घर सोडून आता तब्बल अठ्ठावीस तास उलटले होते. तीन लांबलचक विमानप्रवास आणि वीट आणणारे त्यातले स्टॉप ओव्हर्स सोसून हातपाय दगड झाले होते. अडीच-तीन तासांचा बस प्रवास अजूनही शिल्लक होता. पुराणकाळात नारद-मुनिंना अवगत असलेल्या टेलीपोर्टेशनचा शोध अजून का बरं कुणाला लावता येऊ नये. “नारायण-नारायण!!!” म्हणत अगदी तिन्ही लोकांत नाही तरी निदान पृथ्वीलोकांत कुठेही लीलया जाऊ शकण्याची किमया विज्ञानाला लवकरच साधता यायला हवी.
दरवर्षी रेल्वे सप्ताहात रेल्वेनं एखादा प्रवास करायचा माझा अनेक वर्षांपासूनचा शिरस्ता. यावेळी जरा वेगळ्या पद्धतीनं प्रवास करायचा ठरवलं. त्यानंतर मी माझ्या भाच्याबरोबर परतीसाठी मिरजेहून 12493 दर्शन एक्सप्रेसची निवड केली आणि आरक्षणही करून टाकलं.
फिटनेस ५० आणि फिटनेस १००
कुटुंबासोबत व जवळच्यांसोबत फिटनेसचा आनंद घेण्याचा उपक्रम
संध्याकाळी बराच उशीर झालेला, चालून चालून पायाचे तुकडे पडलेले, आणि भुकेने पोटात खड्डा. तीनेक तास तरी आम्ही IKEA तल्या तीन एक मजल्यांवर पसरलेल्या लिविंग रूम , बेडरूम, किचन , चिल्ड्रेन’स रूम मधलं सामान , शोभेच्या वस्तू, झाडं, कुंड्या , झालच तर कचऱ्यांच्या पिशव्या ठेवायचा प्लास्टिकचा डिस्पेन्सर सगळं भारी कौतुकाने बघत, काय घ्यायचं त्याच्या नोंदी करत फिरत होतो. चेक आउट कॉउंटरच्या पलीकडे कुठेतरी बहुदा कॅन्टीन होत. आम्ही त्या लांबलचक लायनीतून एकदाचे (कसेबसे) काउंटरच्या पलीकडे आलो आणि तडक फूड कॉउंटर गाठला. तिकडे वेगवेगळॆ पदार्थ, ब्रेड्स, सॅलड्स अतिशय आकर्षकरित्या मांडलेले.
सारं गतिमान झालंय हल्ली...
त्यामुळे तोल जातो माझा
भरधाव वेगानं कुणीतरी समोरून जातं...
आणि मग बाचकायला होतं!
'विसावा' घेणं म्हणजे,
पळण्याच्या शर्यतीत विसावा आल्याचं भासतं!
मग मी देखील पळतो...
अगदी ऊर फुटेस्तोवर, धावत सुटतो
विक-डेज ला गावं शहरांकडे पळतात...
अन विकेन्ड ला शहरं गावांकडे
मधे आहेत फक्त भरधाव धावणारे रस्ते...
अन त्यासाठी भरावे लागणारे टोल!
पडवीत आडवा होऊन, वाचायला घेतलेलं पुस्तक...
ते तसंच पडून आहे कधीचं
फडफडताहेत ती केवळ वाचलेली पानं...
न वाचलेलं तसंच, चहाच्या कपाखाली बंदीस्त
नुकतीच मी फॅमिलीसहित ऐतिहासीक (गड, किल्ले) आणि धार्मिक सहल (मंदिरे) पार पाडली. मला आणि माझी सौ. मंजुषा दोघांना इतिहासाची आवड असल्याने आम्ही जमेल तसे ऐतिहासिक ठिकाणांना भेटी देत असतो. तसेच पुण्यातील टेकड्यांवर भ्रमंती करतो. मुलांना पण आपल्या महान महाराष्ट्राचा इतिहास आणि भूगोल माहीत व्हावा हा सुद्धा एक महत्त्वाचा उद्देश. त्याचे प्रवासवर्णन खाली देत आहे. एसटी आणि इतर सार्वजनिक वाहनांनी आम्ही पूर्ण प्रवास पार पाडला. हा प्रवास अगदी शंभर टक्के नियोजित नव्हता.
दिवस पाहिला (10 Feb 2023)
पुण्याहून सातारा शहराकडे:
✪ मोहीमेतील महत्त्वाचा टप्पा
✪ हिरव्यागार निसर्गातील रस्ते
✪ भीमा आणि गाणगापूर
✪ अशी राईड = अपूर्व आनंद
✪ अशा प्रवासात आपली स्वत:सोबत होणारी खरी भेट
✪ कलबुर्गीमध्ये श्री बसवराजजींसोबत भेट
✪ ६ दिवसांमध्ये ५३८ किमी
यंदाच्या दिवाळीच्या निमित्तानं मुंबईमधल्या भायखळा रेल्वेस्थानकाच्या ऐतिहासिक इमारतीविषयीचा हा विशेष लेख. मुंबईत अनेकवेळा जाणं झालं असलं तरी भायखळ्याला जाऊन त्या स्थानकाच्या ऐतिहासिक इमारतीला भेट देण्याची संधी अलिकडेच मिळाली होती.
आधीचा भाग
https://www.maayboli.com/node/81819
बंगलोरच्या त्या दोन कुटुंबांनी ही सहल अगदी भरगच्च आखलेली होती. चक्राताला येण्याआधी ते अजून दोन ठिकाणी दोन दोन दिवस फिरून आले होते. सकाळी लवकर, म्हणजे साडेसातलाच त्यांनी नाश्ता सोबत पॅक करून घेतला आणि ते बुधेर गुंफांना जाण्यासाठी निघाले. एकाच दिवसात बुधेर आणि टायगर फॉल्स, अशी दोन्ही ठिकाणं त्यांनी केली.
मिळताजुळता पण वेगळा धागा, 'अशी कोणती गोष्ट आहे जी एकदा ट्राय केली पण परत कधीच नाही करणार' ह्यावरून प्रेरित.
खालील ध्याग्यावर अशी कोणती गोष्ट आहे जी कधीही नाही केली पण एकदातरी ट्राय करायची आहे ह्या यादीत मोडणाऱ्या गोष्टी अपेक्षित आहेत.