
दरवर्षी रेल्वे सप्ताहात रेल्वेनं एखादा प्रवास करायचा माझा अनेक वर्षांपासूनचा शिरस्ता. यावेळी जरा वेगळ्या पद्धतीनं प्रवास करायचा ठरवलं. त्यानंतर मी माझ्या भाच्याबरोबर परतीसाठी मिरजेहून 12493 दर्शन एक्सप्रेसची निवड केली आणि आरक्षणही करून टाकलं.
व्हिस्टा डोमच्या ‘दख्खनच्या राणी’तून लोणावळ्यापर्यंत प्रवास केल्यावर आता वेळ होती, परतीला ‘01007 दख्खन विशेष एक्सप्रेस’मधून पुण्याला परतण्याची. त्यासाठी मी लोणावळ्याच्या फलाट एकवर येऊन बसलो होतो. लोणावळ्यात हलका पाऊस सुरू होताच, शिवाय स्थानकातून आजूबाजूला दिसणारे हिरवेगार डोंगर ढगांमध्ये अर्धे लपलेले दिसत होते.
भारतीय रेल्वेच्या प्रवासातील हा एक प्रसंग. मी एका प्रवासास प्रारंभ केलेला. गाडीत मध्यम स्वरूपाची गर्दी होती. माझा डबा आरक्षित स्लीपर गटातला होता आणि त्यातली काही आसने रिकामी होती. अशातच तीन हिंदी भाषक माझ्या डब्यात आले आणि माझ्या समोरील रिकाम्या आसनांवर बसले. ते बसल्यानंतर थोड्याच वेळात आमच्या आसपासची शांतता भंग पावली. ते तिघे मोठमोठ्या आवाजात असभ्यपणे हिंदीतून बडबडू लागले. त्यांच्या संभाषणातून ते रेल्वेचेच कर्मचारी असल्याचे समजले. तसेच ते ‘रेल्वे आपल्या ‘बा’चीच आहे’ असे त्यांच्या वर्तनातून जाणवून देत होते. आम्ही प्रवासी ते निमूटपणे सहन करत होतो.
वसई रोड जवळ येऊ लागले तसा ‘पश्चिम’चा वेग वाढत चालला होता. गाडी वळताना खिडकीतून पासून आज आमचा कार्यअश्व कोणता आहे, बडोद्याचा लालेलाल डब्ल्यूएपी-४ ई की गाझियाबादचा पांढराशुभ्र डब्ल्यूएपी-७ याची खात्री करून घेतली, तर तो गाझियाबादचा डब्ल्यूएपी-७ होता. डहाणू रोडपर्यंत तरी थांबायचे नव्हते आणि बडोद्यापर्यंत Automatic Block System ही यंत्रणा कार्यरत असल्यामुळे पुढच्या गाडीच्या हालचालीनुसार मागच्या गाडीला सिग्नल्स मिळत जाणार होते. त्यामुळेही गाड्यांचा वेग वाढण्यास मदत होत असते. आता गाडीतली गडबड जरा कमी झाली होती आणि रसोई यानातील कर्मचाऱ्यांची वर्दळ वाढली होती.
दरवर्षी १० ते १६ एप्रिल दरम्यान साजऱ्या होणाऱ्या रेल्वे सप्ताहाच्या निमित्ताने माझ्या एका प्रवासातील आठवणींचा हा लेखाजोखा...
-----
बाहेर पडलं कि जग कळतं म्हणतात ..जग पाहायचे असें तर रेल्वे सारखी दुनिया नाही . दुनिया भली कि बरी हे जाणायचं असेन तर रेल्वे आणि रेल्वे प्लॅटफॉर्म वरचे अनुभव म्हणजे एक शाळा ..
दररोज प्रवास करतात त्यांना हे असेन मी तर फक्त शनी -रवी प्रवास करायचे पण स्वतःचे आणि दुसऱ्याचे अनुभव दरवेळेस येतातच ..
असेच काही माझे अनुभव ..तुम्ही पण share करा !! 
**********************************************************************
हाय कर्णावती, आज १ जुलै. आज तुझा वाढधिवस. तुला तुझ्या २५ व्या वाढदिवसानिमित्त भरपूर शुभेच्छा .
८ एप्रिल २००५. माझ्यासाठी एक एक्सायटींग दिवस होता. काही कामाच्या निमित्ताने चेन्नईला जायचे होते. मग मी आणि वडिलांनी कोल्हापूरहून रेणिगुंट्यापर्यंत ७३१६ हरिप्रिया एक्सप्रेसने आणि पुढे चेन्नईपर्यंत मिळेल त्या गाडीने जाण्याचा निर्णय घेतला. महिनाभर आधी आरक्षण केले आणि मिळालेही. त्यानंतर हा दिवस एक्सायटींग ठरण्याचे एक महत्त्वाचे कारण म्हणजे कोल्हापुरातून निघून वेगळ्याच दिशेने जाणाऱ्या गाडीने हा प्रवास होणार होता. त्यातच कोल्हापुरातून निघून थेट मिरजेतच थांबणाऱ्या गाडीचा आयुष्यातील तो पहिलाच प्रवास असणार होता. इतकेच नाही तर कोल्हापुरातून सुटणारी ती पहिलीच वेगवान गाडी होती.