रेल्वे

‘शताब्दी’ची कॉपी, पण….

Submitted by पराग१२२६३ on 17 December, 2023 - 00:37

प्रवासाच्या दिवशी पुणे स्टेशनला निघण्यापूर्वी वंदे भारतची पुण्यात येण्याची स्थिती पाहिली होती, तेव्हा गाडी 15 मिनिटं लेट असल्याचं दाखवलं जात होतं. आमचा प्लॅन होता वंदे भारतनं मुंबईत पोहचल्यावर थोडं इकडं-तिकडं फिरून दुपारी 3-4 पर्यंत परतीची बस पकडायची. पण नंतर वंदे भारतनं तसं करणं अशक्य बनवलं होतं. साडेनऊ होऊन गेले तरी ‘वंदे’ काही आली नव्हती. त्यातच display board वर वंदे भारतप्रमाणे बऱ्याच गाड्यांचे फलाटही दर्शवले जात नव्हते. थोड्याथोड्या वेळानं या वेळा सतत बदलत जाऊन शेवटी दाखवलं गेलं की ‘हैदराबाद’ 3 नंबरवर आणि ती गेल्यानंतर वंदे भारत तिथं येईल.

कल्चरल शॉक - जर्मनीतील एक रेल्वे प्रवास

Submitted by वैनिल on 29 June, 2022 - 08:54

हा किस्सा २००० सालातला आहे. नुकताच एका IT company मध्ये स्थिरावलो होतो आणि नोव्हेंबर १९९९ मध्ये दक्षिण जर्मनीतल्या एका छोट्याशा गावात वर्षभराच्या onsite assignment साठी येऊन पोहोचलो होतो. सोबत २ colleague ही होते. तिघांच्याही गेल्या ७ पिढ्यांमधली पहिलीच परदेश वारी होती. त्यात भर म्हणून German भाषेचं गमभन ही येत नव्हतं.

राष्ट्रपती विशेष रेल्वेगाडी

Submitted by पराग१२२६३ on 26 June, 2021 - 15:53

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी 25 जून 2021 रोजी विशेष रेल्वेगाडीतून प्रवास केला. राष्ट्रपतींनी रेल्वेगाडीतून प्रवास करण्याची प्रथा अलिकडील काळात अतिशय दुर्मिळ झालेली आहे. यंदाही तब्बल 15 वर्षांनंतर भारताच्या राष्ट्रपतींकडून दौऱ्यासाठी रेल्वेगाडीची निवड केली गेली होती. आपल्या मूळगावी परौख येथे जाण्यासाठी राष्ट्रपती कोविंद यांनी दिल्ली ते कानपूर असा 438 किलोमीटरचा प्रवास रेल्वेगाडीने केला. अलिकडील काळात भारताच्या राष्ट्रपतींनी केलेला तो सर्वाधिक लांबचा रेल्वे प्रवास ठरला.

किस्सा राघ्याचा!

Submitted by सुरेशकुलकर्णी on 16 January, 2021 - 07:59

दुपारची उन्ह करकर तापली होती. रेल्वे स्टेशनच्या दादऱ्याखाली, ते दोन मळक्या, फाटक्या कपड्यातले भिकारी सावली धरून बसले होते. नुकतीच बाराची प्यासिंजर निघून गेली होती. 'धंद्याच्या' दृष्टीने त्यांचा हा 'भाकड' पिरेड होता. त्या मुळे ते दोघे 'सुख -दुःखाच्या' गप्पा मारत असावेत असे, पहाणाऱ्यांना वाटत होते. आणि ते खरे हि होते. ज्यास्त कमाई(विना सायास ) म्हणजे ज्यास्त सुख हे त्यांच्या जीवनाचे सूत्र होते! हाच त्यांच्या गप्पांचा विषय पण होता.
रघ्या दोन दिवसान पासून पप्याचा मागे लागला होता.
"पप्या, यार, तेव्हड ते, 'मामा'शी सेटिंग करून दे ना!" आज चौथ्यांदा रघ्याने विनंती केली.

विषय: 

दुरंतोने माझ्या पहिल्या प्रवासाची दशकपूर्ती

Submitted by पराग१२२६३ on 7 December, 2020 - 09:11

7 डिसेंबर 2010 रोजी पुणे-निजामुद्दीन वातानुकूलित दुरंतोनं प्रवास केला होता. जेमतेम सव्वा वर्षच होत होतं ती गाडी सुरू होऊन. त्या प्रवासाला 10 वर्षे पूर्ण झाली आहेत. त्या प्रवासातील आठवणींना पुन्हा एकदा दिलेला हा उजाळा.

'शताब्दी'ने प्रवास

Submitted by पराग१२२६३ on 29 March, 2020 - 13:02

पुण्याहून सिकंदराबादपर्यंत शताब्दी एक्सप्रेसने प्रवास करण्याचा बेत नुकताच आखला. दिवस निश्चित केला. मधला दिवस असल्याने आणि परीक्षांचे दिवस असल्याने आरक्षणही भरपूर शिल्लक होतं. शताब्दीतून फेरफटका मारायचा असल्याने पहाटे पुण्याहून निघून लगेच त्याच गाडीने परत पुण्यात यायचं होतं. असं मागं दोनवेळा केलेलं होतंच. अशा प्रवासानंतर खरंच प्रचंड उत्साही आणि समाधानी वाटतं. या दोन्ही बाबी इतर कशातूनही मिळतील असं मला वाटत नाही.

बीबीसीआय ला जीआयपीचा डबा - रेल्वे ब्लूपर्स

Submitted by फारएण्ड on 29 October, 2017 - 18:32

आपले दिग्दर्शक रेल्वेचे सीन्स दाखवताना अनेकदा तपशीलांकडे दुर्लक्ष करतात. एरव्हीच्या सहज जाणवणार्‍या अचाटपणापेक्षा हे थोडे वेगळे आहे. रेल्वे सीन्स मधे जर ढोबळ पणे एक गाडी दाखवत आहेत इतक्याच मर्यादित फोकस ने तुम्ही हे सीन्स पाहिलेत तर कदाचित काहीच खटकणार नाही. पण जरा नीट पाहिलेत अशा सीन्स मधल्या तपशीलाच्या चुका लगेच जाणवतील आणि पटतील.

शब्दखुणा: 

आकवर्डनेस आणि आजीबाई

Submitted by भास्कराचार्य on 16 January, 2017 - 12:36

मुंबई-पुणे-मुंबई हा 'आयकॉनिक' प्रवास बटाट्याच्या चाळीतल्या भ्रमणमंडळाने केला, त्याला आता बरीच युगे लोटली. सध्या तो इतका 'आयकॉनिक' राहिलेला नाही, हे इतिहासाचार्य बाबूकाका खर्‍यांचे सध्याचे मत चिंत्य आहे. (साला एक्प्रेस वे काय पटापट घेऊन जातो साला! उगाच नाय! - इति सोकाजीराव त्रिलोकेकर.) पण 'आयकॉनिक' नसलेला हा प्रवास 'आय कॉमिक' असे मधूनमधून उभे राहून हजेरी लावल्यागत म्हणतो, हे खरे. (खरे म्हणजे सत्य, बाबूकाका नव्हे.) ``मानवजातीने आजपर्यंत बरेच चिरंतन प्रवास पाहिले आहेत. मुंबई-पुणे हा त्यातील महत्वाचा होय.'' असे प्रसिद्ध तत्वज्ञ `प्ले. अ. टो' ह्याने आपल्या `लॉज' ह्या पुस्तकात लिहून ठेवले आहे.

विषय: 

Pages

Subscribe to RSS - रेल्वे