indian railways

इंद्रायणीतून पहिल्यांदाच प्रवास

Submitted by पराग१२२६३ on 13 January, 2024 - 10:57

IMG20240109221028_01_edited.jpg

पहिल्यांदाच मुंबईला पुण्याहून संध्याकाळी जायचं होतं. मग इंद्रायणीचं आरक्षण केलं आणि प्रवासाच्या दिवशी पुणे जंक्शनवर पोहचलो. तपकिरी रंगातलं कल्याणचं WCAM-2 इंजिन आज इंद्रायणीचं सारथ्य करत होतं. राखाडी-आकाशी रंगसंगती आणि त्यावर बसवलेल्या खिडक्यांच्या काळ्या फ्रेम्समुळं आमचा डबाही आकर्षक दिसत होता.

‘शताब्दी’ची कॉपी, पण….

Submitted by पराग१२२६३ on 17 December, 2023 - 00:37

प्रवासाच्या दिवशी पुणे स्टेशनला निघण्यापूर्वी वंदे भारतची पुण्यात येण्याची स्थिती पाहिली होती, तेव्हा गाडी 15 मिनिटं लेट असल्याचं दाखवलं जात होतं. आमचा प्लॅन होता वंदे भारतनं मुंबईत पोहचल्यावर थोडं इकडं-तिकडं फिरून दुपारी 3-4 पर्यंत परतीची बस पकडायची. पण नंतर वंदे भारतनं तसं करणं अशक्य बनवलं होतं. साडेनऊ होऊन गेले तरी ‘वंदे’ काही आली नव्हती. त्यातच display board वर वंदे भारतप्रमाणे बऱ्याच गाड्यांचे फलाटही दर्शवले जात नव्हते. थोड्याथोड्या वेळानं या वेळा सतत बदलत जाऊन शेवटी दाखवलं गेलं की ‘हैदराबाद’ 3 नंबरवर आणि ती गेल्यानंतर वंदे भारत तिथं येईल.

रेल्वे अपघाताचं कारण

Submitted by पराग१२२६३ on 4 June, 2023 - 01:45

2 जूनला संध्याकाळी ओडिशाच्या बालासोर जिल्ह्यामधल्या बहानगा बाजार रेल्वे स्टेशनवर एक मालगाडी आणि दोन प्रवासी रेल्वेगाड्यांचा विचित्र आणि भीषण अपघात झाला. त्या अपघातात 288 प्रवाशांचा मृत्यू झाला असून 1,100 च्या वर प्रवासी जखमी झालेले आहेत. अलीकडच्या काळातला हा सर्वात भीषण रेल्वे अपघात ठरला असून विविध देशांकडून भारताला शोकसंदेशही पाठवण्यात आले आहेत.

Subscribe to RSS - indian railways