आकवर्डनेस आणि आजीबाई
Submitted by भास्कराचार्य on 16 January, 2017 - 12:36
मुंबई-पुणे-मुंबई हा 'आयकॉनिक' प्रवास बटाट्याच्या चाळीतल्या भ्रमणमंडळाने केला, त्याला आता बरीच युगे लोटली. सध्या तो इतका 'आयकॉनिक' राहिलेला नाही, हे इतिहासाचार्य बाबूकाका खर्यांचे सध्याचे मत चिंत्य आहे. (साला एक्प्रेस वे काय पटापट घेऊन जातो साला! उगाच नाय! - इति सोकाजीराव त्रिलोकेकर.) पण 'आयकॉनिक' नसलेला हा प्रवास 'आय कॉमिक' असे मधूनमधून उभे राहून हजेरी लावल्यागत म्हणतो, हे खरे. (खरे म्हणजे सत्य, बाबूकाका नव्हे.) ``मानवजातीने आजपर्यंत बरेच चिरंतन प्रवास पाहिले आहेत. मुंबई-पुणे हा त्यातील महत्वाचा होय.'' असे प्रसिद्ध तत्वज्ञ `प्ले. अ. टो' ह्याने आपल्या `लॉज' ह्या पुस्तकात लिहून ठेवले आहे.
विषय:
शब्दखुणा: