणकाम अशा विविध विषयावरील व्याख्याने पुण्यात भरभरुन चालू असतात... " अशा आशयाचे पु. लं. चे एक वाक्य आहे ....
बाकी पुणेकरांची खासियत काय वर्णन करावी !!! त्यासाठी मा बो वर कित्येक धागे निर्माण होतील आणि सगळेच धागे वादग्रस्तही .... Happy Wink

आणि त्याच पुणेकर पु. लं.नी खूप वर्षांपूर्वी "कालनिर्णय"मधे (प्रत्येक महिन्याच्या पानामागे जे लिखाण असते त्यात) एक अतिशय भारी लेख लिहिला होता - जो माझ्या व्यवस्थित स्मरणात आहे पण सध्या कुठे वाचायला मिळेल माहित नाही... त्या लेखाचे शीर्षकच अस्ले भारी होते..
"रसिकतेचा महापूर आणि मी एक पूरग्रस्त..."
कृपया कोणाकडे हा लेख असल्यास मला तो हवा आहे ... जबरी लेख आहे - कारण पु.लं.चा आहे...

केशर, - फारच मस्त लिंक आहे ही ....
या लिंकवर या फुलपाखराचे सुंदर सुंदर फोटो दिलेत ....
याचे नाव - This black butterfly with blue spots is a male Eggfly.
मनापासून धन्स .....

असे फार फार हौशी, रसिक आणि विद्वान आणि काय काय आहेत पुणेकर ............वाचताना अशोक नायगावकर आठवले.

मानुषी, शशांकदा, मस्त फ़ोटो. Happy
केशर. लिंक मस्तच. Happy
ईनमीन तीन, खूप दिवसांनी? मी पण तुम्ही दिलेली वरची लिंक शोधली होती. Happy

केशर, खरेच आमच्या माळ्यांची कमाल. गार्ड्निंग डिपार्ट्मेंट्चे हेड तुम्हाला मदत करतील.

शशांक, हे ग्रेट एगफ्लाय असावे.
"ह्याचा नर आणि डॅनाईड एगफ्लायचा नर प्रथमदर्शनी सारखेच वाटतात. पण ग्रेट एगफ्लायच्या पंखावर कडेला पांढर्‍या टिंबाची रांग असते. तसेच ग्रेट एगफ्लायच्या पंखावरील मोठ्या ठिपक्यांमध्ये जांभळा रंग भरलेला असतो. डॅनाईड एगफ्लायमध्ये मात्र निळ्या रंगाची नुसतीच झालर असते. ग्रेट एगफ्लायची मादी कॉमन एंडीयन क्रो ह्या फुलपाखराची नक्कल करते. मादीच्या पुढील पंखावर दोन निळे ठिपके असतात. तसेच मागील पंखावर रुंद पिवली-पांढरी लिरिसारखी झालर असते. ग्रेट एगफ्लाय हे फुलपाखरू भारतात सर्वत्र आढळते.
Hypolimnas bolina Linnaeus"
---- महाराष्ट्रातील फुलपाखरे..लेखक डॉ. राजू कसंबे.

Parkia biglandulosa किंवा चेंडु-फूल झाड / बॅडमिंटन बॉल ट्री हे सगळ्यांना नक्कीच माहित असणार ...>>>>>> झाडे घर आणि ऑफिस परिसरात रोज पहाते. पण त्याच्या शेंगा कधी पहाण्यात आल्या नाहीत. आता लक्ष ठेवीन.

"रसिकतेचा महापूर आणि मी एक पूरग्रस्त..."
कृपया कोणाकडे हा लेख असल्यास मला तो हवा आहे ... जबरी लेख आहे - कारण पु.लं.चा आहे...>>>>>
गाठोडं पुस्तकात आहे. स्कॅन करून ई-मेल पाठवले तर चालेल का?

राणी बागेत अशीच चक्कर मारायला. >>> मला पण कळवा +१

राणीबागेत जायचे ठरेल तेव्हा इथे लिहुच.. साधारण एप्रिल्च्या पहिल्या किंवा दुस-या आठवड्यात. आगामी पोस्टींवर लक्ष ठेवा.. Happy

स्कॅन करून ई-मेल पाठवले तर चालेल का? >>>>> जरुर, जरुर .....
संपर्कातून माझा इमेल आयडी पाठवतोय ..... मनापासून धन्स ......

पुस्तक विकत घेणारंच आहे ..... पण हा लेख किती दिवस झाले शोधतोय मी ...

शशांक, हे ग्रेट एगफ्लाय असावे.>>>>> या सर्व माहितीसाठी अनेकवार धन्स .....

ओळखा पाहू .... (दिनेशदा, जागू, साधना, जिप्सी यांनी पटकन उत्तर सांगून पेपर फोडू नये Happy )

tk.JPG

शशांकच्या कोडयाचे उत्तर >>>> तालिमखाना/कोळशिंदा
http://www.maayboli.com/node/29535 - यात आहे ते -जागूने काढलेला फोटु.... Happy

Hygrophila schulli http://www.flowersofindia.net/ या साईटनुसार, बाकी स्पेसिजबद्दल थोडे मतभेद आहेत .. Happy
काहींच्या मते Hygrophila spinosa आहे. फॅमिली/कूळ - Acanthaceae

ही निळी कोर्‍हांटी वाटतेय. किंवा त्यांच्याच वर्गातली >>>> बरोबर आहे, त्याच कुळातील आहे पण कोरांटी नाहीए .. Happy

साधना गावी मज्जा असेल मग.....असले खाटिक बिटिक बघायला मिळ्तात.
तुझी लेकही अगदी तुझ्या पावलावर पाऊल!
शशांक बॅड्मिन्ट्न पाहिलेलं होतं पण माहिती नवीच! आणी फुलपाखरू, खाटीकही मस्त.

काल संध्या. हवा छान होती. अचानक बाल्कनीतून काहीतरी जाण्वलं . तर ४/५ सी गल्स अगदी खालून उड्त गेले. फोटो नीट नाहीत. तरी ड्कवते.

डिसेंबर महिन्यात आम्ही गुजरात ट्रिप ला गेलो होतो. जुनागढ फोर्ट बघताना तिथे एक हातगाडी दिसली. तिचा फोटो खाली देत आहे. काही guess आहे का हे काय आहे ते From mayboli

Pages