Submitted by तुष्कीनागपुरी on 21 March, 2025 - 03:51
विटांवर उभा राहून येतो अरूण उगवण्यासाठी
इटानगरला जाऊन येऊ अरूणाचलप्रदेश साठी
.
कोय खाऊनी नाग झोपला काय करावे त्याचे
कोहीमाला जाऊन येऊ नागालॅंडच्या साठी
.
पूर मण्यांचा इथे फालतू मणी फार ते झाले
इंफालला जाऊन येऊ मणीपूरच्या साठी
.
एकच सवाल तुझा राम की माझा राम म्हणावे
ऐझवालला जाऊन येऊ मिझोरामच्या साठी
.
मगर तलावामधे खातसे तीन पुऱ्यांची पार्टी
अगरतलाला जाऊन येऊ त्रिपुराच्या साठी
.
मेघ दाटले लय लय आता वाटे लवंग खावीशी
शिलॉंगला चल जाऊन येऊ मेघालयच्या साठी
.
असे आमचे सात दिसांचे सात पूरांचे गाणे
दिसपूरला पण जाऊन येऊ आसामच्या साठी
.
तुष्की नागपुरी
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा